Amazon Job: Flipkart नंतर अमेझॉन मध्येही निघाली मेगा भरती! चार तास काम करून मिळतोय ३० हजार महिना; असा करा अर्ज..

0

Amazon Job: फ्लिपकार्ट (Flipkart) आणि अमेझॉन (Amazon) या दोन e commerce website नी ग्राहकांच्या मनात कमालीची विश्वासार्हता निर्माण केली आहे. या दोन्हीं इ-कॉमर्स वेबसाईटवरून असंख्य ग्राहक वस्तूंची ऑनलाईन खरेदी (online Purchase) करतात. धावपळीच्या जीवनात अनेकांना प्रत्यक्ष दुकानात जाऊन शॉपिंग करणे शक्य होत नाही. शिवाय फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉन या दोन ई-कॉमर्स वेबसाईट ग्राहकांना आकर्षक ऑफरमध्ये अनेक वस्तू घरपोच देतात. साहजिकच यामुळे ऑनलाईन खरेदी करणाऱ्यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अमेझॉन आणि फ्लिपकार्ट (Amazon and Flipkart) या दोन e-commerce website पक्त वस्तूंची विक्री करत नाहीत, तर अनेकांना रोजगाराच्या संधी देखील उपलब्ध करून देतात.

फ्लिपकार्ट नंतर आता अमेझॉनने देखील भरती प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला असून, या संदर्भातली अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. (Amazon Job) ॲमेझॉन या ई-कॉमर्स वेबसाईटला देशांतर्गत असंख्य डिलिव्हरी बॉईजची आवश्यकता असून, यासंदर्भात त्यांनी अर्ज देखील मागवले आहेत. विशेष म्हणजे, हाफ-डे काम करून देखील तब्बल 30 ते 35 हजार रुपये दरमहा पगार मिळवण्याची संधी आता डिलिव्हरी बॉयकडे असणार आहे. चला तर मग अमेझॉनने जारी केलेल्या भरती प्रक्रियेसंदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊ.

महागाई (inflation) बरोबरच बेरोजगारीचा (unemployment) दर देखील दिवसेंदिवस वाढत आहे. साहजिकच अशा परिस्थितीत नोकरी मिळवणे अनेकांसमोरील आव्हान आहे. मात्र हळूहळू आता अनेक विभागात नोकरीच्या संधी उपलब्ध होत असून, उमेदवार मोठ्या प्रमाणात नोकरी करण्यासंदर्भात अर्ज देखील करत असल्याचे चित्र आहे. जर तुमच्याकडे टू-व्हीलर त्याचबरोबर ड्रायव्हिंग लायसन असेल, तर तुमच्यासाठी ही बातमी खूप महत्त्वाची आहे. केवळ चार तास काम करून तुम्ही तब्बल 30 ते 35 हजार रुपये दरमहा कमवू शकता. दिवसातून जर तुम्ही शंभर ते दीडशे पॅकेजची डिलिव्हरी केली तर तुम्हाला दरमहा तब्बल ५० ते ६० हजार पगार पडतो.

कसे सुरू होते काम

अमेझॉन ई-कॉमर्स वेबसाईटवर डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणाऱ्या उमेदवारांना सकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत डिलिव्हरी करावी लागते. मूळ वेतनाचा विचार करायचा झाल्यास, उमेदवारांना निश्चित पगार हा पंधरा हजार रुपयेच आहे. मात्र जर डिलिव्हरी बॉयने दिवसातून शंभर ते दीडशे पॅकेज डिलिव्हरी केली, तर त्याला पन्नास ते साठ हजार रुपये दरमहा पगार पडतो. असे दिल्लीचे डिलिव्हरी बॉय सांगतात. म्हणजे, विशेष म्हणजे हे शंभर दीडशे पॅकेज केवळ चार तासाच्या कालावधीमध्ये पूर्ण होतात. असं या विभागाचे मॅनेजर सांगतात. एका पॅकेज डिलिव्हरीसाठी अतिरिक्त पंधरा रुपये मिळतात. या सगळ्याची बेरीज केल्यानंतर, तुमचा पगार साठ हजार रुपयांच्या आसपास पोहोचतो.

असा करा ऑनलाईन अर्ज

अमेझॉन ई-कॉमर्स वेबसाईटमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून जर तुम्ही काम करू इच्छित असाल, तर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही तुमच्या मोबाईल मधील क्रोमवर जाऊन https://logistics.amazon.in/applynow असं सर्च करायचं आहे.

यानंतर तुमच्यासमोर अधिकृत वेबसाईट ओपन होईल. खाली स्क्रोल केल्यानंतर, तुम्हाला ॲमेझॉनवर सुरू असलेल्या भरती प्रक्रियेसंदर्भातला अर्ज करता येणार आहे. या वेबसाईटवर गेल्यानंतर, तुम्हाला अनेक विभागात निघालेल्या भरती संदर्भात देखील सविस्तर माहिती पाहायला मिळेल.

हे देखील वाचाViral video: जखमी कुत्र्याने दोन सिंहांना दाखवले अस्मान; विश्वास नाही बसत पाहा व्हिडिओ..

Good news for onion farmers: ऑक्टोंबर ते डिसेंबरमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांची होणार चांदी; जाणून घ्या किती रुपयांनी वाढणार कांदा..

Extra Marital Affairs: या सहा कारणांमुळे महिला ठेवतात विवाहबाह्य संबंध; चौथं कारण आहे खूपच भयंकर..

SBI Recruitment 2022: या पदवीधरांसाठी SBI मध्ये निघाली मेगाभरती; जाणून घ्या कसा करायचा अर्ज..

Government E-Commerce Site: फ्लिपकार्ट अमेझॉन वेबसाईटचा या सरकारी वेबसाईटने उठवला बाजार; लोक दाबून करतायत ऑर्डर..

Flipkart Jobs: फ्लिपकार्टमध्ये निघाली मेगा भरती! या पद्धतीने करता येणार वर्क फ्रॉम होम; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

Marriage Tips: बायकोच्या सतत चिडचिडेपणामुळे त्रस्त आहात? फक्त हे काम करा बायकोचा चिडचिडेपणा होईल कायमचा बंद..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.