Navneet Rana: हनुमान यांचं नाव हनुमान कसं पडलं? या प्रश्नाचे उत्तर देताना नवनीत राणा यांनी केली नौटंकी; पहा व्हिडिओ..

0

Navneet Rana: गेल्या काही दिवसांपासून अमरावतीचे खासदार नवनीत राणा (navneet Rana)आणि त्यांचे पती आमदार रवी राणा (Ravi Rana) हे दोन राणा दाम्पत्य चांगलेच चर्चेत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या मातोश्री (matoshri) या निवासस्थानी जाऊन आपण हनुमान चालीसा (Hanuman chalisa) पठण करणार असल्याची भूमिका या दाम्पत्याने घेतल्यानंतर शिवसेना (shivsena) चांगलीच आक्रमक झाली. याचे परिणाम राणा दाम्पत्याला भोगावे लागले चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांना खार पोलिसांनी (khar police) अटक देखील केली. एवढेच नाही तर राजद्रोहाचा खटला देखील त्यांच्यावर लावण्यात आला. तब्बल त्यांना 14 दिवस पोलिस कोठडीत काढावे लागले, आता सध्या ते जामिनावर बाहेर आहेत, मात्र आता देखील आपला आक्रमक पवित्रा त्यांनी कायम ठेवला असल्याचं पाहायला मिळत आहे.

नुकत्याच एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत नवनीत राणा यांना हनुमान यांचं नाव हनुमान कसं पडलं? हा प्रश्न विचारण्यात आला. मात्र या प्रश्नाचे उत्तर या दोन्हीं दाम्पत्यांना माहीत नव्हतं. हा प्रश्न विचारताच नवनीत राणा यांची चांगलीच बोबडी वळाल्याचे पाहायला मिळालं. नवनीत राणा यांना या प्रश्नाचे उत्तर माहीत नाही हे पाहून, महिला पत्रकारांनी पुन्हा एकदा हनुमानजी यांचं नाव हनुमानजी कसं पडलं? हा प्रश्न विचारला. यावर नवनीत राणा म्हणाल्या, तुम्ही जर इतिहासात जात असाल, तर नक्कीच आम्ही इतिहास देखील तपासून पाहू. आता आम्ही हनुमान चालीसाचे पठण करत आहेत. आपण त्याविषयी आम्हाला विचारलं तर, आम्ही नक्की उत्तर देऊ, असं घूमजाव केलं.

सोशल मीडियावर मुलाखतीचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला असून, अनेकांनी राना दाम्पत्यावर जोरदार टीका केली आहे. “लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः मात्र कोरडे पाषाण” अशी जोरदार टिका काँग्रेसचे नेते सत्यजित तांबे यांनी केली आहे. हनुमान चालीसा पठणावरून राणा दाम्पत्य जोरदार आक्रमक झाल्याचे पाहायला मिळालं होतं. नुकतंच त्यांनी दिलीमध्ये जाऊन हनुमान चालीसाचे पठन केल्याच्या बातम्याही झळकल्या होत्या. मात्र आता हनुमानाविषयी काहीही माहिती नसताना देखील, या मुद्दाम समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचं सोशल मीडियावर आता बोललं जात आहे.

नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या मुलाखतीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. हनुमानजी यांचं नाव हनुमान कसं पडलं, या प्रश्नावर हे दोन्हीं दाम्पत्य चांगलेच गोंधळून गेल्याचं पाहायला मिळ आहे. तुम्ही एवढ्या हनुमानाच्या भक्त आहात, तर हनुमानाचं नाव हनुमान पडले? हे तुम्हाला माहिती असेल, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. मात्र त्यांनी प्रश्नाचे उत्तर माहीत नसल्याचं दिसून आले. आणि त्यांनी लगेच आपले पती रवि राना यांच्याकडे पाहीले. मात्र त्यांना देखील या प्रश्नाचे उत्तर माहीत नसल्याने, ते देखील खाली मान घालून गप्प बसल्याचं, या व्हिडिओच पाहायला मिळत आहे.

राणा दाम्पत्यांनी गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेला टार्गेट केल्याचं पाहायला मिळत आहे. खासकरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर अनेक वेळा ऐकेरी भाषेत देखील टीका केली होती. साहजीकच यामुळे शिवसेना चांगलीच आक्रमक झाली. त्यामुळे नवनीत राणा आणि शिवसेना हा टोकाचा संघर्ष पाहायला मिळाला. नवनीत राणा यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे त्यांना तब्बल 14 दिवस जेलची हवा देखील खावी लागली. 14 दिवसानंतर अखेर त्या जामिनावर बाहेर आल्या, मात्र तरीदेखील त्या अजूनही शिवसेनेवर टीका करताना दिसून येत आहेत. मात्र आता हनुमानाविषयी नवनीत राणा यांना काहीही माहिती नसल्याचे, स्पष्ट झाल्याने सोशल मीडियावर त्यांना जोरदार ट्रोल करण्यात येत आहे.

हे देखील वाचा SSC Phase 10 Recruitment: केंद्रीय कर्मचारी निवड आयोगात दहावी, बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी..

Lifestyle: एखाद्या व्यक्तीविषयी फक्त शारीरिक आकर्षण आहे, की तुम्ही त्याच्या प्रेमात पडलाय? हे कसं ओळखायचं, वाचा सविस्तर.. 

PM kisan Update: मोठी बातमी! अकरावा हप्ता आलेल्या लाभार्थ्यांची यादी केंद्र सरकारकडून जाहीर; अशी चेक करा यादी..

Ration Card: आता या लोकांचे रेशन कार्d होणार बंद! सरकारचा महत्वपूर्ण निर्णय 

Ration Card Update: रेशनकार्डमध्ये नवीन सदस्याचे नाव समाविष्ट करायचंय? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया सोप्या भाषेत..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.