Electric scooter: या आहेत 55 हजारांत मिळणाऱ्या पाच दमदार इलेक्ट्रिक स्कूटर; जाणून घ्या अधिक..
Electric scooter: इंधनाचे दर गगनाला भिडले असल्याने, आता अनेकजण इलेक्ट्रिक वाहन खरेदी करताना पाहायला मिळतात. अनेक बड्या कंपन्यानी देखील आता इलेक्ट्रिक वाहन निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे. जर तुम्ही देखील चांगली इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. आज आपण अशा पाच इलेक्ट्रिक स्कूटर विषयी जाणून घेणार आहोत, ज्याची किंमत कमी आणि रेंज तुमच्या अपेक्षेप्रमाणे आहे. (Top 5 electric scooter)
TATA electric bicycle: टाटाची सगळ्यात स्वस्त आणि दमदार सायकल बाजारात दाखल; किंमत आहे केवळ..
बाजारामध्ये अनेक इलेक्ट्रिक स्कूटर (electric scooter) उपलब्ध असल्या, तरी काही इलेक्ट्रिक टू व्हीलरच्या (electric two wheeler) किंमती खूप जास्त असल्याने, अनेकांना इलेक्ट्रिक गाड्या (electric vehicles) खरेदी करणे शक्य होत नाही. असं असलं तरी काही दर्जेदार इलेक्ट्रिक स्कूटर बाजारामध्ये उपलब्ध आहेत. शिवाय या इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती देखील तुमच्या आवाक्यात आहेत. जाणून घेऊया सविस्तर. ..म्हणून महिला शारीरिक संबंध ठेवण्यास नसतात तयार; धक्कादायक म्हणजे याला सर्वस्वी जबाबदार आहेत पुरुष..
Hero Electric Optima CX:
हिरो इलेक्ट्रिक ऑप्टिमा सीएक्स (Hero Electric Optima CX) या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत मात्र 62 हजार 355 रुपये ठेवण्यात आली आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरची ही सुरुवातीची किंमत आहे. मॉडेलनुसार किंमत कंपनीने निश्चित केली आहे. अनेक जण हिरो मोटार कंपनीच्या गाड्या खरेदी करणे पसंत करतात. तुम्ही देखील हिरो कंपनीचे चाहते असाल, तर तुमच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये तुम्हाला 0.55 kW 0.73 bhp मोटर त्याचबरोबर मागील आणि पुढील चाकांना एकत्रित ब्रेकिंग सिस्टीम देखील देण्यात आली आहे.
गेल्या आर्थिक वर्षामध्ये सर्वाधिक विकल्या गेलेल्या यादीत Hero Electric Optima CX या इलेक्ट्रिक स्कूटरने आपले नाव कमावले आहे. ग्राहकांना ही इलेक्ट्रिक स्कूटर दोन प्रकारांमध्ये त्याचबरोबर चार कलरच्या पर्यायांमध्ये खरेदी करता येणार आहे. एका फुल चार्जमध्येही इलेक्ट्रिक स्कूटर तब्बल 122 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करते. ताशी वेग विषयी सांगायचं झाल्यास, ही इलेक्ट्रिक स्कूटर 45 किलोमीटर प्रति तास वेगाने धावते.
Bounce Infinity E1
जर तुमचं बजेट कमी असेल, तर चिंता करण्याची गरज नाही. तुम्हाला केवळ 55 हजार रुपयांमध्ये देखील इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करता येणार आहे. किंमत कमी असली तरी ही इलेक्ट्रिक स्कूटर देखील दमदार आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर तुम्हाला दोन प्रकारात आणि तब्बल पाच कलरमध्ये खरेदी करता येणार आहे. महत्वाचं म्हणजे ही इलेक्ट्रिक स्कूटर ताशी 65 किलोमीटर वेगाने धावते. एका फुल चार्जमध्ये ही इलेक्ट्रिक स्कूटर 85 किलोमीटर प्रवास करते. शिवाय बॅटरी पूर्ण चार्ज होण्यासाठी चार तास वेळ लागतो.
Ampere Zeal
गेल्या आर्थिक वर्षामध्ये सर्वाधिक विक्री झालेली ही इलेक्ट्रिक स्कूटर आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरची सुरुवातीची किंमत 67 हजार 478 रुपये आहे. ग्राहकांनाही इलेक्ट्रिक स्कूटर चार रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. मोटार विषयी जाणून घ्यायचं झाल्यास, या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये तब्बल 1.2 kW 1.6 bhp जनरेट देण्यात आला आहे. समोरील आणि पाठीमागील दोन्ही चाकांना ड्रम ब्रेक सिस्टीम देण्यात आली आहे.
कंपनीने या इलेक्ट्रिक स्कूटरला 60V/30Ah लिथियम-आयन बॅटरी, 12kW ब्रशलेस DC मोटार दिली आहे. फुल बॅटरी चार्ज करण्यासाठी चार्ज करण्यासाठी 5 तासाचा कालावधी लागतो. एका चार्जमध्ये ही गाडी 75 किमी प्रवास पूर्ण करते. ही इलेक्ट्रिक स्कूटर तासी 55 किमी प्रवास पूर्ण करते.
Ampere Magnus Pro:
कंपनीने या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत ६६,०५३ रुपयांपासून पुढे निश्चित केली आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर ग्राहकांना एका प्रकारात आणि चार रंगांमध्ये उपलब्ध होते. पुढील आणि पाठीमागील दोन्ही चाकांना एकत्रित ब्रेकिंग सिस्टीम देण्यात आली आहे. ट्रिक्स स्कूटरची बॅटरी देखील दमदार आहे. 60V, 30Ah लिथियम-आयन बॅटरी पॅक देण्यात आला आहे. ही बॅटरी फुल चार्ज करण्यासाठी चार ते पाच तासाचा कालावधी लागतो. एकदा फुल चार्ज केल्यानंतर, ही इलेक्ट्रिक स्कूटर 85 किलोमीटर पर्यंत प्रवास पूर्ण करते. तसेच या स्कूटरचा वेग ताशी 55 किलोमीटर देण्यात आला.
हे देखील वाचा Mail Motor Service Recruitment 2023: इंडिया पोस्ट विभागात विविध पदांची भरती; या उमेदवारांना मोठी संधी..
physical relationship: संबंध करताना चुकूनही खाऊ नका हे चार पदार्थ अन्यथा..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम