The Best Couple Combo: उंच मुलांकडेच मुली आकर्षित का होतात? धक्कादायक माहिती आली समोर; उंचीचा वैवाहिक जीवनावरही आहे प्रभाव..
The Best Couple Combo: प्रेम (Love) म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं. प्रेम कधीही कोणालाही कोणत्याही वयात होऊ शकतं. असं आपण अनेकदा ऐकत आलो आहोत. मात्र खरंच प्रेम आंधळ असतं का? (Love is blind) चेहरा, (Face) शारीरिक रचना (Physical structure) आणि लूक पाहून प्रेम होत नाही, असं म्हणणारा खूप कमी वर्ग आज पाहायला मिळू शकतो. प्रेम हे नेहमी आपल्या आवडी-निवडी प्रमाणे होत असतं. हे आपल्याला मान्य करावेच लागेल. आपल्या आवडी-निवडी आणि समोरच्यांच्या स्वभावाबरोबरच त्याची जगण्याची पद्धत, लाईफस्टाईल याविषयी जाणून घेऊन प्रेम करण्यात गैर देखील काही नाही. हे देखील आपण मान्य करून पुढे जाणं अलीकडच्या काळात आवश्यक आहे. (Girls are more attracted to tall guys)
मुलगा असो वा मुलगी प्रत्येक जण आपल्याला आवडणाऱ्या मुलीवर (girl) मुलावरच (boy) प्रेम करतात. समोरचा व्यक्ती जर गुड लुकिंग आणि हँडसम (good looking and handsome) असेल, तरच मुली त्याला भाव देत असतात. याशिवाय मुलं देखील मुलगी सुंदर (beutiful) असेल तरच तिच्याकडे आकर्षित होतात. अर्थात काही अपवाद देखील असू शकतात. प्रेम हे नेहमीच पाहून केलं जातं, असं नाही. मात्र बऱ्याच अंशी हे वास्तव देखील आहे. कॉलेज जीवनात एकमेकांच्या प्रेमात पडताना आपण फारसा विचार करत नाही, मात्र लग्न (marriage) करताना मुलगा असो किंवा मुलगी, अनेक गोष्टींचा विचार करूनच आपला वैवाहिक जोडीदार निवडतात. (Girls choose their marriage partner after considering many things)
प्रत्येक जण आपला वैवाहिक जोडीदार निवडताना अनेक गोष्टींचा विचार करतो. खास करून मुली आपल्या स्वप्नातला राजकुमार निवडताना त्यांनी खूप साऱ्या कल्पना केलेल्या असतात. मुली नेहमी आपला वैवाहिक जोडीदार निवडताना गूड लूकिंग, हँडसम, सडपातळ, उंचपुरा मुलगा पसंत करतात. हाईट कमी आहे, या एका किरकोळ कारणावरून अनेक मुली मुलाला रिजेक्ट देखील करतात हे आपण ऐकून असाल. किंवा अनुभवलं देखील असेल. आता साहजिकच मुलींना नेमकी उंच मुलंच का आवडतात? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर या गोष्टीला देखील कारण असून, एका सर्वेतून तुम्हाला आश्चर्यचिकित करणारे कारण समोर आले आहे. (Why do girls like tall boys)
कॉलेज जीवनामध्ये (College Life) मुली एखाद्यावर प्रेम करताना विचार करत नाहीत असं नाही, मात्र वैवाहिक जोडीदार शोधण्याच्या तुलनेत खूप कमी विचार करतात. आपला वैवाहिक जोडीदार निवडताना मुली नेहमी मुलगा उंच निवडता. आपल्यापेक्षा उंच मुलगा असेल, तर आपलं वैवाहिक जीवन खूप आनंददायी जाईल. असा मुलींचा समज असतो. अशी देखील माहिती सर्वेतून समोर आली आहे. हा निष्कर्ष काढण्यासाठी जवळपास आठ हजार मुलींचा सर्वे करण्यात आला. आपल्यापेक्षा जर आपला वैवाहिक जोडीदार उंच असेल तर वैवाहिक आयुष्य दीर्घकाळ टिकते. शिवाय वैवाहिक आयुष्यामध्ये खूप आनंद देखील मिळतो. असं स्त्रियांचं म्हणणं आहे.
आपल्या जोडीदाराची उंची जर आपल्यापेक्षा अधिक असेल, तर तो इतरांपेक्षा उठून देखील दिसतो. कोणत्याही कपड्यांमध्ये तो अनेकांना आकर्षित वाटतो. शिवाय वैवाहिक जिवनात आपल्याला आनंदी ठेवण्यासाठी अधिक कष्ट घेतो, रिसर्चमधून अशी माहिती देखील समोर आली आहे. 7890 महिलांचा सर्वे करण्यात आला. ज्यामधून ही माहिती समोर आली आहे.
पुरुषांच्या उंचीकडेच आम्ही आकर्षित होत असतो. हँडसम, गुड लुकिंग, स्मार्ट, याबरोबरच पुरुष जर उंच असेल, तर महिलांना अशा पुरुषांमध्ये अधिक रास असतो. असे पुरुष महिलांना देखील अधिक आनंद देतात. अशी देखील माहिती या सर्वेतून समोर आली आहे. उंच असणारे पुरुष हे खूप बुद्धिमान असतात. महिलांच्या मनातलं त्यांना अधिक चांगल्या पद्धतीने कळतं. असे देखील या महिलांचे म्हणणे आहे.
उंचीमुळे पुरुषांचे व्यक्तिमत्व नेहमी खुलून दिसते. उंच असणारे पुरुष वैवाहिक जीवनामध्ये आपल्याला खूप आनंद देऊ शकतात. असा महिलांचा समज असला तरी देखील, या संदर्भातला असा कोणताही शास्त्रीय सर्वे नसल्याचं देखील पाहायला मिळतं. प्रसारित करण्यात आलेला हा सर्वे महिलांच्या वैवाहिक आयुष्याचा अभ्यास करून काढण्यात आला असल्याने, उंच पुरुष वैवाहिक जीवनात महिलांना अधिक समाधान देऊ शकतात, असं ठामपणे म्हणता येणार नाही. असं देखील स्पष्ट करण्यात आले आहे.
हे देखील वाचा Second hand two wheeler: ४० हजार किमी पळालेली FZ केवळ 25 हजारांत; जाणून घ्या सर्व डिटेल्स..
INDvSA: बॅटिंग करत असताना के एल राहुलच्या पायातच निघाला साप; पुढे काय झालं पाहा व्हिडिओ..
SBI Recruitment 2022: भारतीय स्टेट बँकेत तब्बल इतक्या जागांसाठी मेगा भरती; जाणून घ्या सर्व डिटेल्स..
Marriage Tips: या ६ पदार्थांचा आहारात करा समाविष्ट; लैंगिक क्षमता वाढून मिळेल भरपूर आनंद..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम