Sania Mirza Shoaib Malik divorce: सानियाच्या आयुष्यात मोठं वादळ; नवऱ्यानेही सोडलं, मुलगाही शोएबकडेच, सानियाने उचललं हे मोठं पाऊल..

0

Sania Mirza Shoaib Malik divorce: भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा (Indian tennis player Sania Mirza) आणि पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शोएब मलिक (Shoaib Malik) हे दोघे वेगळे झाले आहेत. (Sania Mirza Shoaib Malik has separated) गेल्या अनेक दिवसांपासून दोघेही घटस्फोट (divorce) घेणार असल्याची चर्चा जोरदार रंगली होती. मात्र अखेर या दोघांनी वेगळे राहण्याचा निर्णय घेतला असून, सानिया मिर्झाला (Sania Mirza) या दोघांचं एकत्रित असणारं दुबईमधील घर (Dubai house) अखेर सोडावं लागलं आहे. जवळपास 13 वर्षे एकत्र राहिल्यानंतर, सुखाचा संसार आता उघडा पडला आहे. घटस्फोटानंतर या दोघांचा मुलगा देखील शोएब मलिक (Shoaib Malik) जवळच राहणार असल्याने, सानियाच्या आयुष्यात पुन्हा एकदा मोठं वादळ निर्माण झालं आहे.

काही दिवसांपूर्वी पाकिस्तान मीडियाने (Pakistan media) सानिया मिर्झा आणि शोएब मलिक (Sania Mirza and Shoaib Malik) हे दोघे पती-पत्नी (husband wife) वेगळे राहत असून, लवकरच घटस्फोट घेणार असल्याच्या बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या. पाकिस्तान मीडिया वृत्तानुसार हे दोघेही अधिकृतरित्या घटस्फोट घेणार असल्याची बातमी त्यांच्या जवळच्या कुटुंबातील व्यक्तींनी दिली असल्याचा दावा देखील केला होता. खरंतर सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांच्या नात्यांमध्ये दुरावा गेल्या काही वर्षापासून आला आहे. याला जबाबदार शोएब मलिक असल्याचं कुटुंबातील सदस्यांचे म्हणणे आहे.

सानिया मिर्झाचा पती शोएब मलिक हाच या घटस्फोटाला जबाबदार असल्याचा ठपका कुटुंबाकडून त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. गेल्या काही वर्षापासून त्याची जवळीक पाकिस्तान मॉडेल आयशा ओमर (Ayesha omar) हिच्याशी वाढली आहे. शोएब मलिक आणि आयेशा ओमर या दोघांनी एका स्विमिंग पूलमध्ये चाहत्यांना घायाळ करणारे फोटोशूट (Shoaib Malik Ayesha omar photo shoot) देखील केले होते. खरंतर तेव्हापासूनच सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांच्या नात्यांमध्ये दुरावा आला आहे. या फोटोशूट नंतर सानिया देखील प्रचंड नाराज असल्याच्या बातम्या त्यावेळी प्रसिद्ध देखील झाल्या होत्या. मात्र काही काळानंतर या बातम्यांवर पडदा पडला.

शोएब मलिक आणि सानिया मिर्झा या दोघांनी 2010 मध्ये लग्न (Shoaib Malik Sania Mirza marriage 2010) केल्यानंतर या दोघांनी मिळून दुबईमध्ये आपलं घर खरेदी केलं होतं. लग्नानंतर दोघेही दुबईमध्ये वास्तव्यास होते. तेरा वर्षाच्या सुखी संसारानंतर आता या दोघांचा संसार अखेर मोडकळीस आला आहे. सानिया मिर्झाला दुबई मधलं घर देखील सोडावं लागलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, दुबई मधील घरातून शोएब मलिकने सानियाला जाण्यास सांगितलं असल्याची देखील माहिती आहे. सानिया मिर्झाने शोएब मलिकचं दुबईमधील घर सोडून, दुबईमध्येच दुसरे घर खरेदी केलं आहे. सध्या ती एकटीच त्या घरामध्ये राहत असल्याची माहिती आहे.

