IPL 2023: तू माझ्या कुटुंबाला शिव्या का दिल्यास..? गंभीर नंतर विराटचंही जशास तसं उत्तर; दोघांच्या भांडणाचे संभाषण आले समोर..

0

IPL 2023: आयपीएल 16च्या हंगामातील 43वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि लखनऊ सुपर जायंट्स royal challengers banglore vs Lucknow super giants) या दोन प्रतिस्पर्धी संघांमध्ये खेळवण्यात आला. हा सामना जितका रोमांचक राहिला, त्याहून रंजक गोष्टी मैदानात आणि मैदानाबाहेर देखील घडल्या. विराट कोहली आणि अफगाणिस्तान खेळाडू नवीन उल हक Virat Kohli and Naveen-ul-haq या दोघांमध्ये मैदानामध्ये झालेल्या गरमागरमीचे पडसाद सामना संपल्यानंतर देखील पाहायला मिळाले. काहीही कारण नसताना गौतम गंभीर (Gautam Gambhir) विराट कोहली भिडला (Virat kohli) आता या भांडणाचे संभाषण समोर आले आहे

विराट कोहली आणि गौतम गंभीर या दोघांच्या राड्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मात्र या दोघांमध्ये संभाषण नक्की काय झाले? याविषयी कोणालाही माहिती नव्हती. आता मात्र या दोघांमध्ये काय संभाषण काय? यासंदर्भात पीटीआयने वृत्त दिले आहे. सामना संपल्यानंतर, दोन्ही संघांच्या खेळाडूंनी एकमेकांशी हात मिळवणी केली. त्यानंतर विराट कोहली आणि काइल मेयर्स खेळाविषयी चर्चा करत होते. मात्र इतक्यात गौतम गंभीर काइल मेयर्सला विराट कोहली पासून बाजूला घेऊन गेला.

दोघांमध्ये असं झालं संभाषण

काइल मेयर्सला गंभीर बाजूला घेऊन गेल्यानंतर, विराटचा देखील पारा चढला. त्यांनतर विराटने गौतम गंभीरला बोलावलं. गौतम गंभीर देखील द्वेषाने आणि रागाने विराट कोहलीकडे गेला. गौतम गंभीर म्हणाला, बोल क्या बोल रहा है। यावर विराट म्हणाला, मैं आपसे कुछ बोल ही नहीं रहा, आप बीच में क्यूं आ रहे हों? यावर गंभीर म्हणाला, तुने मेरे खिलाड़ी बोला मतलब मेरे फैमिली को गाली दी है! यावर विराट म्हणाला, तो तू अपने फैमिली को संभाल। के रख, मुजपर क्यूं छोड़ रहा है? यावर गंभीर म्हणाला, अब तू मुझे सिखाएगा क्या करना है।

दोघांच्या या गरमागरम संभाषणानंतर, केल राहुल अमित मिश्रा आणि इतर काही खेळाडूंनी दोघांना वेगळं केलं. दोघांना वेगळे केल्यानंतर, देखील दोघेही एकमेकांना शिवीगाळ करत असल्याचं बोलले गेलं. गौतम गंभीर विराट कोहलीला तू माझ्या खेळाडूंना बोलला म्हणजे, माझ्या कुटुंबाला शिवीगाळ केलीस. असं बोलून हे भांडण अंगावर ओढून घेतलं. त्यानंतर मग विराट कोहली देखील मग तू तुझ्या फॅमिलीला सांभाळ असं म्हणाला. त्यानंतर गौतम गंभीर देखील तू मला शिकवणार का? मी काय करायला पाहिजे, असं म्हणाला आणि हे संभाषण संपले.

के एल राहुलचा केला अपमान

दोघांमध्ये अशा प्रकारचे संभाषण झाल्यनंतर, दोघांना वेगळे करण्यात आलं. त्यानंतर विराट कोहलीने के एल राहुल सोबत दीर्घकाळ संवाद साधला. घडलेला सविस्तर घटनाक्रम विराट कोहलीने सांगितला. हा संवाद साधत असताना नवीन उल हक देखील जवळून जात होता. त्यावेळी राहुलने त्याला विराट कोहली सोबत बोलून भांडण मिटवण्याची विनंती केली. मात्र मी येणार नाही, असं स्पष्ट सांगून त्याने केएल राहुलचा देखील अपमान केला. हा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हे देखील वाचा Virat Kohli Gautam Gambhir fight: भांडण नवीन उल हकशी झालं मग माज गंभीरने का दाखवला? हे आहे त्यामागचं मूळ कारण, पाहा तो व्हिडिओ..

RCB vs LSG: विराट कोहलीच्या त्या कृत्यामुळे नवीन उल हलने कोहलीला ढकलले; पाहा दोन्ही व्हिडिओ..

Sharad Pawar: असा घडवला गेला पहाटेचा शपथविधी; शरद पवारांच्या गौप्यस्फोटाने एकच खळबळ..

New Sand Policy: महसूल विभागाचा ऐतिहासिक निर्णय! 7000 ब्रासची वाळू आता मिळणार केवळ 600 रुपयांत; जाणून घ्या सविस्तर..

Dream11 Prediction Tips: Dream11 वर जिंकायचं असेल, तर या पद्धतीने बनवाव्या लागतील 3 टिम्स..

TATA electric bicycle: टाटाची सगळ्यात स्वस्त आणि दमदार सायकल बाजारात दाखल; किंमत आहे केवळ..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.