Smriti Mandhana: तब्बल २३ वर्षाने मोठ्या व्यक्तीच्या प्रेमात आहे स्मृती मानधना; स्वतःच खुलासा केल्याने उडाली खळबळ..

0

Smriti Mandhana: भारत आणि ऑसट्रेलिया (INDvsAUS) यांच्यामध्ये काल खेळल्या गेलेल्या पहिल्या सेमीफायनल (semifinal) सामन्यात भारताचा पाच धावांनी पराभव झाला. आणि दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या महिला t20 विश्वचषकामधील भारतीय महिला संघाचे अस्तित्व संपुष्टात आले. भारतीय संघाचा अवघ्या पाच धावांनी निसटता पराभव झाला असल्यामुळे, हा पराभव खेळाडूंसह क्रिकेट चाहत्यांच्या देखील जिव्हारी लागला आहे. सुरुवातीला शिपाली वर्मा (shafali verma) आणि स्मृती मानधना हे दोन्ही सलामीवीर स्वस्तात बाद झाल्यामुळे याचा फटका भारतीय संघाला बसला. (Women T20 World Cup 2023)

भारताची स्टार सलामीवीर स्मृती मानधनाच्या खांद्यावर महत्त्वाच्या सामन्यात धावा करण्याची मोठी जबाबदारी असते. मात्र यावेळी ती अपयशी ठरल्याने, याचा फटका भारतीय संघाला मोठ्या प्रमाणात बसला. ऑस्ट्रेलिया आणि भारतासमोर 173 धावांचे आव्हान ठेवले होते. या धावांचा पाठलाग करताना सलामीवीर स्मृतीला केवळ दोन धावा करता आल्या. अशातच आता तिचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान वायरल होत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओत, क्रिकेटर स्मृती मानधनाने आपल्या खाजगी आयुष्याविषयी अनेक मोठे खुलासे केले आहेत. उत्कृष्ट खेळाबरोबरच स्मृतीने क्रिकेटच्या चाहत्यांना आपल्या सौंदर्याची देखील भुरळ पाडली आहे. अनेक तरुणांची स्मृती क्रश देखील आहे. या संदर्भातले अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल देखील होत असतात. स्मृति अनेकांची क्रश आहे. मात्र स्मृतीच्या क्रश कोण आहे? हे तुम्हाला माहीत आहे का?

स्मृती मानधनाने स्वतः एका कार्यक्रमात आपल्या क्रशबद्दल उघडपणे भाष्य केलं आहे. Amazon prime वर झालेले एका कार्यक्रमांमध्ये तिला रॅपिड फायर प्रश्न विचारण्यात आले. रॅपिड फायर प्रश्नांची स्मृतीने देखील दिलखुलास उत्तरे दिली. तिच्या सेलिब्रेटी क्रश विषयी तिला विचारण्यात आले. यावर मानधना म्हणाली, मला ऋतिक रोशन (ritik roshan) हा अभिनेता प्रचंड आवडतो. तो माझा लहानपणापासून क्रश राहिला आहे. मला तो खूप स्टायलिश वाटतो. त्याची स्टाईल मला प्रचंड भावते. असे विधान तिने केलं आहे.

या कार्यक्रमात स्मृतीला आपल्या खासगी आयुष्याविषयी अनेक प्रश्न विचारण्यात आले. या कार्यक्रमात स्मृतीला विचारले, तू जर क्रिकेटर नसती तर काय झाली असती? यावर ती म्हणाली, मला स्वयंपाक करायला खूप आवडतो. क्रिकेटर होऊ शकले नसते, तर मी शेफ झाले असते. स्मृतीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान वायरल झाला असून, या व्हिडिओला अनेकांनी पसंत केलं आहे.

या विश्वचषकामध्ये स्मृतीने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत, तीन सामन्यांमध्ये 10, 52, 87, अशी खेळी करत भारताला सेमीफायनलमध्ये पोहोचवण्यात मोठा वाटा उचलला होता. साहजिकच यामुळे सेमीफायनलमध्ये देखील स्मृतीच्या खेळाकडून भारतीय चाहत्यांना मोठी आशा होती. मात्र स्मृती स्वस्तात बाद झाल्याने, भारतीय संघाला या सामन्यात पराभवाला देखील सामोरे जावे लागले.

हे देखील वाचा BOB Recruitment 2023: बँक ऑफ बडोदामध्ये तब्बल इतक्या जागांसाठी होणार भरती, लगेच करा अर्ज..

ShivSena: “ठाकरे हाच आमचा पक्ष आणि चिन्ह” असं म्हणत तरुणाने सोडला प्राण; राज्यात एकच खळबळ..

Physical relationship tips: ..म्हणून महिला शारीरिक संबंध ठेवण्यास नसतात तयार; धक्कादायक म्हणजे याला सर्वस्वी जबाबदार आहेत पुरुष..

Viral video: शिकारी झाला स्वतःच शिकार, बेडूक आणि सापाचा अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ व्हायरल..

Electric bike: ८० रुपयांत ८०० किमी धावते ही E-Bike; ड्रायव्हिंग लायसन्सचीही गरज नाही..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.