BPL Ration Card: आता बीपीएल रेशन कार्डसाठी तुम्हालाही करता येणार अर्ज; जाणून घ्या फायदे आणि असा करा अर्ज..

0

BPL Ration Card: दारिद्ररेषेखालील नागरिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी सरकार अनेक योजना राबवत असते. देशातील गरिब आणि आर्थिक परिस्थिती हालकीची असणाऱ्या नागरिकांना सरकारकडून दारिद्र्यरेषेखाली आणण्याचे काम केले जाते. दारिद्ररेषेखाली येणाऱ्या नागरिकांचे जीवनमान सुधारावे यासाठी सरकार अनेक योजना राबवत असते. मात्र दारिद्र रेषेखाली येणाऱ्या नागरिकांकडे बीपीएल कार्ड नसल्यामुळे या योजनांचा लाभ त्यांना घेता येत नाही.

जर तुमची देखील आर्थिक परिस्थिती हालाखीची असेल, उत्पन्नाचा स्त्रोत नसेल तर तुम्ही दारिद्ररेषेखाली येत असून, तुम्हाला बीपीएल कार्ड मिळवण्याचा अधिकार आहे. आज आपण दारिद्र्यरेषेखाली येण्यासाठी काय पात्रता निश्चित करण्यात आली आहे? त्याचबरोबर दारिद्र्यरेषेखाली येत असणाऱ्या नागरिकांना बीपीएल कार्ड काढण्यासाठी काय करणे आवश्यक आहे? याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.

बीपीएल रेशन कार्ड मिळण्यासाठी तुम्हाला काही नियम आणि अटीची पूर्तता करावी लागते. जर तुम्ही दारिद्रदारिद्र्यरेषेखाली येत असाल तरच तुम्हाला या बीपीएल कार्डच्या माध्यमातून योजनांचा लाभ घेता येऊ शकतो. दारिद्ररेषेखाली येण्यासाठी सरकारने काही अटी आणि शर्ती घालून दिल्या आहेत. उत्पन्न 20000 रुपयांपर्यंत असेल तर तुम्हाला बीपीएल कार्ड दिले जाते. जर तुमचे उत्पन्न वीस हजारांपेक्षा कमी असेल, आणि तुमचे वय अठरा किंवा त्याहून अधिक असेल तर तुम्हाला BPL कार्ड शसाठी अर्ज करता येतो.

सोबतच BPL कार्डसाठी अर्ज करणारा अर्जदार हा भारतीय सहवासी असणे देखील आवश्यक आहे. त्याच बरोबर बीपीएल कार्ड प्राप्त करण्यासाठी तुमचे नाव हे बीपीएल कार्डच्या यादीत समाविष्ट असणे गरजेचे आहे. त्याच बरोबर हे कार्ड प्राप्त करण्यासाठी यापूर्वी तुम्ही कोणत्याही राज्याचे रेशन कार्ड घेतलेले नसणे आवश्यक आहे. आता आपण BPL कार्ड मिळवण्यासाठी कोण-कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत? जाणून घेऊया.

बीपीएलसाठी आवश्यक कागदपत्रे

बीपीएल कार्ड साठी अर्ज करण्याकरिता कुटुंब प्रमुख आणि कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड झेरॉक्स अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. त्याचबरोबर वीज बिल, पाण्याचे बिल, रहिवासी प्रमाणपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स इत्यादी कागदपत्रे तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. सोबतच अर्जदाराचे जॉब कार्ड, ग्रामपंचायतकडून मान्यता, पासपोर्ट आकाराचे दोन फोटो, बँकेच्या पासबुकची झेरॉक्स, बीपीएल सर्व्हे नंबर, मोबाईल क्रमांक इत्यादी कागदपत्रे तुमच्याकडे असणे आवश्यक आहे.

हे आहेत फायदे

इतर रेशन कार्ड आणि बीपीएल कार्ड या दोघांच्या तुलनेत बीपीएल कार्ड वापरणाऱ्या लाभार्थ्यांना अधिक सवलती मिळतात. या कार्डधारकांना अनुदानात रेशन मिळते. जर तुमच्याकडे बीपीएल कार्ड असेल तर तुम्हाला गृहनिर्माण योजना, त्याचबरोबर शिष्यवृत्ती योजना अशा अनेक सरकारी योजनांचा लाभ घेता येतो.

सोबतच सरकारी बँकांकडून इतरांच्या तुलनेत कमी व्याजदर आकारुन कर्ज मिळवता येऊ शकते. दवाखान्याचा खर्चात देखील या कार्डधारकांना सवलत मिळू शकते. हे कार्ड मिळवण्यासाठी तुम्ही अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या वेबसाईवर जाऊन अर्ज करू शकता. याशिवाय तुम्ही संबंधित कार्यालयाला भेट देऊन अर्ज करू अर्ज करू शकता.

हे देखील वाचाCricket Love Story: कार्तिक मुरली विजय घटनेची पुनरावृत्ती; या खेळाडूने मित्राच्या पत्नी सोबतच लग्न केल्याने खळबळ..

LIC: एलआयसी मध्ये या उमेदवारांसाठी 9400 जागांची मेगाभरती; जाणून घ्या सविस्तर..

MPSC: MPSC च्या 8 हजाराहून अधिक जागांची मेगा भरती; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

Belly fat: पोट सुटण्याची ही आहेत प्रमुख करणे; जाणून घ्या पोट कमी करण्याचे उपाय..

IND vs NZ: सामन्यापूर्वी हे पदार्थ खातात भारतीय खेळाडू; जाणून तुम्हालाही बसेल धक्का, पाहा व्हिडिओ..

Sexual ability Tips: चाळीशीत हवीय पंचविशीतल्यासारखी लैंगिक क्षमता? लगेच करा हे काम..

Kissing Tips: पहिलं kiss चुकलं तर होईल सत्यानाश; जाणून घ्या पहिल्यांदा किस करताना कोणती काळजी घ्यायची..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.