rhea chakraborty relationship: रिया चक्रवर्तीच्या गळाला लागला विराट कोहलीचा जिवलग मित्र; त्याचाही होणार सुशांत सिंह..

0

rhea chakraborty relationship: बॉलिवुड (Bollywood) अभिनेता सुशांत सिंह राजपूतने (sushant singh rajput) आ त्म ह त्या केल्याने रिया चक्रवर्ती (rhea chakraborty) देखील खूपच चर्चेत आली होती. सुशांत सिंह राजपूत प्रकरणात (Sushant Singh Rajput case) रिया देखील संशयाच्या भोवऱ्यात सापडली होती. त्यामुळे 2020 हे वर्ष रियासाठी खूपच त्रासदायक गेले. पण कालांतराने रिया देखील तिच्या आयुष्यामध्ये पुढील वाटचाल करताना पहायला मिळत आहे. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्युनंतर ती देखील कोणासोबत रिलेशनशीप नव्हती. परंतु आता रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

2018 च्या अखेरीस रिया चक्रवर्ती आणि सुशांत सिंह राजपूत एकमेकांना डेटिंग करत असल्याच्या बातम्या येऊ लागल्या होत्या. 2019 च्या सुरुवातीला दोघेही लिव्ह-इनमध्ये असल्याची चर्चा होत होती. मीडियामध्ये याबाबत दोघांनी उघडपणे बोलायला नेहमीच टाळले होते. त्यांनी त्यांच्या नात्याबाबत कायम गुप्तता ठेवली होती. सुशांतने देखील रिया आपली गर्लफ्रेंड असल्याचे जाहीर केले नव्हते. परंतु जेव्हा त्याने आत्महत्या केली, त्यानंतर रिया चक्रवर्तीने सोशल मीडियावर स्वतःला सुशांतची गर्लफ्रेंड असल्याचे म्हटले आहे. सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यू सबंधित सीबीआय (cbi) चौकशी करण्याची मागणी रियाने अमित शहा (amit shah) यांच्याकडे केली होती.

परंतु त्यानंतर आता रिया चक्रवर्ती पुन्हा एकदा प्रेमात पडली आहे. सध्या ती बंटी या व्यक्तीसोबत डेट करत असल्याचं बोललं जात आहे. बंटी हा पेशाने व्यवसायिक आहे. ज्या व्यक्तीसोबत रिया सध्या रिलेशनशिपमध्ये आहे, त्या व्यक्तीचे नाव बंटी सचदेह (Bunty Sajdeh) असे आहे. बंटी सजदेह टॅलेंट मॅनेजमेंट एजन्सीचे मालक आहेत. आणि रिया देखील त्याची क्लायंट देखील राहिली आहे. मीडिया रेपोर्ट नुसार रिया आणि बंटी बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. परंतु दोघेही आपल्या नात्याबाबत कुठेही बोलायला तयार नाहीत. दोघांनी त्यांच्या नात्याबाबत गुप्तता पाळली आहे.

बंटी सजदेह सोहेल खानचा नातेवाईक लागतो. सोहेल खानची पत्नी आणि अभिनेत्री सीमा सजदेहचा तो भाऊ आहे. सीमा सजदेह ‘फॅब्युलस लाईव्हज ऑफ बॉलीवूड वाइव्हज’ या मालिकेत पाहायला मिळाली होती. सुशांत सिंह राजपूत प्रकरणात बंटी सचदेहला देखील चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. रिया चक्रवर्ती आणि बंटी या दोघांची जुनीच ओळख आहे, मात्र या दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याचं बोललं जात आहे.

बंटी साजदेहचे अनेक क्रिकेटर सोबत संबंध

बंटी साजदेह व्यवसायीक आहे. बंटी साजदेहच्या एंटरटेनमेंट त्याचबरोबर स्पोर्टच्या अनेक टॅलेंट मॅनेजमेंट फर्म आहेत. या व्यवसायामुळे त्याचे अनेक बॉलीवूड सेलिब्रिटी (Bollywood celebrity) त्याचबरोबर क्रिकेटर (cricketer) सोबत देखील चांगले संबंध आहेत.भारताचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि त्याचे नाते तर खूपच खास असल्याचे बोललं जाते. यासोबतच तो केएल राहुल (KL Rahul) युवराज सिंग (Yuvraj Singh) यांच्या सोबत देखील मैत्री आहे. एवढेच नाही, तर भारताचा कर्णधार रोहित शर्माची (rohit sharma) पत्नी रितिका सजदेज rotika हीचा चुलत भाऊ देखील आहे.

सोनाक्षी सिन्हा सोबत साखरपुडा

रिया चक्रवर्ती हिच्या अगोदर बंटी सजदेह याचे अनेक अभिनेत्री सोबत संबंध जोडले गेले आहेत. दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हासोबत (Sonakshi Sinha) देखील तो रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. एवढेच नाही, तर दोघांचा साखरपुडा देखील झाला होता, अशी देखील चर्चा झाली होती. विशेष म्हणजे, बंटी सजदेहचे अंबिका चौहान सोबत २००९ मध्ये गोव्यात लग्न देखील झाले होते. मात्र हे नाते फार काळ टिकलं नाही. सद्या तो रिया चक्रवर्ती सोबत रिलेशनमध्ये आहे. मात्र दोघेही आपलं नातं उघड करू इच्छित नाहीत.

बंटीचाही होणार सुशांत सिंग

दरम्यान सोशल मीडियावर बंटी सजदेह आणि रिया चक्रवर्ती यांच्या नात्यासंबंधावर उलट सुलट चर्चा सुरू आहे. अनेक जण बंटीचा देखील लवकरच सुशांत सिंग राजपूत होऊ शकतो. अशा देखील चर्चा रंगल्याचे पाहायला मिळत आहे. ज्याप्रमाणे रिया चक्रवर्ती सुशांत सिंग राजपूतला ड्रग्स पूर्वत होती त्याच पद्धतीने बंटीचा देखील ती कार्यक्रम करू शकते. असंही काही नेटकरी बोलत आहेत. सुशांत सिंग राजपूतला रिया चक्रवर्ती ड्रग्स पुरवत असल्याचं आरोप पत्रात म्हटलं असल्याने, सोशल मीडियावर या चर्चा रंगल्या आहेत.

हे देखील वाचा shoaib malik ayesha omar marriage: सानिया सोबतच्या घटस्फोटानंतर शोएब मलिक या तारखेला आयशा उमरशी करणार लग्न; आयशाने केले स्पष्ट..

Sania Mirza Shoaib Malik divorce: सानियाच्या आयुष्यात मोठं वादळ; नवऱ्यानेही सोडलं, मुलगाही शोएबकडेच, सानियाने उचललं हे मोठं पाऊल..

Ration Card: रेशन घेतल्याचा SMS तुम्हाला येतो का? SMS द्वारे कळतंय दरमहा किती रेशन घेतले, जाणून घ्या लगेच..

Chanakya Niti: जीवनात यश मिळवायचं असेल तर हा स्वभाव जाळून टाका..

YouTube First Video: यूट्यूब वरील सर्वात पहिला व्हिडिओ तुम्ही बघितला का? त्या व्हिडिओने कमावलेत एवढे..

Physical relationship tips: वैवाहिक संबंधाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी हे चार पोझिशन आहेत सर्वात बेस्ट..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.