Relationship Tips: कमी वेळेत पार्टनरला संतुष्ट करायचंय? जाणून घ्या संबंधाचा हा फंडा..
Relationship Tips: वैवाहिक जीवनात (married life) शारीरीक संबंधाला खूप महत्त्व आहे. नात्यात ओलावा, गोडवा टिकून ठेवण्यासाठी संबंध खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. नात्यामध्ये विश्वास, गोडवा आपुलकी, या गोष्टी असतील, तर नातं अधिक मजबूत होतं. नात्यामध्ये या गोष्टी फक्त संबंधांमुळेच येतात, असं नाही. मात्र संबंधाचा या गोष्टींमध्ये महत्त्वाचा रोल आहे. लैंगिक आयुष्य उत्तम असेल, तर नात्यांमध्ये येणाऱ्या अनेक अडचणी दूर होतात. आणि म्हणून लैंगिक संबंधा विषयी काही गोष्टी तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे.
तुम्ही अनेकदा ऐकलं असेल, संबंधाची वेळ अधिक असल्यास तुमचा जोडीदार समाधानी आणि संपुष्ट होतो. हे जरी खरं असलं तरी तुम्ही या शिवाय तुमच्या पार्टनरला संतुष्ट करू शकता. जेव्हा तुम्ही संबंध ठेवण्यासाठी तयार होता, तेव्हा तुम्ही तुमच्या पार्टनरला विश्वासात घेणं आवश्यक असतं. पार्टनरच्या काय अपेक्षा आहेत? हे संबंधापूर्वी जाणून घ्या. पार्टनर मूडमध्ये नसेल, तर अधिक फोर्स करू नका. मूडमध्ये आणण्यासाठी तुम्ही काही गोष्टी करू शकता, मात्र जबरदस्ती नको.
पुरुषांच्या तुलनेत महिलांची संबंध ठेवण्याची इच्छा उशिरा जागृत होते. एका रिसर्चनुसार जेव्हा पुरुषाच्या संबंधाची वेळ संपते, तेव्हा महिलांच्या संबंधाची वेळ सुरू होते. अनेकदा पुरुष लवकर शांत होतो. ही गोष्ट पुरुषांनी कदापि विसरून चालत नाही. जर वैवाहिक आणि लैंगिक आयुष्य समाधानी हवं असेल, तर तुम्हाला या गोष्टी माहिती असायलाच हव्यात.
संबंधासाठी महिलांची इच्छा उशिरा जागृत होते. आणि म्हणून यासाठी पुरुषांनी संबंधपूर्वी फोर प्लेला अधिक महत्त्व द्यायला हवं. संबंधपूर्वी तुम्ही ‘फोर प्ले’ ला जितका अधिक वेळ द्याल, तितके जास्त तुम्ही महिलांना संतुष्ट करू शकता. जर तुम्हाला फोर प्ले काय आहे? माहित नसेल, तर आपण हे सोप्या भाषेत समजून घेऊ. फोर प्ले म्हणजे, वॉर्मअप. खेळ कोणताही असो, वॉर्म अप खूप आवश्यक असतो. याबाबत देखील हाच नियम लागू होतो.
संबंध हा कधीही एकाच पोझिशनच्या माध्यमातून पूर्ण करण्याऐवजी तुम्ही विविध पोझिशन बदलणे आवश्यक असते. अनेक पोझिशनचा आनंद घेतल्यानंतर, तुमचा पार्टनर आणि तुम्ही देखील खूप समाधानी आणि संतुष्ट होता. याशिवाय तुमच्या पार्टनरला कोणती पोझिशन आवडते? ही गोष्टी देखील तुम्ही जाणून घेणे आवश्यक आहे. संबंधा दरम्यान तुम्ही चावट संभाषण करणे देखील आवश्यक आहे.
भारतामध्ये या विषयावर महिला अधिक बोलत नाहीत. खास करून खेडेगावात. मात्र ही खूप चुकीची पद्धत आहे. आणि याला सर्वस्वी जबाबदार पुरुषच असतात. कारण अशा विषयांवर महिलांना बोलतं करणं ही पुरुषांची जबाबदारी आहे. तुम्ही या विषयावर महिलांशी बोलत नसल्याने, महिला या विषयावर चर्चा करणे टाळतात. साहजिकच चर्चा न केल्यामुळे तुम्हाला तुमचे लैंगिक आयुष्य सुखी आणि समाधानी आहे की नाही, याविषयी माहिती मिळत नाही. पुढे हीच गोष्ट नात्यांमध्ये कटूता निर्माण करण्यास कारणीभूत ठरते.
हे देखील वाचा Railway Recruitment 2023: दहावी आणि ITI झालाय? मग रेल्वेमध्ये मिळवा नोकरी; जाणून घ्या डिटेल्स..
NABARD Loan Scheme: शेळीपालनासाठी नाबार्ड देतंय अडीच लाख अनुदान; लगेच करा अर्ज..
business idea: एकही रुपया न गुंतवता घरबसल्या या पाच ऑनलाईन व्यवसायातून करा लाखोंची कमाई..
PM Kusum Yojana: सौर पंपासाठी सरकार देतंय 90 टक्के अनुदान; लगेच करा अर्ज..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम
Comments are closed.