Viral video: जखमी कुत्र्याने दोन सिंहांना दाखवले अस्मान; विश्वास नाही बसत पाहा व्हिडिओ..

0

Viral video: सोशल मीडिया ( social media) हे व्हायरल व्हिडिओच (Viral video) व्यासपीठ आहे. सोशल मीडियावर दररोज नवनवीन व्हिडिओ व्हायरल होतात. खास करून प्राण्यासंदर्भातले व्हिडिओ (animals video) सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतात. प्राण्यांच्या लाईफस्टाईल (animals lifestyle) विषयी अनेकांना जाणून घ्यायचं असतं. प्राणी काय खातात, कसे राहतात? हे जाणून घेण्याची अनेकांमध्ये उत्सुकता असते. साहजिकच यामुळे सोशल मीडियावर प्राण्यांचे व्हायरल झालेले व्हिडिओ अनेकांच्या पसंतीस देखील उतरतात. सोशल मीडियावर दोन सिंह आणि एका कुत्र्याच्या (two lion and one dog) लढाईचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे, व्हायरल झालेल्या या व्हिडिओत जखमी कुत्र्याने (dog) दोन सिहांची (Lion) पळता भुई केल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

सिंहाला जंगलाचा राजा का म्हणतात, हे कोणालाही वेगळे सांगण्याची गरज नाही. भलेभले प्राणी सिंहाच्या नादी लागत नाहीत. आपल्या वाटेत सिंह आडवा आला तरी देखील अनेक प्राणी आपली वाट बदलतात. परंतु सिंहाच्या वाटेला जायचं धाडस करत नाहीत. सिंहाने जर एखाद्या प्राण्याची शिकार करायची ठरवली, तर त्याच्या तावडीतून प्राणी सुटणे जवळजवळ अशक्य मानलं जातं. मात्र कधी-कधी अशक्य वाटणाऱ्या गोष्टी देखील शक्य होऊन जातात. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओत देखील असंच काहीसं घडलं आहे.

कुत्रा हा आपल्या एरियामध्ये प्रचंड दादागिरी करतो, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मात्र आपला एरिया सोडून गेल्यानंतर, कुत्र्यांना पळवून लावण्यात चिमुकल्यांना देखील यश येत असल्याचे तुम्ही देखील पाहिलं असेल. परंतु वेळ जेव्हा जीवावर येते, तेव्हा तुम्हाला प्रतिकार हा करावाच लागतो. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओ देखील हेच पाहायला मिळत आहे. कुत्र्याला अचानक एक सिंह आणि सिहिणीचा सामना करावा लागतो, तेव्हा तो न घाबरत स्वतः हून हल्ला करतो. कुत्र्याने केलेला हल्ला पाहून सिंह देखील घाबरून जात असल्याचे या व्हिडिओत पाहायला मिळत आहेत.

काय घडलं नक्की? 

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत एक सिंह आणि सिहिणी शांत झोपलेले पाहायला मिळत आहेत. इतक्यात समोरून एक जखमी झालेला कुत्रा येतो. शिकार चालून आली आहे, हे पाहून सिंह आणि सिहिणी टवकारतात. या दोघांच्या तावडीतून आता आपलं काही खरं नाही, हे लक्षात आल्यानंतर कुत्रा सुरुवातीला थोडासा घाबरतो. मात्र घाबरून आपला जीव वाचणार नाही, हे लक्षात आल्यानंतर, काळीज मोठं करून कुत्र्याने या दोघांचा सामना करण्याचा निर्णय घेतला. दोन सिंह आणि कुत्र्याच्या लढाईत अर्थातच सिंह जिंकणार. मात्र कधी-कधी डोळ्यांना विश्वास न बसणारी दृश्य देखील पाहायला मिळतात.

