Tractor Subsidy Scheme: शेतकऱ्यांनो आता ट्रॅक्टर घेणे झाले सोपे; सरकार देतेय ३ लाख रुपये अनुदान..

0

Tractor Subsidy Scheme: भारत हा कृषिप्रधान देश आहे. देशात अनेक पिकांचे उत्पादन घेतले जाते. उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांना मनुष्यबळाची खूप मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण होते. शेतकऱ्याचे कष्ट कमी होऊन उत्पादन कशी वाढ होईल यासाठी शेतकरी नेहमी प्रयत्नशील असल्याचं पाहायला मिळते. सरकारने मागील काही वर्षात शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. या योजनांमुळे शेतकऱ्यांची अनेक कामे सोपी झाली आहेत. तसेच त्यांच्यावरील कर्जाचा भर देखील कमी झाला आहे. सरकार योजनांमधून शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे, शेतकऱ्यांना आर्थिक मदत यासाठी देखील सरकार प्रयत्नशील असते. याशिवाय अनेक योजनांचा माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारी अवजारे देखील अनुदानाच्या माध्यमातून देण्याचे काम केलं जातं.

सरकार अनेक योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अनुदान देत असते. आता सरकार शेतकऱ्यांना ट्रॅक्टर घेण्यासाठी देखील अनुदान देत आहे. साधारण ३ लाखांपर्यत हे अनुदान शेतकऱ्यांना मिळत आहे. त्यामुळे तुम्हाला शेती करतानाचे तुमचे कष्ट कमी करायचे असतील, आधुनिक शेती करायची असेल, तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. पाहुयात ट्रॅक्टर खरेदीसाठी सरकारची नेमकी काय योजना आहे? या योजनेचा लाभ कोणत्या शेतकऱ्यांना मिळतोय? किती अनुदान मिळतेय? कागदपत्र कोणती लागतात? आणि अर्ज कसा करायचा? जाणून घेऊया सविस्तर.

शेती करण्यासाठी ट्रॅक्टर अत्यंत महत्वाचे अवजार आहे. मात्र ट्रॅक्टरची किंमत जास्त असल्याने ते विकत घेणे शेतकऱ्याच्या अवाक्याबाहेर बाहेर आहे. म्हणून शेतकऱ्यांना आर्थिक हातभार मिळावा, यासाठी सरकारने ही योजना आणली आहे. या योजनेत ट्रॅक्टर खरेदीसाठी शेतकऱ्याला ३ लाख अनुदान मिळते. यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागतो. कृषी आणि शेतकरी कल्याण विभागातर्फे हे अनुदान देण्यात येणार आहे. या योजनेतून अनुसूचित जातीतील शेतकऱ्यांना 35 HP पेक्षा जास्त ताकद असणारा ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी सरकार ३ लाख रुपये अनुदान देणार आहे. या योजनेच्या अंतर्गत देशातील प्रत्येक राज्यातून सरकारने अनुसूचित जाती जमातीतील शेतकऱ्यांकडून अर्ज मागवले आहेत. या शेतकऱ्यांना २०२२-२३ मध्ये ट्रॅक्टर खरेदीसाठी ३ लाख रुपये अनुदान मिळणार आहे.

या योजनेतील महत्वाची अट म्हणजे, ज्या शेतकऱ्याने हे अनुदान उचलले आहे. ट्रॅक्टर ही त्याच्यात नावाने नोंदणी असणे गरजेचे आहे. महत्वाचे म्हणजे, ट्रॅक्टर खरेदी केल्यावर पुढची ५ वर्ष तुम्हाला हे ट्रॅक्टर विकता येणार नाही. त्यसाठी तुम्हाला प्रतिज्ञापत्र द्यावे लागेल. आणि पाच वर्षांच्या आता जर ट्रॅक्टर विकला, तर सरकार तुम्हाला दिलेल्या अनुदानाची पूर्ण रक्कम वसूल करते. या योजनेत सरकार प्रत्येक जिल्ह्यासाठी ३० ट्रॅक्टर देते. मात्र यापेक्षा जर जास्त अर्ज आले, तर शासनाची कार्यकारी समिती लाभार्थ्यांची निवड करते.

ज्या शेतकऱ्यांना या योजेनचा लाभ घ्यायचा आहे. त्यांनी कृषी कल्याण विभागात जाऊन या योजनेची चौकशी करावी. तुम्हाला या योजनेचा लाभ मिळाला, तर तुम्ही कोणत्याही कंपनीचा ट्रॅक्टर घेऊ शकता. परंतु त्यासाठी तुम्हाला आधी ‘मेरी फसल मेरा ब्योरा’ या संकेस्थळावर नोंदणी करावी लागेल. तसेच काही कागदपत्र देखील अपलोड करावे लागतील. अधिक माहितीसाठी तुमच्या विभागातील कृषी अधिकाऱ्यांची भेट घेऊन, त्यांच्याकडून माहिती घेऊ शकता. केवळ हरियाणा राज्यातील रहिवाशी शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. अधिकृत संकेतस्थळ https://fasal.haryana.gov.in/ योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी कागदपत्रे १) रेशनकार्ड २) पॅन कार्ड ३) आधारकार्ड (मोबाईल नंबर लिंक असावा) ४) मोबाईल नंबर, शेतीचा सातबारा उतारा ५) Bank पासबुक झेरॉक्स

हे देखील वाचा How To Get Sleep Early: रात्री चांगली झोप लागत नसेल तर करा हे काम झटक्यात लागेल झोप..

Breast Shape Tips: सैल झालेले ब्रेस्ट या घरगुती उपायांनी बनवा सुडोल आणि आकर्षक..

AIESL Recruitment 2023: Air India इंजिनिअरिंग सर्विसेसमध्ये मोठी भरती; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

Foreplay benefits: ..तरच महिला होतात संतुष्ट, जाणून घ्या शारीरिक संबंधामध्ये फोरप्लेचे महत्त्व..

Viral video: शिकारी झाला स्वतःच शिकार, बेडूक आणि सापाचा अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ व्हायरल..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.