Workout tips: हे घरगुती उपाय देतील जिमसारखी बॉडी आणि फिटनेस.

0

Workout tips: मागील दोन वर्ष देशात कोरोनाचे सावट होते. लॉकडाऊन असल्याने सगळ्यांनाच घरात बसून राहावे लागले होते. त्यावेळी जिम, योगा सेंटर सगळंच बंद होतं. ‘वर्क फ्रॉम होम’ असल्यामुळे लोकांना घरातून कामे करावी लागत होती. दिवसांनी रात्र घरातच काढावी लागत असल्याने, अनेकांसमोर फिनेसची मोठी समस्या निर्माण झाली होती. मात्र अनेकांनी घरीच वर्कआउट करून स्वतःला फिट देखील ठेवलं होतं. जर तुम्हाला देखील जिम करण्यासाठी वेळ मिळत नसेल तर तुम्ही घरीच वर्कआउट करून जिम प्रमाणे स्वतःला फिट ठेवू शकता. जाणून घेऊया सविस्तर.

घरातच व्यायाम करून आपण आपले वजन कमी करू शकतो. अनेक लोकांना कामाच्या व्यापामुळे जिमला जाणे शक्य नसते. अशावेळी अनेकांसमोर वजन कमी करण्यासंदर्भात मोठं आव्हान असतं. वजन कमी करायचे असेल, किंवा फिट रहायचे असेल तर जिमला जाणे गरजचे असते. अशी धारणा अनेकांची असते. मात्र घरात व्यायाम करून देखील आपण स्वतःला फिट ठेऊ शकतो. त्यासाठी तुम्हाला कोणते व्यायाम करावे लागतील? आपण माहिती घेऊ.

पायऱ्यांचा व्यायाम: तुम्हाला जर फिट रहायचे असेल, किंवा वेट लॉस करायचे असेल, तर त्यासाठी पायऱ्यांचा व्यायाम हा महत्वाचा ठरतो. तुम्ही हा व्यायाम जितका जास्त वेळ कराल तेवढ्या तुमच्या कॅलरी बर्न होतील. आणि वजन कमी व्हायला मदत होईल. तुम्ही १५ मिनिटे हा व्यायाम केला तरी भरपूर आहे. हा व्यायाम करण्यासाठी पहिल्या दिवशी ५ मिनिटे करा. जेणेकरून तुमचे पाय दुखणार नाहीत. एकदा नियमित सुरू केला तर तुम्ही १५ मिनिटे हा व्यायाम करू शकता.

स्पिंट्स: वजन कमी करण्यासाठी आणि स्वतःला फिट ठेवण्यासाठी स्पिंट्स हा चांगला व्यायाम आहे. हा व्यायाम करताना आधी वॉर्म अप करावे लागते. त्यासाठी आधी थोडे चाला. नंतर चालण्याची गती वाढवा. हळू हळू पळाले तर उत्तमच. १०-१५ मिनिटे तुम्ही याप्रकारे व्यायाम केला तर तुमचे वजन कमी होण्यास मदत होणार आहे. मग स्पीडमध्ये स्प्रिंट करा. हा व्यायाम आपण घरात हॉलमध्ये देखील करू शकतो. याशिवाय बाहेर मैदानात किंवा घराच्या छतावर देखील करू शकतो. फिट रहाण्यासाठी हा सर्वोत्तम व्यायाम आहे.

सूर्यनमस्कार: सूर्यनमस्कार हा अतिशय उत्तम व्यायाम आहे. या व्यायामामुळे तुम्ही फक्त फिटच राहत नाही, तर तुम्ही तरुण दिसण्यास देखील मदत होते. हा व्यायाम केल्याने, तुम्ही दिवसभर फ्रेश मूडमध्ये असता. याच्यासाठी तुम्हाला कोणतेच साधन लागत नाही. तसेच जास्त जागा देखील लागत नाही. हा अतिशय चांगला कार्डिओ व्यायाम आहे. सुरुवातीला तुम्ही रोज ५ सूर्यनमस्कार करा. त्यानंतर हळू हळू तुमचा वेळ वाढवा. हा व्यायाम करताना श्वासावर लक्ष केंद्रित करा. सूर्यनमस्कार केल्याने शरीराचे अनेक प्रॉब्लेम नाहीसे होतात.

दोरीवरच्या उड्या: उड्या मारणे हा देखील अतिशय सोपा, फायदेशीर आणि कोणत्याही साधनांशिवाय करण्याचा व्यायाम आहे. या व्यायामात तुमच्या अनेक कॅलरी बर्न होतात. त्यामुळे झटपट वजन कमी होण्यास मदत होते. तुम्ही दोरीच्या सहाय्याने देखील हा व्यायाम करू शकता. दोरी नसेल, तरीही करू शकता. एकदा व्यायाम सुरु केला, तर किमान ३० सेंकंद तुम्ही उड्या मारत रहा. नंतर ३० सेंकंद आराम करा, पुन्हा व्यायाम करत रहा. अशा पद्धतीने तुम्ही घरगुती व्यायाम करून फिट राहू शकता.

बर्पीज: कॅलरी बर्न करण्यासाठी बर्पीज हा इफेक्टिव्ह व्यायाम आहे. हा व्यायाम जर नियमित केला, तर तुमची इम्युनिटी पावर वाढण्यास मदत होईल. हा संपूर्ण शरीराचा व्यायाम असल्याने सगळ्या शरीरावर ताण पडतो आणि वजन कमी होण्यास मदत होते. हा व्यायाम केल्याने हृदय आणि फुफ्फुस मजबूत राहते. रक्त प्रवाह देखील सुरळीत राहतो. तसेच शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी सुधारते आणि मेंदूच्या कार्यास देखील मदत होते.

हे देखील वाचा Tractor Subsidy Scheme: शेतकऱ्यांनो आता ट्रॅक्टर घेणे झाले सोपे; सरकार देतेय ३ लाख रुपये अनुदान..

How To Get Sleep Early: रात्री चांगली झोप लागत नसेल तर करा हे काम झटक्यात लागेल झोप..

Breast Shape Tips: सैल झालेले ब्रेस्ट या घरगुती उपायांनी बनवा सुडोल आणि आकर्षक..

Virat Kohli: विराट कोहलीचा सोनाक्षी सिन्हासोबत भन्नाट डान्स; व्हिडिओ सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ..

Physical relationship tips: ..म्हणून महिला शारीरिक संबंध ठेवण्यास नसतात तयार; धक्कादायक म्हणजे याला सर्वस्वी जबाबदार आहेत पुरुष..

Foreplay benefits: ..तरच महिला होतात संतुष्ट, जाणून घ्या शारीरिक संबंधामध्ये फोरप्लेचे महत्त्व..

AIESL Recruitment 2023: Air India इंजिनिअरिंग सर्विसेसमध्ये मोठी भरती; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.