सिंहांना घाबरून आपण पळ काढला, तर आपलं काही खरं नाही, हे लक्षात घेऊन कुत्र्याने या दोघांवर हल्ला केला. कुत्र्याने अचानक केलेला हल्ला पाहून सिंह देखील घाबरल्याचे व्हायरल व्हिडिओत पाहायला मिळत आहे. कुत्र्याची शिकार करायच्या उद्देशाने सिंह कुत्र्याच्या दिशेने सरसावले, मात्र कुत्र्याने या गोघांना काही कळायच्या आत जोरदार प्रतिहल्ला केला. कुत्र्याचा हल्ला प्रचंड आक्रमक असल्याने सिंह घाबरून मागे सरकले. दोन्हीं सिंहांनी आपली शिकार करण्याचा नाद सोडला हे लक्षात आल्यानंतर, कुत्रा आपल्या वाटेने जाऊ लागला. तेवढ्यात सिंह पुन्हा एकदा कुत्र्याची शिकार करण्यासाठी पुढे सरकले. आता मात्र कुत्रा प्रचंड संतापला. आणि पुन्हा त्याने रौद्ररूप धारण केले.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत दोन्हीं सिंहांना पराभूत केल्यानंतर, कुत्रा आपल्या दिशेने जाऊ लागला. मात्र सिंहाने पुन्हा एकदा कुत्र्याच्या दिशेने चाल करायला सुरुवात केली. आता मात्र कुत्रा प्रचंड संतापला आणि कुत्र्याने पुन्हा एकदा सिंहावर भली मोठी झडप घेत हल्ला केला. कुत्र्याने टाकलेली भली मोठी झडप पाहून, सिंह देखील प्रचंड घाबरून पाठीमागे सरकले. कुत्र्याची शिकार करण्याचा नाद सिंह आणि सिहिणीने सोडला. भल्या मोठ्या सिंहाच्या तावडीतून आपला जीव वाचवण्यात कुत्र्याला यश आल्यानंतर, कुत्रा गुपचूप आपल्या दिशेने निघून गेला.

काय म्हणाले नेटकरी?

डोळ्यांना विश्वास न बसणारा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान वायरल झाला आहे. व्हायरलच नाही तर या व्हिडिओला तब्बल साडे सहा लाखाहून अधिक लाईक्स देखील मिळाले आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ ‘safari eyes’ या यूट्यूब चैनलवरुन शेअर करण्यात आला आहे. या विडिओला तब्बल साडेतीन कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडिओखाली अनेकांनी कमेंट करताना कुत्र्याचे कौतुक केले आहे. एका युजर्सने म्हंटले आहे, ‘साहस’ असेल, तर तुम्ही कोणाचाही पराभव करु शकता. दुसऱ्या एका युजर्स म्हंटले आहे, आज या व्हिडिओमधून माणसाला खूप काही शिकण्यासारखे आहे. संकटे कितीही मोठी असली तरी हार न मानता, त्याचा सामना करणे आवश्यक आहे.

हे देखील वाचा Good news for onion farmers: ऑक्टोंबर ते डिसेंबरमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांची होणार चांदी; जाणून घ्या किती रुपयांनी वाढणार कांदा..

Extra Marital Affairs: या सहा कारणांमुळे महिला ठेवतात विवाहबाह्य संबंध; चौथं कारण आहे खूपच भयंकर..

Face yoga benefits: तरुण चेहरा दिसण्यासाठी चेहऱ्याचाही करावा लागतो व्यायाम; जाणून घ्या चेहऱ्याचे दोन व्यायाम आणि फायदे..

Navratri vrat: नवरात्रीत उपवासाला भगर खात असाल तर पहिल्यांदा ही बातमी वाचा; भगरी विषयी जाणून घ्या या गोष्टी अन्यथा.. 

Lifestyle: विसाव्या वर्षात चुकूनही करू नका हे काम; अन्यथा आयुष्याची राख रांगोळी होण्यापासून कोणीच नाही वाचवू शकणार..

Women Psychology: सेक्स करताना महिलांच्या डोक्यात सुरू असतो हा अजब विचार; जाणून उडतील होश..

Flipkart Jobs: फ्लिपकार्टमध्ये निघाली मेगा भरती! या पद्धतीने करता येणार वर्क फ्रॉम होम; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

SBI Recruitment 2022: या पदवीधरांसाठी SBI मध्ये निघाली मेगाभरती; जाणून घ्या कसा करायचा अर्ज..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.