Panjab Dakh Havaman Andaj : पंजाब डक यांनी सांगितले ‘या’ तारखेपासून पडणार जोरदार पाऊस; एवढंच नव्हे तर..

Maharashtra Mansoon: लवकरच पावसाची हजेरी, हवामान खात्याने सांगितला नवीन अंदाज

Panjab Dakh Havaman Andaj: राज्यातील शेतकरी पावसाची वाट पाहून अक्षरशः हवालदील झालेला आहे. काही शेतकऱ्यांनी पाऊस पडेल या अपेक्षेने पेरण्या केल्या तर काही लोक पेरणी करण्यासाठी पावसाची वाट पाहत आहेत. पेरणी केलेल्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते, अशी परिस्थीती महाराष्ट्रात निर्माण झाली आहे. महाराष्ट्रातील शेतकरी पावसाची अतोनात वाट पाहत आहे. हवामान खात्याने देखील लवकरच पाऊस पडेल, असा अंदाज व्यक्त केला आहे. परंतु आता पंजाब डक यांनी हवामानाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे शेतकऱ्याची अडचण दूर होईल अशी अपेक्षा आहे.

 

मुर्तीजापुर कृषी उत्पन्न बाजार समितीने आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यामध्ये पंजाबराव डक यांनी शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज सांगितला. राज्यात उद्यापासून अर्थात २४ पासून मान्सून सक्रिय होईल, असा अंदाज पंजाबराव डक यांनी वर्तवला आहे. त्यामुळे उद्यापासून जोरदार पाऊस पडेल असा अंदाज पंजाबराव डक यांनी वर्तवला आहे. पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भात पावसाचा जोर अधिक असणार आहे.

लाल केळीच्या 4 एकर पिकातून 35 लाखांचे उत्पन्न घेणाऱ्या करमाळ्याच्या अभिजितची यशोगाथा तेथे वाचा 👈

 

या कालावधीत पडलेला पाऊस हा जोरदार असणार आहे. ज्या पद्धतीने शेतकऱ्यांनी पावसाची वाट बघितली आहे, त्याच पद्धतीने पाऊस शेतकऱ्यांचे समाधान करणार आहे. पंजाबराव डक यांनी मुंबईतील पावसाबद्दल देखील अंदाज वर्तवला आहे. मुंबई व आजूबाजूच्या भागांमध्ये 28 जून ते 30 जून च्या दरम्यान जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातील शेतकरी सुखावण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. लवकरात लवकर पाऊस पडला तर शेतकऱ्यांची पुढील कामे मार्गी लागणार आहेत.

 

पंजाबराव डक यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत असताना अत्यंत महत्त्वाची माहिती शेतकऱ्यांना दिली आहे. मे महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यात जर अवकाळी पावसाने हजेरी लावली, तर ते पुढील पावसासाठी चांगले लक्षण मानले जाते. यासह त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आणखी काही मुद्दे अधोरेखित केले आहेत. जर एखाद्या गावांमधील लाऊड स्पीकर चा आवाज दुसऱ्या गावापर्यंत पोहोचत असेल, चिमण्या मातीमध्ये आपले शरीर घोसळत असतील, ज्या लोकांना दम्याचा त्रास आहे त्यांना दम्याचा त्रास होऊ लागणे, जांभूळ लवकर पिकणे, कडुलिंबाच्या झाडाला जास्त लिंबोळ्या लागणे, विजेच्या दिव्याभोवती कीटक जमा होणे ही सर्व लक्षणे येणाऱ्या काळातील पावसासाठी चांगले संकेत असतात.

 

हवामान खात्याने देखील पावसाबद्दल चांगले संकेत दिले आहेत. हवामान खात्याने शेतकऱ्यांना पावसाचा अंदाज घेऊन पेरणीची सुरुवात करावी असा देखील सल्ला दिला आहे. हवामान खात्याने सांगितलेल्या अंदाजानुसार मान्सून विदर्भासह, मध्य महाराष्ट्र आणि कोकणच्या किनारपट्टी मध्ये सक्रिय होईल. मराठवाड्यात देखील जोरदार पावस पडेल असा अंदाज वर्तवला आहे. तसेच येत्या 24, 25 जूनपासून पावसाचा जोर वाढेल. शेतकऱ्यांना दिलासा देणारा हवामानाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

हेही वाचा: Success Story: शाब्बास! लाल केळीतून 35 लाख उत्पन्न, वाचा इंजिनियर तरुणाची यशोगाथा..

Cow Vs Tiger Fight: अरे बापरे! दबक्या पावलाने गाईने केली वाघाची शिकार, व्हिडिओ होतोय प्रचंड व्हायरल 

Darshana Pawar murder Case: ..म्हणून या किरकोळ कारणासाठी डिलिव्हरी बॉयनेच संपवलं दर्शना पवारला..

Chanakya Niti About Parenting : या 10 गोष्टींची काळजी पालकांनी घेतली पाहिजेच, अन्यथा होईल सत्यानाश 

Monkey drinking alcohol video: पट्ट्याने माकडाला पाजली तब्बल दोन पेग दारू; पाहा व्हिडिओ..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.