ShivSena: “ठाकरे हाच आमचा पक्ष आणि चिन्ह” असं म्हणत तरुणाने सोडला प्राण; राज्यात एकच खळबळ..

0

ShivSena: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केल्यापासून राज्यात राजकीय समीकरणं बदलून गेली. चाळीस आमदाराला सोबत घेऊन एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर, राज्यात देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) आणि एकनाथ शिंदे यांचं सरकार अस्तित्वात आलं. एकनाथ शिंदे आणि भाजपने फक्त महाविकास आघाडीचे सरकार पाडलं नाही, तर शिवसेना पक्ष आणि चिन्हावर देखील दावा ठोकला. अखेर निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांना देत सर्वांनाच धक्का दिला.

शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोगाने शिंदे गटाला दिल्यानंतर, ठाकरे गटाच्या शिवसैनिकांपासून राज्यातील जनतेला देखील हा निर्णय पटला नसल्याचं पाहायला मिळत आहे. निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय हा अन्यायकारक असल्याचं म्हणत अनेकांनी संताप व्यक्त केला. मात्र असं असलं तरी आता अधिकृतरित्या शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला मिळालं आहे.

उद्धव ठाकरे गटाच्या शिवसैनिकांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर आहे. बहुमताला महत्व देऊन लोकशाहीचा विजय झाला, असं म्हणत शिंदे गटातील शिवसैनिकांनी राज्यभर जल्लोष साजरा केला आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात देखील दाद मागितली आहे. निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे नाव शिंदे गटाला दिल्यानंतर अनेक शिवसैनिकांनी आमचा पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे, आमचे चिन्ह उद्धव बाळासाहेब ठाकरे अशा आशयाचे बॅनर्स सोशल मीडियावर झळकवले.

अशाच एका कडवट शिवसैनिकाने आपल्या सोशल अकाउंटवरून आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत असल्याच्या काही पोस्ट एक दिवस अगोदर केल्या. जरी निवडणूक आयोगाने आमच्याकडून शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह चोरून शिंदे गटाला दिले असले, तरी देखील आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबतच आहोत. कालही होतो, आजही आहे. आणि उद्याही असणारच. अशा पोस्ट त्याने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून पोस्ट केल्या.

उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या समर्थनार्थ या तरुणाने आदल्या दिवशी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून अनेक भावनिक पोस्ट केल्या. अहमदनगर जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातला हा तरुण असून, या तरुणाचं नाव प्रवीण अनभुले (Pravin anabhule) असं आहे. हा तरुण 32 वर्षाचा आहे. कर्जत (karjat) तालुक्यातील ‘घुमरी’ (ghumri) असं या तरुणाच्या गावाचे नाव आहे. हा तरुण कट्टर शिवसैनिक होता. उद्धव ठाकरे यांच्या पाठिंबाच्या अनेक भावनिक पोस्ट त्याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून केल्यानंतर, दुसऱ्याच दिवशी हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूने तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

प्रवीण हा सोशल मीडियावर प्रचंड ऍक्टिव्ह होता. शिवसेनेच्या समर्थनार्थ तो सोशल मीडियावर अनेक भावनिक पोस्ट गेल्या काही दिवसांपासून सातत्याने करत होता. मृत्यूच्या एक दिवसापूर्वी त्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी देखील आपण उद्धव बाळासाहेब ठाकरे सांगतील तोच पक्ष, आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे सांगतील, तेच आमचे चिन्ह. असं म्हणत आपले प्राण सोडले. त्याच्या मृत्यूची बातमी वाऱ्यासारखी पसरली. सोशल मीडियावर तो कमालचा ऍक्टिव्ह असल्याने, त्याच्या अंत्यसंस्कारसाठी प्रचंड जनसागर लोटला होता.

हे देखील वाचा BOB Recruitment 2023: बँक ऑफ बडोदामध्ये तब्बल इतक्या जागांसाठी होणार भरती, लगेच करा अर्ज..

Physical relationship tips: ..म्हणून महिला शारीरिक संबंध ठेवण्यास नसतात तयार; धक्कादायक म्हणजे याला सर्वस्वी जबाबदार आहेत पुरुष..

Viral video: शिकारी झाला स्वतःच शिकार, बेडूक आणि सापाचा अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ व्हायरल..

Electric bike: ८० रुपयांत ८०० किमी धावते ही E-Bike; ड्रायव्हिंग लायसन्सचीही गरज नाही..

Vastu Tips: तुमच्या घरात हे झाड असेल तर लक्ष्मी येईल धावत; सुख समाधानही राहील कायम दरवळत..

Bajaj electric scooter: बजाज कंपनीची ही इलेक्ट्रिक स्कूटर मिळतेय अवघ्या 15 हजारांत; ग्राहकांची खरेदीसाठी झुंबड..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.