IND vs SL: इशान किशनचा अप्रतिम झेल पाहिला का? इशानचा कॅच पाहून उडतील होश..
IND vs SL: भारत आणि श्रीलंका (INDIA vs SRI Lanka) यांच्यामध्ये झालेल्या पहिल्या टी-ट्वेंटी (1st T20) सामन्यात भारताने श्रीलंकेवर दोन धावांनी विजय मिळवत भारताने तीन टी-ट्वेंटी सामन्याच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वात भारताने नवीन वर्षाची सुरुवात विजयाने केली. मुंबईच्या वानखेडे क्रिकेट मैदानावर (wankhede cricket ground) खेळवण्यात आलेल्या पहिल्या टी ट्वेंटी सामन्यात विजय मिळवत भारताने अनेक विक्रमाला गवसणी घातली. मात्र या सगळ्यांमध्ये इशान किशनने (Ishan Kishan catch) टिपलेल्या अप्रतिम झेलची जोरदार चर्चा होत आहे.
आगामी T20 वर्ल्ड कपसाठी (T20 World Cup) हार्दिक पांडेच्या नेतृत्वात भारतीय संघ बांधणी सुरू आहे. या संघ बांधण्याचे पहिले पाऊल हार्दिक पांडेच्या नेतृत्वात काल खेळलेल्या पहिल्या टी-ट्वेंटी सामन्यात मुंबईच्या वानखेडे मैदानावर टाकण्यात आले. विराट कोहली (Virat Kohli) रोहित शर्मा Rohit (Sharma) केएल राहुल (KL Rahul) भुवनेश्वर कुमार यासह अनेक अनुभवी खेळाडू शिवाय BCCI आगामी T20 वर्ल्ड कपसाठी नवीन संघाचा विचार करत आहे. अशातच आता वानखेडे मैदानावर हार्दिक पांड्याच्या संघाने नवीन रेकॉर्ड बनवला आहे.
प्रथम फलंदाजी करत भारतीय संघाने फलंदाजीमध्ये फारशी चमक दाखवली नाही. मात्र गोलंदाजाने आणि क्षेत्ररक्षकांनी आतापर्यंत वानखेडे क्रिकेट मैदानावर जे झाले नाही, ते करून दाखवले आहे. वानखेडे क्रिकेट मैदानावर 162 धावांचे माफक आव्हान आतापर्यंत एकदाही रोखता आलेलं नाही. मात्र हार्दिक पांड्याच्या नेतृत्व खाली खेळणाऱ्या भारतीय गोलंदाजांनी हा कारनामा करून दाखवला. या विक्रमाबरोबरच पदार्पण करणाऱ्या जलदगती गोलंदाज शिवम मावीने (Shivan Mavi) देखील भारताकडून सर्वोत्कृष्ट टी-20 पदार्पण केले.
सांघिक खेळाच्या जोरावर भारताने श्रीलंके समोर ठेवलेल्या 162 धावाचे आव्हान रोखण्यात यश मिळवले. पांड्याने कर्णधार म्हणून घेतलेले अनेक निर्णय यशस्वी ठरले. सोबतच महेंद्रसिंग धोनी सारखा कुलपणा मैदानावर देखील जाणवला. अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर शेवटच्या षटकात श्रीलंकेच्या फलंदाजाने षटकार खेचल्यानंतर, हार्दिक पांड्याने अक्षर पटेलची पाठराखण करत ज्याप्रमाणे प्रोत्साहन दिले, याचे अनेक क्रिकेट दिग्गजांनी कौतुक केले.
Ishan Kishan takes splendid running catch of Umran Malik's bowling; fans recall MS Dhoni's old catch#MSDhoni #IshanKishan #INDvsSL #TeamIndia #IndiavsSrilanka #CricketTwitter pic.twitter.com/rKBosHLB4Z
— Shani Mishra | शनि मिश्रा (@mishra_shani) January 3, 2023
श्रीलंकेच्या चारिथ असलंका या फलंदाजाचा झेल उमरान मलिकलच्या (Umran Malik) गोलंदाजीवर विकेट किपर इशान किशनने टिपला. विकेटच्या लेग साईडला धावत इशान किशनने अप्रतिम झेल टिपला. हवेत उडी घेत इशानने टिपलेल्या या झेलची अजूनही सोशल मीडियावर चर्चा होत आहे. ईशान किशनने टिपलेल्या या झेलचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओ खाली कमेंट करताना अनेकांनी ऋषभ पंतचा (Rishabh pant) रिप्लेसमेंट आता मिळाला असल्याच्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.
हे देखील वाचा Pan Card: मोठी बातमी! या तारखेपर्यंत करा हे काम अन्यथा Pan Card होईल बंद..
Tata Nexon: आता Tata Nexon मिळतेय दोन लाखांत; जाणून घ्या ऑफर विषयी सविस्तर..
Cristiano Ronaldo Salary Breakup: रोनाल्डो कमावणार तासाला 21 लाख रुपये, एवढंच नव्हे तर..
Goutam Adani Vs Elon Musk: अवघ्या एका महिन्यात अदानी एलोन मस्कचा उठवणार बाजार, मस्कला ट्विटर भोवले
Rishabh Pant Update: यामुळे ऋषभ पंतला इन्फेक्शनची शक्यता; जाणून घ्या रुग्णालयातली अपडेट..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम