Mail Motor Service Recruitment 2023: इंडिया पोस्ट विभागात विविध पदांची भरती; या उमेदवारांना मोठी संधी..

0

Mail Motor Service Recruitment 2023: भारतीय पोस्ट विभागामध्ये (India Post office) नोकरी करू इच्छित असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. इंडिया पोस्ट ऑफिस अंतर्गत मेल मोटार सर्विसमध्ये (Mail Motor Service) भरती निघाली असून, यासंदर्भातली अधिसूचना जारी करण्यात आली आहे. ही भरती मुंबई या ठिकाणी होणार आहे. पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना, 13 मे 2019 पर्यंत ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. जाणून घेऊया या भरती प्रक्रिया संदर्भात सविस्तर अपडेट. Mail Motor Service Recruitment 2023

रिक्त पदांचा तपशील

भारतीय पोस्ट विभागामध्ये एकूण दहा रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. ही पदे ‘कुशल कारागीर‘ या पदासाठी भरण्यात येणार आहे. यामध्ये विविध पदे आहेत. कोण-कोणत्या पदासाठी किती जागा निश्चित करण्यात आले आहेत, आपण हे सविस्तर जाणून घेऊ. “मेकॅनिकल” या पदासाठी एकूण 3 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. “वेल्डर” या पदासाठी १ रिक्त जागा भरण्यात येणार आहे. “मोटार वाहन इलेक्ट्रिशन‘ या पदासाठी २ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. “टिनस्मिथ” या पदासाठी १ रिक्त जागा भरण्यात येणार आहे. “टायरमन” या पदासाठी १ रिक्त जागा भरण्यात येणार आहे. पेंटर आणि लोहार या पदासाठी १-१ रिक्त जागा भरण्यात येणार आहे.

शैक्षणिक पात्रता 

पोस्ट विभागामध्ये नोकरी करू इच्छित असणाऱ्या उमेदवारांच्या पात्रतेविषयी जाणून घ्यायचे झाल्यास, कोणत्याही मान्यता प्राप्त सरकार संस्थेकडून संबंधित विषयाचे प्रमाणपत्र उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे. सोबतच उमेदवार इयत्ता आठवी पास आणि संबंधित व्यापारामध्ये एका वर्षाचा अनुभव बंधनकारक आहे. “मेकॅनिक” या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे वाहने चालवण्याचा परवाना असणे बंधनकारक आहे.

वयोमर्यादा

इंडिया पोस्ट विभागात नोकरी करू इच्छित असणाऱ्या उमेदवारांचे वय 01 जुलै 2023 रोजी 18 ते 30 या दरम्यान असणे आवश्यक आहे. सरकारी नियमानुसार वयोमर्यादेत सूट दिली जाणार आहे. ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना तीन वर्षाची अतिरिक्त सूट मिळणार आहे. SC/ST या प्रवर्गातील उमेदवारांना 5 वर्षाची अतिरिक्त सूट दिली जाणार आहे.

परीक्षा फी/ पगार/ नोकरीचे ठिकाण

इंडिया पोस्ट विभागामध्ये भरती होणाऱ्या उमेदवारांना दरमहा 19 हजार 900 रुपये पगार दिला जाणार आहे. परीक्षा फी विषयी जाणून घ्यायचं झाल्यास, उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही. निवड करण्यात येणाऱ्या उमेदवारांच्या नोकरीचे ठिकाण हे मुंबईमध्ये असणार आहे.

निवड प्रक्रिया

या भरती प्रक्रियेसाठी आवश्यक असणारी पात्रता पूर्ण केलेला उमेदवार तसेच ज्या उमेदवारांचे ड्रायव्हिंग लायसन वैद्य आहे, अशा उमेदवारांची एक स्पर्धात्मक चाचणी घेतली जाणार आहे. यामधून जे कारागीर कुशल आहेत अशांची निवड केली जाईल. जे उमेदवार या पात्रतेमध्ये बसणार आहेत, अशा उमेदवारांना पत्राद्वारे अभ्यासक्रम कोणता असेल? आणि परीक्षेची तारीख, त्याचबरोबर स्थळ स्वतंत्रपणे निश्चित केले जाणार आहे. जे उमेदवार पात्र नसणार आहेत, अशांना कोणत्याही प्रकारची सूचना दिली जाणार नाही.

असा पाठवा अर्ज:

इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांनी 13 मे 2023 पर्यंत ऑफलाइन पद्धतीने अर्ज पाठवायचा आहे. व्यवस्थापक, मेल मोटर सेवा, जीपीओ कंपाउंड, सिव्हिल लाइन्स, नागपूर-४४००१’. या पत्त्यावर इच्छूक आणि पात्र उमेदवारांना अर्ज पाठवायचा आहे. https://www.indiapost.gov.in/VAS/Pages/IndiaPostHome.aspx यावर क्लिक करून तुम्ही सविस्तर माहिती आणि जाहिरात पाहू शकता.

हे देखील वाचा IPL 2023: तू माझ्या कुटुंबाला शिव्या का दिल्यास..? गंभीर नंतर विराटचंही जशास तसं उत्तर; दोघांच्या भांडणाचे संभाषण आले समोर..

Sharad Pawar: असा घडवला गेला पहाटेचा शपथविधी; शरद पवारांच्या गौप्यस्फोटाने एकच खळबळ..

Dream11 Prediction Tips: Dream11 वर जिंकायचं असेल, तर या पद्धतीने बनवाव्या लागतील 3 टिम्स..

Best Mileage Bike: या चार टू व्हीलरला आहे सर्वात जास्त मायलेज; किंमतही आहे कमी..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.