Best Selling Bike: 72 हजार किंमत, 80.6 मायलेज असणाऱ्या या गाडीचा नवा विक्रम; या आहेत भारतात सर्वाधिक विकल्या गेलेल्या पाच टू-व्हीलर..
Best Selling Bike: भारतामध्ये टू व्हीलर (two wheeler) गाड्यांच्या अनेक कंपन्या आहेत. टू व्हीलर खरेदीमध्ये ग्राहकांना अनेक सारे पर्याय देखील मिळतात. कमी किमतीत दर्जेदार टू-व्हीलर खरेदी करण्याचं अनेकांचे स्वप्न असतं. यासाठी ग्राहक अनेक गाड्यांचे फीचर्स, किंमत मायलेज आणि कंपनी कोणती आहे? या सगळ्या गोष्टीचा विचार करूनच टू-व्हीलर खरेदी करतात. जर तुम्ही देखील चांगली टू-व्हीलर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.
टू-व्हीलर गाड्यांमध्ये काकांना आता विविध पर्याय उपलब्ध झाले आहेत. साहजिकच यामुळे कोणत्या कंपनीची बाईक खरेदी करायची? याविषयी कमालीचं कन्फ्युजन देखील असल्याचं पाहायला मिळतं. बरेचसे ग्राहक खास करून बजाज (Bajaj) होंडा (Honda) आणि हिरो (Hero) या तीन मोटार कंपनीच्या (two wheeler motor company) टू व्हीलर अधिक खरेदी करतात. आता या तीन कंपन्या मधून सर्वात दमदार टू-व्हीलर कोणती आहे? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल, तर या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मिळणार आहे.
2023 या आर्थिक वर्षामध्ये हिरो या कंपनीने (Hero motocorp) सर्व मोटार कंपन्यांना मागे टाकले आहे. अनेक वर्ष ग्राहकांच्या मनावर राज्य करणाऱ्या हिरो स्प्लेंडर या गाडीने पुन्हा एकदा 2023 मध्ये देखील पहिला क्रमांक पटकावला आहे. 2023 मध्ये सर्वाधिक विकली गेलेली बाईक म्हणून स्प्लेंडरने (Hero splendor) पुन्हा एकदा नवा विक्रम केला आहे. 2022- 23 या आर्थिक वर्षांमध्ये तब्बल 32 लाख युनिट विकण्याचा विक्रम या गाडीने केला आहे.
2021/22 च्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत हिरो स्प्लेंडर प्लस या गाडीने 22% हून अधिक विक्री केली आहे. या पाठोपाठ होंडा कंपनीच्या शाईन या गाडीचा नंबर लागतो. होंडा कंपनीने देखील मायलेजचा विचार करून, स्प्लेंडरला टक्कर देण्यासाठी shine चे 100cc व्हेरियंट बाजारात उतरवले होते. (Honda CB Shine) गेल्या अनेक वर्षांपासून हिरो स्प्लेंडर या बाईकने ग्राहकांच्या मनावर राज्य केलं आहे. आज पुन्हा एकदा ग्राहकांच्या हृदयात स्थान निर्माण करण्यात या गाडीला यश आलं आहे.
या आहेत टॉप 5 टू व्हीलर
2022 23 आर्थिक वर्षामध्ये देशात सर्वाधिक विकल्या गेलेल्या पाच बाईक विषयी जाणून घ्यायचं झाल्यास, दुसरा क्रमांक होंडा शाईन (honda CB Shine) या गाडीचा लागतो. मात्र हिरो स्प्लेंडर या गाडीच्या तुलनेत होंडा सीबी शाईनची तीन पट कमी विक्री झाले आहे. 2023 मध्ये हिरो स्प्लेंडर या गाडीचे 32 लाख युनिट्स विकले गेले आहेत. तर होंडा सीबी शाईन या गाडीचे केवळ 12.9 लाख युनिट्स विकले गेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, हिरो एचएफ डीलक्स या गाडीने देखील वर्षभरात 10.5 लाख युनिट्स विकले आहेत.
हिरो एचएफ डीलक्स या बाईकची वर्षभरात नऊ टक्क्यानी घसरण झाली आहे. मात्र तरीदेखील हिरो कंपनीच्या दोन गाड्या पहिल्या पाचमध्ये आल्या आहेत. बजाज कंपनीला अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर स्थान मिळाले आहे. बजाज पल्सरच्या (Bajaj Pulsar) विक्रीत मोठी वाढ झाली आहे. 2023 आर्थिक वर्षांमध्ये बजाज कंपनीच्या पल्सर या बाईकची विक्री तब्बल 32% हून अधिक झाली आहे. बाईकने 10.29 युनिटची विक्री केली आहे. बजाज कंपनीच्या प्लॅटिना (Bajaj platina) या बाईकने पाचवा क्रमांक पटकावला आहे. बजाज कंपनीच्या प्लॅटिना या बाईकच्या विक्रीमध्ये ७ टक्क्यांनी घट झाली आहे, मात्र तरी देखील वर्षभरात 5.34 लाख युनिट्सची विक्री करून या बाईकने पाचवा क्रमांक पटकावला आहे.
हे देखील वाचा Redmi Smartphone: Redmi Note 12 वर आतापर्यंतचा सर्वात मोठा सेल; या वेबसाईटवरून आजच करा ऑनलाइन ऑर्डर..
Jio Recharge Plan: ग्राहकांची चांदी! जिओने सुरू केला 388 दिवसांचा हा दमदार रिचार्ज प्लॅन..
Second Hand Bike: नवी कोरी Hero HF Deluxe मिळतेय 25 हजारात, तर Hero passion Pro मिळतेय 30 हजारात..
Ajinkya Rahane: सूर्यकुमार यादवचा पत्ता कट; अजिंक्य रहाणेला मिळणार ही मोठी जबाबदारी..
Bank of Baroda Recruitment 2023: बँक ऑफ बडोदामध्ये मेगा भरती; या उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम