Virat Kohli: विराट कोहलीचा सोनाक्षी सिन्हासोबत भन्नाट डान्स; व्हिडिओ सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ..

0

Virat Kohli: सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) ही एक यशस्वी बॉलीवूड (Bollywood) अभिनेत्री आहे. दबंग (Dabangg) या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये आपले जोरदार पदार्पण करणारी सोनाक्षी नेहमीच चर्चेत असते. सोनाक्षी ही तिच्या खऱ्या आयुष्यातही खूप दबंग आहे. बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी सोनाक्षी फॅशन शोमध्ये बॅकस्टेज इव्हेंट मॅनेजमेंटचे काम करत होती. सध्या तिचा क्रिकेटर विराट कोहलीसोबत एक व्हीडीओ खूपच व्हायरल होत आहे. नैसर्गिकरित्या आक्रमकता आणि तंत्रशुद्ध फटकेबाजी करणारा फलंदाज अशी विराट कोहलीची क्रिकेट जगतात ओळख आहे. हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही.

उत्कृष्ट फलंदाजीबरोबर विराट कोहली डान्स देखील उत्तम करतो. मैदानाबाहेर तसेच मैदानात देखील विराट कोहली अनेकदा डान्स करताना दिसून येतो. सध्या विराट कोहलीचा सोनाक्षी सिन्हासोबतचा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान वायरल झाला आहे. हा व्हिडिओ खूप जुनाच आहे. मात्र अचानक हा व्हिडिओ व्हायरल झाला असून, अनेकांच्या पसंतीस उतरला आहे.

बॉलीवूड आणि क्रिकेट हे नातं लपून राहिलेलं नाही अनेक मोठमोठे सेलिब्रिटी क्रिकेटरचे चांगले मित्र असल्याचं तुम्ही जाणून आहे. अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सोबत व्हायरल झालेला हा व्हिडिओ रोहित शर्माच्या रिसेप्शन पार्टीतला असल्याचं सांगितलं जात आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेले व्हिडिओ ‘साडी के फॉल सा’ या गाण्यावर या दोघांनी डान्स केला आहे. विराट कोहली सोनाक्षी सिन्हाच्या या गाण्यावर हुकस्टेप देखील करत असल्याचा पाहायला मिळत आहेत.

सोनाक्षी सिन्हा आपल्या पर्सनल आयुष्यात फारशी चर्चेत नसते, मात्र बॉलिवूडमधील दबंग हिरोईन म्हणून तिच्याकडे पाहिले जातं. दुसरीकडे विराट कोहली देखील आपल्या स्टाईल आणि फॅशनमुळे कायम चर्चेत असतो. यासोबत मैदानावर प्रचंड अग्रेसिव्ह खेळ करत, तो विरोधकांना बॅफूटवर ढकलता पाहायला मिळतो. सोशल मीडियावर या दोघांचा वायरल झालेला हा व्हिडिओ काही सेकंदाचा आहे. मात्र या व्हिडिओला दोघांच्या चाहत्यांनी चांगलंच डोक्यावर घेतल्याचं दिसून येत आहे.

विराट कोहलीने 2017 मध्ये बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा सोबत विवाह केला. एका जाहिरातीमधून दोघांची ओळख झाली होती. या ओळखीचे नंतर प्रेमात रूपांतर झाले. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा या दोघांनीही आपल्या रिलेशनशिप विषयी गुप्तता ठेवली. लग्नापासून दोघांना वामिका नावाची मुलगी देखील आहे. बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा सोबत केलेल्या विवाहानंतर विराट कोहलीचे बॉलिवूडमध्ये असंख्य मित्र झाले असल्याचे पाहायला मिळते.

हे देखील वाचा Foreplay benefits: ..तरच महिला होतात संतुष्ट, जाणून घ्या शारीरिक संबंधामध्ये फोरप्लेचे महत्त्व..

Viral video: शिकारी झाला स्वतःच शिकार, बेडूक आणि सापाचा अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ व्हायरल..

AIESL Recruitment 2023: Air India इंजिनिअरिंग सर्विसेसमध्ये मोठी भरती; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

​BOI Recruitment 2023: बँक ऑफ इंडियामध्ये मोठी भरती, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया..

Smriti Mandhana: तब्बल २३ वर्षाने मोठ्या व्यक्तीच्या प्रेमात आहे स्मृती मानधना; स्वतःच खुलासा केल्याने उडाली खळबळ..

Electric bike: ८० रुपयांत ८०० किमी धावते ही E-Bike; ड्रायव्हिंग लायसन्सचीही गरज नाही..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.