Shikhar Dhawan: मिस्टर आयसीसीचे करिअर संपुष्टात; BCCI ने संपवलं शिखर धवनचे करिअर..

0

Shikhar Dhawan: भारत आणि श्रीलंका विरुद्धच्या (India vs Sri Lanka series) मालिकेसाठी भारतीय टी-ट्वेंटी आणि एकदिवसीय संघ काल जाहीर करण्यात आला. (India T20I and ODI Squads vs Sri Lanka) चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या निवड समितीने वन डे आणि टी ट्वेंटी संघात धक्के देणारे अनेक निर्णय घेतले. या दोन्ही प्रकारासाठी निवडलेल्या संघाविषयी काही गोष्टींविषयी स्पष्टता करण्यात आली नाही. विराट कोहली (Virat Kohli) रोहित शर्मा (Rohit Sharma) ऋषभ पंत (Rishabh pant) केएल राहुल (KL Rahul) या दिग्गज खेळाडूंची टी-ट्वेंटी क्रिकेटमधून हकालपट्टी केली. मात्र याविषयी अधीकृत स्पष्ट करण्यात आले नाही.

विराट कोहली, रोहित शर्मा, केल राहुल या खेळाडूंविषयी संभ्रमता असली तरी, दुसरीकडे मात्र शिखर धवनची (Shikhar Dhawan) आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द संपुष्टात आली आहे. बांगलादेश विरुद्ध झालेली एकदिवसीय मालिका शिखर धवनच्या कारकीर्दीची अखेरची मालिका झाल्याचं आता स्पष्ट झालं आहे. मिस्टर आयसीसी (Mr ICC) म्हणून नावलौकिक मिळवलेला शिखरचे करियर बीसीसीआयमुळे (BCCI) आता संपुषटात आले आहे.

केएल राहुलला संधी देण्यासाठी शिखर धवनला बीसीसीआयने वारंवार साईड लाईन केले. महत्वाच्या सामन्यांत सतत अपयशी ठरून देखील शिखर धवनच्या जागी केएल राहुलला संधी देण्यात आली. सततच्या आत बाहेर करण्यामुळे शिखर धवनचा फॉर्म देखील गायब झाला. आयसीसी स्पर्धेत शिखर धवनने तब्बल 65.15 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. दुसरीकडे त्याच्या जागी संधी देण्यात आलेल्या केएल राहुलने मात्र आयसीसी स्पर्धेत सुमार कामगिरी सातत्याने केली आहे.

शिखर धवन आयसीसी टूर्नामेंटमध्ये केलेल्या उत्कृष्ट कामगिरीचा विसर बीसीसीआयला पडल्याने आता शिखर धवनचे चाहते बीसीसीआयवर संतापल्याचे पाहायला मिळत आहेत. आयसीसी टूर्नामेंटमध्ये शिखर धवन अनेक महत्त्वाच्या इनिंग्स वेळोवेळी खेळल्या आहेत. या टूर्नामेंटमध्ये शिखर धवनने खेळलेल्या इनिंगचा स्ट्राइक रेट देखील जबरदस्त असल्याने भारतीय क्रिकेट संघाला आयसीसी टूर्नामेंटमध्ये या काळात घवघवीत यश देखील मिळालं. मात्र आता 2023 मध्ये होणाऱ्या एकदिवसीय क्रिकेट वर्ल्डकपपूर्वी शिखर धवनला वगळल्याने तो 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत दिसणार नसल्याचं आता स्पष्ट झाले आहे.

शिखर धवनने आतापर्यंत 167 एकदिवसीय सामन्यांमध्ये 44.1 च्या सरासरीने 6793 धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे, या धावा त्याने तब्बल 92 च्या स्ट्राईक रेटने केल्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, आयसीसी टूर्नामेंटमध्ये शिखर धवनने तब्बल 66 सरासरीने धावा वसूल केल्या आहेत. एक उत्कृष्ट खेळाडूची ओळख ही महत्त्वाच्या आणि आयसीसी टूर्नामेंट मध्येच होत असते. शिखर धवनने हे करून दाखवलं.

दुसरीकडे राहुलने आतापर्यंत 46 वनडे खेळले आहेत. यामध्ये त्याने 44 ची सरासरी आणि 87 च्या स्ट्राईक रेटने 1760 धावा केल्या आहेत. मात्र आयसीसी स्पर्धेत तो सपशेल अपयशी ठरला आहे. असं असताना देखील अंतिम 11 मध्ये राहुलला स्थान देण्यासाठी शिखर धवनला वारंवार डावलण्यात आलं. एक प्रकारे बीसीसीआयने शिखर धवनचे करिअर संपुष्टात आणले.

हे देखील वाचा IND vs SL: केएल राहुलचा व्हाईट बॉलमधून सुपडा साप; हार्दिकच्या नेतृत्वात भारतीय टीमचा बदलला चेहरा मोहरा..

India Squad SL Series: टी-ट्वेंटीत हार्दिकचे राज्य सुरू, विराट रोहित राहुल पंतला बाय बाय; हकालपट्टीचं कारण BCCI कडून स्पष्ट..

Sushant Singh Rajput: सुशांत सिंगच्या शरीरावर होत्या विचित्र खुणा, सुशांतची हत्या होऊनही डॉक्टरांनी मला..; पोस्टमार्टम करणाऱ्याने सांगितले त्या रात्री काय घडलं..

Sajid Khan: साजिद खानचे काळे कारनामे उघड, प्रसिद्ध अभिनेत्रीच्या पँटमध्ये हात घालून करायचा..; पहा व्हिडिओ 

Relationship Tips: संबंध करताना या 5 गोष्टींतून कळते तुमचा पार्टनर मनापासून साथ देतोय का..

​​IOCL Recruitment 2022-23: या उमेदवारांसाठी इंडियन ऑइलमध्ये दीड हजारांहून अधिक पदांची मेगा भरती..

CR Recruitment 2022: दहावी पास उमेदवारांसाठी सेंट्रल रेल्वेत हजारो पदांची मेगा भरती; असा करा ऑनलाईन अर्ज..

Celebrity Sex Life: कलाकारांनी सांगितल्या त्यांच्या आवडत्या सेक्स पोझिशन; आलियाची क्लासिक मिशनरी तर करिनाची आहे..

Electric Bike: स्मार्टफोनच्या पैशात मिळतेय ही तगडी इलेक्ट्रिक बाईक; जाणून घ्या डिटेल्स..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.