२०१२ मध्येच घेणार होते घटस्फोट

दोघांकडूनही अद्याप अधिकृतरित्या घटस्फोटाची माहिती जाहीर करण्यात आली नाही. मात्र याविषयी या दोघांच्या जवळच्या व्यक्तीने खुलासा केला आहे. एवढेच नाही, तर सानिया मिर्झाला आपल्या मुलापासून देखील दूर जावं लागणार असल्याची माहिती आहे. शोएब मलिकने सानिया मिर्झापासून दूर जाण्याचा निर्णय खूप काही वर्षांपूर्वी घेतला होता. मात्र दोघांच्याही कुटुंबाने दोघांशी मध्यस्थी करून हे प्रकरण मिटलं होत. पाकिस्तानी पत्रकार अब्दुल मजीद भट्टी (Pakistan journalist Abdul masjid bhatti) यांनी एका माध्यमाला दिलेल्या माहितीनुसार, सानिया मिर्झा आणि शोएब मलिक हे दोघेही 2012 मध्ये घटस्फोट घेणार होते. मात्र कुटुंबाने मध्यस्थी केली. आणि यावर पडदा पडला.

सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांचं 2010 मध्ये लग्न झालं. लग्नानंतर दोन वर्षांनी म्हणजेच २०१२ मध्ये हे कपल वेगळं होणार होतं, असा खुलासा पाकिस्तान पत्रकार अब्दुल मजीद भट्टी यांनी केला आहे. या दोघांना इझान (izan) नावाचा एक मुलगा देखील आहे. सानिया मिर्झा आणि शोएब मलिक हे दोघेही गेल्या अनेक दिवसापासून वेगळे राहत असल्याची माहिती समोर आली होतो. तेव्हा पासून हे दोघे मिळून आपल्या मुलाचे को-पॅरेंटिंग (ko parenting) करत होते. मात्र आता सानिया मिर्झासाठी खूप धक्कादायक बातमी असून, शोएब मलिक आपल्या मुलाचे संगोपन स्वतः करणार आहे. सानियाला आपल्या मुलापासून लांब ठेवणार असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

शोएब मलिक आपल्या मुलापासून सानियाला लांब ठेवणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे. एवढेच नाही तर मलिकने माझ्या मुलावर तुझा अजिबात हक्क नसल्याचं देखील म्हंटलं असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. सानिया मिर्झा आता आपल्या न्याय हक्कासाठी कोर्टाचं दार ठोठावणार असल्याची माहिती आहे. सानिया मिर्झा आणि शोएब मलिक या दोघांचा घटस्फोट झाल्यानंतर, मुलगा कोणाकडे राहणार याची, खूप मोठी उत्सुकता अनेकांना लागून राहिली होती. मात्र सानियाला आपल्या मुलापासून लांब ठेवण्याच्या चर्चामुळे हा वाद आता कोर्टात जाणार असल्याने सानियाच्या आयुष्यात मोठं वादळ निर्माण झाले आहे.

सानिया मिर्झा हिने काही वर्षांपूर्वी इंस्टाग्रामवर एक पोस्ट केली होती. सध्या ही पोस्ट जोरदार व्हायरल होत आहे. काही वर्षांपूर्वी आपल्या इंस्टाग्राम वरून सानिया मिर्झाने आपल्या मुलासोबत एक फोटो पोस्ट करत कॅप्शन दिलं होतं, “तुटलेली हृदय कुठे जातात? तुटलेली रुदय अल्लाला शोधायला जातात” असं तिने कॅप्शन दिल्याने मलिक आणि तिच्या नात्यांमध्ये सगळं काही अलबेला नाही, हे अधोरेखित देखील झालं होतं. आपल्या मुलाच्या भविष्यासाठी दोघांनीही घटस्फोट घेतल्याचा निर्णय अधिकृतरित्या जाहीर केला नाही, मात्र आता दोघेही एकमेकांचा चेहरा देखील पाहणं पसंत करत नसल्याची माहिती समोर आली आहे.

हे देखील वाचाRohit Sharma Crying: पराभवानंतर रोहित शर्मा या कारणामुळे रडला ढसाढसा; राहुल द्रविड गेला समजवायला पण..;पाहा व्हिडिओ..

Second Hand Bike: 20 हजारात hero spender Plus, 16 हजारात Bajaj Pulsar! कुठे सुरू आहे हा भन्नाट सेल? जाणून घ्या सर्व डिटेल्स..

Physical relationship tips: वैवाहिक संबंधाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी हे चार पोझिशन आहेत सर्वात बेस्ट..

Relationship Tips: शारिरीक संबंध ठेवण्याची इच्छा झाल्यास महिला पुरुषांना देतात हे सहा संकेत; जाणून तुम्हालाही बसेल धक्का..

lizard benefits: घरात पाल नसेल तर तुम्हाला होऊ शकतो हा गंभीर आजार; जाणून घ्या पालीचा आणि माणसाच्या आरोग्याचा थेट संबंध..

Benefits Of Foreplay: फोरप्लेमुळे दीर्घ काळ सेक्स आणि महिलांना मिळतो भरपूर आनंद; जाणून घ्या लैंगिक संबंधात याचे महत्व..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.