Breast Shape Tips: सैल झालेले ब्रेस्ट या घरगुती उपायांनी बनवा सुडोल आणि आकर्षक..

0

Breast Shape Tips: प्रत्येक स्त्रीला आपली ब्रेस्ट शेपमध्ये हवी असते. त्यामुळे त्या कायम प्रयत्न करत असतात. शरीरात होणाऱ्या बदलांनुसार स्रियांच्या ब्रेस्टचा आकार कमी जास्त होत असतो. काही स्रिया ब्रेस्टचा आकार वाढवण्यासाठी प्रयत्न करत असतात, तर काही स्रिया तो कमी करण्याचा प्रयत्न करत असतात. स्रियांना ब्रेस्ट कमी, जास्त करण्यासाठी आता अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. हॉस्पिटममध्ये देखील यावर उपचार केले जातात. तसेच ब्रेस्ट शेपमध्ये ठेवण्यासाठी अनेक क्रीमचा वापर देखील केला जातो. मात्र या क्रीम शरीरासाठी हानिकारक ठरू शकतात. आणि म्हणून आपण आज काही घरगुती उपाय करून ब्रेस्ट आकर्षक करण्यासंबंधीत जाणून घेणार आहेत.

गर्भधारणा झाल्यावर ब्रेस्टमध्ये अनेक बदल होतात. ब्रेस्टचाआकार वाढतो, ते लूज होतात. आणि ब्रेस्टचा पूर्ण शेपच बदलून जातो. अशावेळी स्रिया आपली ब्रेस्ट शेपमध्ये येण्यासाठी, कमी करण्यासाठी किंवा जास्त करण्यासाठी अनेक प्रयत्न करतात. मात्र तरी देखील हवा तसा आकार मिळत नाही. मात्र आता तुम्हाला फारसी मेहनत घेण्याची आवश्यकता नाही.

बाजारामध्ये या संदर्भात अनेक प्रॉडक्ट उपलब्ध असू शकतात. मात्र या साधनांना बळी न पडता तुम्ही नैसर्गिक मेहनत घेऊन तुमच्या स्तनांना आकर्षक आकार देऊ शकता. ब्रेस्टचा आकार कमी करायचा असेल, किंवा तो शेपमध्ये ठेवायचा असेल, तर योगासने हा यावर उत्तम पर्याय आहे. रोज सकाळी जर थोडा वेळ काढून काही योगासने केली. तर तुम्हाला तुमची ब्रेस्ट शेपमध्ये आलेली दिसेल. त्यासाठी अगदी काहीच योगासने करायची आहेत. तुम्ही जर ब्रेस्ट शेपमध्ये आणण्यासाठी प्रयत्न करत असाल, तर मग खाली सांगितलेली योगासने तुमच्यासाठी खूप फायद्याची आहेत. पाहुयात ती कोणती योगासने आहेत, सोबतच करायची कशी?

शलभासन: शलभासन केल्याने तुमच्या ब्रेस्टचा आकार शेपमध्ये येण्यास मदत होते. तसेच बाकीचे ही अनेक फायदे होतात. हे आसन करण्यासाठी एक चटई घ्यावी लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला पोटावर झोपायचे आहे. नंतर दोन्ही पाय सरळ ठेऊन, पायाचे पंजे सरळ वरच्या बाजूला ठेवा. हात सरळ ठेऊन दोन्ही मांडीच्या खाली ठेवायचे आहेत. यावेळी तुमचे तोंड सरळ ठेवा. काही सेंकदानंतर सामान्य व्हा. एक दिर्घ श्वास आत घ्या. आता दोन्ही पाय वरच्या बाजूला उचला. सुरूवातीला पाय वर करण्यासाठी हाताचा आधार घेऊ शकता.

याच स्थितीत काही वेळ रहा, मग हळूहळू श्वास बाहेर सोडा. असच किमान ४-५ वेळा करा. हे आसन केल्याने तुम्हाला काही दिवसातच फरक जाणवेल. सुरुवातीचे काही दिवस स्नायू ताणल्याने अंग दुखू शकत. पण लवकरच रिझल्ट येण्यास मदत होईल. पाठीचा कणा मजबूत करण्यासाठी शलभासन हे अतिशय चांगले योगासन आहे.

भुजंगासन: योगातील सर्वात महत्वाचे आणि फायदशीर आसन म्हणजे भुजंगासन होय. हे आसन केल्याने शरीराला अनेक फायदे होतात. स्त्रियांच्या तुमच्या ब्रेस्टचा आकार वाढण्यास मदत होईल. तसेच तुमची ब्रेस्ट शेपमध्ये येण्यास सुरुवात होईल. त्यासाठी तुम्हाला कामातून थोडा वेळ काढून भुजंगासन करायचे आहे. भुजंगासन हे अतिशय सोपे आसन आहे. हे आसन करण्यासाठी सुरुवातीला जमीनीवर पोटाच्या बळावर झोपा. हनुवटी छातीला टेकवा आणि कपाळ जमिनीला टेकवा. आता शरीर हलके सोडा. हाताच्या पंजे छातीजवळ आणा. नंतर हातांच्या पंज्यावर शरीराचा भार देऊन बेंबीपासूनचा भाग हळूवारपणे वर उचला. आता पायाची बोटे ताणून जमिनीवर टेकवा. यामुळे पाठ आणि खांद्याच्या मधील भागातील स्नायू व्यवस्थित ताणले जातात. असे केल्यावर हळू हळू श्वास सोडा आणि शरीराच्या पूर्व स्तिथीत या. हे आसन रोज ४-५ वेळा केल्याने तुम्हाला परिणाम दिसायला लागेल.

हे देखील वाचाVirat Kohli: विराट कोहलीचा सोनाक्षी सिन्हासोबत भन्नाट डान्स; व्हिडिओ सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ.. 

Bank of Maharashtra Bharti 2023: या उमेदवारांसाठी बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये विविध पदांची मेगा भरती..

Foreplay benefits: ..तरच महिला होतात संतुष्ट, जाणून घ्या शारीरिक संबंधामध्ये फोरप्लेचे महत्त्व..

AIESL Recruitment 2023: Air India इंजिनिअरिंग सर्विसेसमध्ये मोठी भरती; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

Smriti Mandhana: तब्बल २३ वर्षाने मोठ्या व्यक्तीच्या प्रेमात आहे स्मृती मानधना; स्वतःच खुलासा केल्याने उडाली खळबळ..

Physical relationship tips: ..म्हणून महिला शारीरिक संबंध ठेवण्यास नसतात तयार; धक्कादायक म्हणजे याला सर्वस्वी जबाबदार आहेत पुरुष..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.