Indian Post Bharti 2022: भारतीय डाक विभागात दहावी पास उमेदवारांसाठी विविध पदांची भरती; लगेच करा अर्ज..

0

Indian Post Bharti 2022: प्रत्येकाला उच्च शिक्षण घेणे परवडत नाही. अलीकडच्या काळात तर उच्च शिक्षण घेऊन देखील नोकरीच्या (nokari) संधी उपलब्ध होत नसल्याने आता अनेकजण दहावी बारावीनंतरच कुठेतरी जॉब (Job) करण्याचा प्रयत्न करतात. त्यात सरकारी जॉब (government job) असेल तर सुवर्ण संधीच म्हणावी लागेल. दहावी पास (10th pass Job) उमेदवारांसाठी आता भारतीय पोस्ट (Indian Post office) मध्ये बंपर भरती निघाली असून, या संदर्भातली अधीसूचना देखील जारी करण्यात आली आहे. दहावी पास उमेदवारांना या विभागात नोकरी करण्यासाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 जानेवारी 2023 निश्चित करण्यात आली आहे.

कुठेतरी चार पैशाची नोकरी असावी, अशी अनेकांची इच्छा असते. त्यात जर सरकारी नोकरी असेल, तर उत्तमच. जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल, आणि तुमचे दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण झाले असेल, तर तुमच्यासाठी ही संधी खूप मोठी आहे. भारतीय डाक विभागामध्ये (indian Post office recruitment) काही रिक्त पदांची भरती केली जाणार आहे यामध्ये MV मेकॅनिकल,MV इलेक्ट्रिशन, कॉपर तसेच टिनस्मिथ आणि अपहोल्स्टरर या विभागामध्ये रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. जाणून घेऊया, या भरती प्रक्रिया संदर्भात सविस्तर माहिती.

या पदासाठी केली जाणार भरती

MV मेकॅनिक या पदासाठी एकूण चार रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. त्याचबरोबर एमव्ही इलेक्ट्रिशन या पदासाठी भारतीय डाक विभागामध्ये एक रिक्त जागा भरण्यात येणार आहे. तसेच कॉपर आणि टिनस्मिथ या पदासाठी भारतीय डाक विभागामध्ये 1 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. आणि अपहोल्स्टरर या पदासाठी देखील एक रिक्त जागा भरण्यात येणार आहे. आता भरतीत डाक विभागामध्ये केल्या जाणाऱ्या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांची शैक्षणिक पात्रता काय आहे? हे जाऊन घेऊ.

शैक्षणिक पात्रता

भारतीय डाक विभागात केल्या जाणाऱ्या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेचा विचार करायचा झाल्यास, उमेदवारांची कोणत्याही मान्यता प्राप्त शिक्षण संस्थेमधून, दहावी उत्तीर्ण झालेली असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर कोणत्याही मान्यताप्राप्त तांत्रिक संस्थेमधून उमेदवाराने व्यापारातील प्रमाणपत्र त्याचबरोबर संबंधित व्यापारातील एक वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

एमव्ही मेकॅनिक या पदासाठी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता थोडीशी वेगळी आहे. या पदासाठी उमेदवाराने कोणत्याही मान्यता प्राप्त प्रशिक्षण संस्थेमधून दहावी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. सोबतच उमेदवारांकडे कोणत्याही प्रकारचे वाहन चालवण्यासाठी वैद्य असणारे ड्रायव्हिंग लायसन्स (driving licence) असणे देखील अनिवार्य आहे. आता आपण भारतीय डाक विभागामध्ये केल्या जाणार भरतीसाठी उमेदवारांची वयोमर्यादा काय आहे हे देखील जाणून घेऊ.

वयोमर्यादा

भारतीय डाक विभागामध्ये केल्या जाणाऱ्या भरतीसाठी उमेदवारांची वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये उमेदवारांचे वय 18 ते 30 वर्षे पर्यंत निश्चित करण्यात आले आहे. सोबतच कॅटेगीरीनुसार वयामध्ये सरकारी नियमानुसार सवलत दिली जाणार आहे. यात एससी आणि एसटी उमेदवारांना अतिरिक्त पाच वर्षाची सूट दिली जाणार आहे. तर ओबीसी उमेदवारांना ३ वर्षाची अधिक सूट मिळणार आहे. आता आपण भारतीय विभागात निवड करण्यात येणाऱ्या उमेदवारांना दरमहा पगार मिळणार याविषयी देखील जाणून घेऊ.

वेतन

भारतीय डाक विभागामध्ये निवड करण्यात येणाऱ्या उमेदवारांच्या दरमहा पगाराविषयी जाणून घ्यायचे झाल्यास, निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा १९ नवशे पासून 63 हजार दोनशे रुपये दर महा पगार मिळणार आहे. उमेदवारांच्या निवडीविषयी जाणून घ्यायचं झाल्यास, उमेदवारांची निवड ही सकारात्मक व्यापार चाचणीच्या माध्यमातून केली जाणार आहे. अर्ज हे ऑफलाइन पद्धतीने करायचे असून, अर्ज पाठवण्याचा पत्ता देखील आपण जाणून घेऊ.

अर्जाचा पत्ता

विभागांमध्ये पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी ‘द सीनियर मॅनेजर मेल मोटर सर्व्हिस, नं.37, ग्रीम्स रोड, चेन्नई- 600 006’. 600006′ या पत्त्यावर अर्ज करायचे आहेत. अर्ज करताना उमेदवाराने एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, जर तुम्ही एकापेक्षा जास्त ट्रेडकरिता अर्ज करू इच्छित असाल, तर प्रत्येक ट्रेंडकरिता स्वतंत्र अर्ज करणे आवश्यक आहे.

हे देखील वाचा Chandrakant Patil: शाई फेकून माणूस मरतो, सरकारच्या साथीने महाराष्ट्र पोलिसांचा अजब शोध; वाचा संपूर्ण प्रकरण..

Electric Bike: या चार इलेक्ट्रिक बाईकचे दिवाने आहेत भारतीय; जाणून घ्या फीचर्स, किंमत आणि सर्वकाही..

Relationship Tips: बॉयफ्रेंडची आठवण आल्यावर मुली करतात ह्या घाणेरड्या गोष्टी..

Mahindra Bolero Neo Plus: बोलेरो अवतरली नव्या अवतारात ९ सीटर, लाजवाब लूकसह बनली सगळ्यांचा बॉस..

Anushka Sharma pregnant: विराट कोहली दुसऱ्यांदा होणार पिता; इतक्या महिन्याची गरोदर आहे अनुष्का..

Ishan Kishan: ईशान किशनचे द्विशतक पूर्ण होताच विराट कोहलीने सुरू केला भांगडा; पाहा व्हिडिओ..

Second Hand Bike: 2019 मधील hero spender Plus मिळतेय २० हजारांत; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

Second Hand Car: 25 हजारांत मिळतेय जबरदस्त कंडीशन असणारी सेकंड हॅण्ड Maruti Alto; वाचा सविस्तर..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.