Ruturaj Gaikwad: एकाच ओव्हरमध्ये गायकवाडने मारले सात षटकार; कुठे आणि कसे मारले, पाहा व्हिडिओ..
Ruturaj Gaikwad: क्रिकेटच्या मैदानावर अनेक विक्रम बनताना तुम्ही पाहिले असतील. विक्रम हे नेहमी मोडण्यासाठीच बनलेले असतात, असं नेहमी बोललं जातं. मात्र ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) केलेला हा विक्रम जगातल्या कुठल्याही फलंदाजाला आता मोडता येणे शक्य नाही. कारण महाराष्ट्राच्या (Maharashtra team) ऋतुराज गायकवाड एकाच षटकात तब्बल सात षटकार खेचत नवा इतिहास रचला आहे. विजय हजारे स्पर्धेच्या (Vijay Hazare trophy) क्वार्टर फायनलमध्ये (quarter final) उत्तर प्रदेश संघाविरुद्ध (Maharashtra vs Uttar Pradesh) खेळताना महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाडने द्विशतक (double hundred) झळकावत एकाच षटकात सात षटकार खेचण्याचा विक्रम केला. (Ruturaj Gaikwad hit seven sixes in one over)
महत्त्वपूर्ण सामन्यात उत्तर प्रदेश विरुद्ध खेळताना महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाडने विक्रमी खेळी साकारली. ऋतुराज गायकवाडने 159 चेंडूत तब्बल 220 धावांची तडाकेबाज खेळी केली. विशेष म्हणजे, या खेळीत तब्बल 16 षटकारांचा समावेश आहे. तर सात षटकार त्याने अठराव्या षटकात खेचत नवा इतिहास रचना. ऋतुराज गायकवाडने भारताचा डावखुरा फलंदाज युवराज सिंगचा (Yuvraj Singh) विक्रम मोडत एका नव्या विक्रमाला गवसणी घातली. (New world record) ऋतुराजचे सर्व स्तरातून कौतुक होत असून अनेकांना या खेळीवर विश्वास देखील बसत नसल्याचं पाहायला मिळत आहे.
गेल्या काही सामन्यांमध्ये दुखापतीमुळे ऋतुराज गायकवाडला क्रिकेटपासून (cricket) मुकावे लागले होते. मात्र आज उत्तर प्रदेश संघाविरुद्ध खेळताना ऋतुराज गायकवाडने पाठीमागची सगळी कसर भरून काढत क्रिकेट जगतात आपल्या नावाचं वादळ निर्माण केलं. महाराष्ट्र संघाने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 330 धावांचा डोंगर उभा केला. यामध्ये ऋतुराज गायकवाडचा 220 गावांचा समावेश आहे. गायकवाडने या खेळीत तब्बल 16 षटकार आणि 10 चौकार लगावले.
या गोलंदाजाला लगावले एकाच षटकात सात षटकार
उत्तर प्रदेश संघाचा (Uttar Pradesh) लेफ्ट अर्म ऑफ स्पिनर शिवा सिंग (Shiva Singh) या गोलंदाजाला ऋतुराज गायकवाडने अठराव्या षटकात सलग सात षटकार खेचले. अनेकांचा या कामगिरीवर विश्वास बसत नसल्याचं पाहायला मिळत आहे. त्याचं कारण देखील तसंच आहे, एका षटकामध्ये एकूण सहा चेंडू असतात. सहाजिकच यामुळे प्रत्येक चेंडूवर षटकार मारला तरी एकूण सहा षटकारच होतात. मात्र शिवा सिंगने ऋतुराजला टाकलेल्या षटकांत त्याने एक चेंडू नो (no Ball) बॉल टाकला. ऋतुराज गायकवाडने तो देखील षटकार लगावला. अशा प्रकारे ऋतुराज गायकवाड एकूण एका षटकांमध्ये सात षटकार खेचले.
6⃣,6⃣,6⃣,6⃣,6⃣nb,6⃣,6⃣
Ruturaj Gaikwad smashes 4⃣3⃣ runs in one over! 🔥🔥
Follow the match ▶️ https://t.co/cIJsS7QVxK…#MAHvUP | #VijayHazareTrophy | #QF2 | @mastercardindia pic.twitter.com/j0CvsWZeES
— BCCI Domestic (@BCCIdomestic) November 28, 2022
ICC ने घेतली दखल
ऋतुराज गायकवाडने केलेल्या करणाम्याची आयसीसीने देखील दखल घेतली आहे. आपल्या ट्विटर अकाउंट वरून ऋतुराज गायकवाड विषयी आयसीसीने त्याचे कौतुक केले आहे. ट्विटरवर ऋतुराज गायकवाड ट्रेंड होत असून, सोशल मीडियावर देखील ऋतुराज गायकवाड नावाचं वादळ घोंघावत आहे. क्रिकेटच्या सर्व स्तरातून ऋतुराज गायकवाडचे कौतुक होत आहे.
हे देखील वाचाVirat Kohli: टी ट्वेण्टी क्रिकेट मधून विराटने जाहीर केली निवृत्ती; कोहलीच्या पोस्टमुळे एकच खळबळ..
Railway Bharti: 35,281 रिक्त जागांसाठी भारतीय रेल्वेत मेगा भरती; जाणून घ्या सर्व डिटेल्स..
MSRTC Recruitment 2022: एसटी महामंडळात या उमेदवारांसाठी मेगा भरती; त्वरीत असा करा अर्ज..
Success Story: गाईंच्या शेणावर बांधला एक कोटींचा बंगला, दुधातून घेतात दीड कोटी वार्षिक उत्पन्न..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम