Pradhan Mantri Ujjwala Yojana: ‘या’ योजनेअंतर्गत मिळतोय मोफत गॅस सिलिंडर; ‘असा’ करा अर्ज आणि घ्या योजनेचा लाभ..
Pradhan Mantri Ujjwala Yojana: इंधनाचे दर दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. (Fuel price) गॅस सिलेंडरच्या दरात (gas cylinder price) देखील सातत्याने वाढ होत असल्याने आता सर्वसामान्यांना गॅसवर स्वयंपाक करणे परवडत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. गेल्या काही वर्षात गॅसच्या किंमती तब्बल डबल झाल्या आहेत. सध्या घरगुती गॅसची किंमत जवळपास हजाराच्या घरात पोहोचली आहे. गॅसच्या किंमती सातत्याने वाढत असल्याने केंद्र सरकारवर जोरदार टीका देखील होत आहे. मात्र तुम्हाला उज्वला योजने अंतर्गत आता मोफत गॅस सिलेंडर (Gas cylinder price) मिळणार आहे, याविषयी माहिती आहे का? अजूनही तुम्हाला योजनेविषयी माहिती नसेल तर, ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे.
अनेकांना आता गॅसवर स्वयंपाक करणे परवडत नसले तरी, सरकारी योजनेअंतर्गत तुम्हाला गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहे. ज्या योजनेअंतर्गत तुम्हाला गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहे, त्या योजनेचे नाव प्रधानमंत्री उज्वला योजना २.० असं आहे. आपण उज्वला योजनेअंतर्गत कोणत्या ग्राहकांना मोफत गॅस सिलेंडर मिळणार आहे, याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
या लोकांना मिळणार फायदा
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत मोफत गॅस सिलेंडरचा लाभ घ्यायचा असल्यास तुम्ही फक्त महिला असणे आवश्यक आहे. महिला व्यतिरिक्त या योजनेचा लाभ कोणालाही घेता येणार नाही. त्याबरोबरच तुमचे वय 18 वर्षे पूर्ण असणे बंधनकारक असणार आहे. ज्या पत्त्यावर तुम्ही अर्ज केला आहे, त्या पत्त्यावर यापूर्वी एलपीजी कनेक्शन नसणं आवश्यक आहे. जर त्या पत्त्यावर एलपीजी कनेक्शन असेल, आणि तुम्ही अर्ज केला असेल, तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही.
प्रधानमंत्री उज्वला योजना अंतर्गत मोफत गॅस सिलेंडर योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्ही फक्त – SC, ST, तसेच प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभार्थी (ग्रामीण), तसेच अधिक मागासवर्गीय (MBC), अंत्योदय अन्न योजना (AAY), वनवासी, बेटे आणि बेटांवर राहणारे लोक इत्यादी लाभार्थींना या योजनेचा लाभ मिळणार आहे. आता आपण या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक असणार आहेत, त्याविषयी जाणून घेऊ.
ही कागदपत्रे असणं आवश्यक
आधार कार्ड, शिधापत्रिका, बँक खाते क्रमांक IFSC इत्यादी कागदपत्रे तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे, या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईनच अर्ज करता येणार आहे. त्यामुळे आता तुम्हाला कुठेही योजनेचा लाभ घेण्यासाठी हेलपाटे घालावे लागणार नाहीत. आपण या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? या संदर्भात सविस्तर माहिती घेऊ.
असा करा ऑनलाईन अर्ज
वर आपण माहिती पाहिली, त्याप्रमाणे प्रधानमंत्री उज्वला योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमधील क्रोमवर जाऊन https://www.pmuy.gov.in/ujjwala2.html असं सर्च करायचं आहे. तुमच्या मोबाईलवर क्रोमवर असें सर्च केल्यानंतर, तुमच्या समोर प्रधानमंत्री उज्वला योजनेची अधिकृत वेबसाईट ओपन झालेली दिसेल. वेबसाइट ओपन झाल्यानंतर तुम्हाला, ज्या कंपनीचा गॅस हवा आहे, कििंवा ज्या कंपनीची गाडी तुमच्या घरापर्यंत येते, ती कंपनी निवडायची आहे. तुम्ही एलपीजी ग्ॅस कंपनी निवडल्यानंतर, तुमच्यासमोर नवीन पेज ओपन झालेला दिसेल.
नवीन पेज ओपन झाल्यानंतर, त्या ठिकाणी तुम्हाला तुमचे खाते तयार करावे लागणार आहे. तुमचे खाते तयार केल्यानंतर, या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. या ठिकाणी तुम्हाला सर्व कागदपत्रे स्कॅन करावी लागणार आहेत. अर्ज भरल्यानंतर, तुम्हाला जवळच्या वितरण कार्यालयात जावे लागेल. कार्यालयात गेल्यानंतर, त्या ठिकाणी तुमची सर्व कागदपत्रे तपासली जातील, आणि नंतर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कोणताही खर्च आकारण्यात येत नाही. आणि तुम्हाला मोफत सिलेंडर गॅस दिला जातो.
हे देखील वाचा Lifestyle: एखाद्या व्यक्तीविषयी फक्त शारीरिक आकर्षण आहे, की तुम्ही त्याच्या प्रेमात पडलाय? हे कसं ओळखायचं, वाचा सविस्तर..
Ration Card: आता या लोकांचे रेशन कार्ड होणार बंद! सरकारचा महत्वपूर्ण निर्णय
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम