AIESL Recruitment 2023: Air India इंजिनिअरिंग सर्विसेसमध्ये मोठी भरती; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

0

AIESL Recruitment 2023: देशात बेरोजगारीचे खूप मोठ्या प्रमाणात असल्याचं पाहायला मिळते. उच्च शिक्षण घेऊन देखील अनेकांना चार पैशाची नोकरी मिळवण्यासाठी झगडावं लागत आहे. मात्र तरीदेखील तुम्हाला प्रयत्न करणं सोडून चालत नाही. तुम्हीही जर इंजिनिअरिंग आणि ITI चे शिक्षण घेतले असेल तर तुमच्यासाठी ही खूप मोठी संधी आहे. Air India इंजिनिअरिंग सर्विसेस अंतर्गत मेगा भरती घेण्यात येत असून या संदर्भातली अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस अंतर्गत घेण्यात येणाऱ्या भरतीसाठी उमेदवारांना 20 मार्चपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. मुंबई येथे या रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. यामध्ये एकूण 371 जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी अर्ज कसा करायचा ? कागदपत्रे कोणती लागतील ? परीक्षा फी काय ? वयाची अट किती आहे ? पगार किती मिळेल ? ऑनलाईन अर्ज कसा भरायचा याबाबत आपण सविस्तर माहिती जाणून घेऊ.

एकूण पदे आणि पदाचे नाव: एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लि. मुंबई येथे ही पदे भरण्यात येत आहेत. एकूण ३७१ पदांसाठी ही भरती राबवण्यात येणार आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २० मार्च निश्चित करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. यात एयरक्राफ्ट टेक्निशियन A&C ची 296 पदे भरण्यात येणार आहेत. स्किल्ड टेक्निशियनची 75 पदे आहेत. त्यात फिटर आणि शीट मेटल, पेंटर, टेलर, अपहोल्स्ट्री, वेल्डर, ड्राफ्ट्समन-मेकॅनिकल इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स कारपेंटर, मेकॅनिकल रेफ, मेकॅनिकल मोटर व्हेईकल या पदासांठी भरती होणार आहे.

शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा: एयरक्राफ्ट टेक्निशियन या पदासाठी उमेदवार 60 टक्के गुणांसह मेकॅनिकल, एव्हिओनिक्स किंवा मेकॅनिकल, एरोनॉटिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, टेलीकम्युनिकेशन, रेडिओ, इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. SC/ST/OBC मधील उमेदवार 55 टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच त्याला 1 वर्षाचा अनुभव किंवा एयरक्राफ्ट मेंटेनेंस अप्रेंटिस पूर्ण असणे आवश्यक आहे.

एयरक्राफ्ट टेक्निशियन या पदासाठी उमेदवार 60 टक्के गुणांसह AME मेकॅनिक एव्हिओनिक्स, किंवा मेकॅनिकल, एरोनॉटिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स, टेलीकम्युनिकेशन, रेडिओ, इन्स्ट्रुमेंटेशन, इंजिनिअरिंग डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. SC त्याचबरोबर ST आणि OBC उमेदवाराला 55 टक्के गुण असणे आवश्यक आहे. तसेच त्याला 1 वर्ष अनुभव किंवा एयरक्राफ्ट मेंटेनेंस अप्रेंटिस देखील असायला हवा.

तसेच स्किल्ड टेक्निशियन या पदासाठी उमेदवार दहावी उत्तीर्ण तसेच संबंधित ट्रेड मध्ये ITI, एव्हिएशन क्षेत्रात 1 वर्ष अनुभव किंवा संबंधित ट्रेडमध्ये 2 वर्षे अनुभव असावा. या पदांसाठी उमेदवाराचे 1 मार्च 2023 रोजी 18 ते 35 वर्षे वय असावे. SC/ST उमेदवारांना सरकारी अटीनुसार वयोमर्यादेत 5 वर्षे सूट दिली जाणार आहे. तर OBC उमेदवारांना 3 वर्षे सूट दिली जाणार आहे.

आरक्षणानुसार पदे आणि परीक्षा फी

Aircraft Technicians या पदासाठी SC- 29 पदे, ST- 26 पदे, OBC- 79 पदे, EWS- 30 पदे आणि UR- 132 पदे असे एकूण 296 पदे भरली जाणार आहेत. Skilled Tradesmen या पदासाठी SC- 7 पदे, ST- 5 पदे, OBC- 18 पदे, EWS- 7 आणि UR- 37 असे एकूण 74 पदे भरली जाणार आहेत. या परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी जनरल/ओबीसी उमेदवारांना 1000 तर SC/ST/ExSM या उमेदवारांना 500 रुपये परीक्षा फी असणार आहे.

वेतन आणि निवड प्रक्रिया

उमेदवारांना दरमहा 25 हजार एवढा पगार मिळेल. सगळ्या पदांच्या उमेदवाराला मुंबईत नोकरी करावी लागेल. या पदासाठी आधी लेखी परीक्षा होईल. नंतर वैयक्तिक मुलाखत आणि मग वैद्यकीय चाचणी होणार आहे. जाहिरात पाहण्यासाठी यावर क्लिक करा  https://www.aiesl.in/ ही अधिकृत वेबसाईट आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिं.  यावर क्लिक करा.

हे देखील वाचा Smriti Mandhana: तब्बल २३ वर्षाने मोठ्या व्यक्तीच्या प्रेमात आहे स्मृती मानधना; स्वतःच खुलासा केल्याने उडाली खळबळ..

ShivSena: ठाकरे हाच आमचा पक्ष आणि चिन्ह असं म्हणत तरुणाने सोडला प्राण; राज्यात एकच खळबळ..

BOB Recruitment 2023: बँक ऑफ बडोदामध्ये तब्बल इतक्या जागांसाठी होणार भरती, लगेच करा अर्ज..

Physical relationship tips: ..म्हणून महिला शारीरिक संबंध ठेवण्यास नसतात तयार; धक्कादायक म्हणजे याला सर्वस्वी जबाबदार आहेत पुरुष..

Viral video: शिकारी झाला स्वतःच शिकार, बेडूक आणि सापाचा अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ व्हायरल..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.