Agriculture: केंद्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय! पीएम किसान लाभार्थ्यांना आता सहा ऐवजी अकरा हजार मिळणार..
Agriculture: केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी यासाठी दर वर्षी सहा हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला. पंतप्रधान कृषी सन्मान योजनेच्या (pm-kisan) माध्यमातून देशातील शेतकऱ्यांना दर चार महिन्यांच्या अंतराने तीन हप्त्यात शेतकऱ्यांच्या डायरेक्ट बँक खात्यावर सहा हजार रुपये टाकण्याचे काम केंद्र सरकार (central government) करतं. आतापर्यंत केंद्र सरकारने एकूण दहा हप्ते ‘पीएम किसान’ (pm-kisan) योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या अकाउंटवर ट्रान्स्फर (transfer) केली आहे. ‘अकराव्या हप्ता’च्या प्रतीक्षेत पीएम किसान लाभार्थी शेतकरी असून, लवकरच अकरावा हप्ता लाभार्थी शेतकऱ्यांच्या अकाउंटवर येणार आहे.
देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे, यासाठी केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवत आहे. आता पीएम किसान योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना केंद्र सरकार आणखी मदत करणार असल्याचं समोर आलं आहे. ‘पीएम किसान’ लाभार्थी शेतकऱ्यांना आता केंद्र सरकार खत खरेदी करण्यासाठी सबसिडी देणार असल्याची माहिती सूत्रांकडून समजले असून, यासंदर्भात लवकरच निर्णय जाहीर करण्यात येणार आहे. ‘पीएम किसान’ लाभार्थी शेतकऱ्यांना आता केंद्र सरकार खत खरेदी करण्यासाठी पाच हजार रुपये सबसिडी देणार असल्याची महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. पाच हजार रुपये सबसिडी संदर्भात केंद्र सरकार आराखडा तयार करत असून, लवकरच याबाबत अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.
फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार अकरा हजार
देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी यासाठी पीएम किसान योजनेअंतर्गत केंद्र सरकार दरवर्षी शेतकऱ्यांच्या डायरेक्ट खात्यावर सहा हजार रुपये ट्रान्सफर करत आहे. हे आपल्याला माहिती आहे. मात्र आता या शेतकऱ्यांच्या खात्यावर केंद्र सरकार खत खरेदी करण्यासाठी सबसिडी म्हणून आणखी पाच हजार रुपये ट्रान्सफर करणार असल्याची माहिती समोर आली आहे. केंद्र सरकारने या विषयी अधिकृत माहिती जाहीर केली नसली तरी, यासंदर्भात खात्रीशीर माहिती मिळाली आहे. शेतकऱ्यांना पाच हजार रुपयाची रक्कम दोन हप्त्यात मिळणार आहे.
या दोन हप्त्यात दिली जाणार रक्कम
पी एम किसान योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना केंद्र सरकार खत खरेदी करण्यासाठी सबसिडी म्हणून, पाच हजार रुपये देणार आहे. हे पाच हजार रुपये केंद्र सरकार दोन हप्त्यात शेतकऱ्यांच्या अकाउंटवर डायरेक्ट ट्रान्सफर करणार आहे. यामध्ये अडीच हजार रूपयांचा पहिला हप्ता रब्बी पिकाच्या पेरणीच्या अगोदर तर दुसरा हप्ता खरीप पिकाची पेरणी करायच्या अगोदर, पीएम किसान लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर ट्रान्सफर केला जाणार आहे. त्यामुळे आता पीएम किसान लाभार्थी शेतकऱ्यांना दर वर्षी अकरा हजार रुपये आर्थिक मदत मिळणार आहे.
60 हजार 939 कोटींची तरतूद
देशात महागाई गगनाला भिडली आहे. यामध्ये शेतकऱ्यांना उपयोगी पडणारे, बी-बियाणे, खते आणि औषधे देखील प्रचंड महागली आहेत. गेल्या दीड-दोन वर्षात खताच्या किंमती तब्बल दुपटीने वाढल्या असल्याने, शेतकरी प्रचंड संतप्त असल्याचं पाहायला मिळतं. आणि म्हणून केंद्र सरकारने शेतकऱ्यांना खत खरेदी करताना सबसिडी म्हणून पाच हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने एप्रिल 2022 ते सप्टेंबर 2022 या कालावधीत खरीप हंगामाकरीता तब्बल 60,939 कोटींची तरतूद केली असून, खत खरेदीवर केंद्र सरकार तब्बल 60,939 कोटी अनुदान देणार आहे.
शेतकऱ्यांना ‘ही’ खते खरेदी करता येणार
केंद्र सरकार खत खरेदी करण्यासाठी सबसिडी म्हणून जे पाच हजार रुपये देत आहे, त्यामध्ये शेतकऱ्यांना DAP तसेच पोटॅश,फॉस्फेटयुक्त, इत्यादी खते खरेदी करता येणार आहेत. केंद्र सरकारने पाठीमागच्या वर्षी खत खरेदीसाठी अनुदान म्हणून केवळ 57 हजार एकशे पन्नास कोटी रुपयांची तरतूद केली होती.
लाभ घेण्यासाठी ई-केवायसी करणं बंधनकारक
पीएम किसान योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना खत खरेदीसाठी सबसिडी देण्यात येणार आहे, मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या बँक खात्याशी आधार लिंक असणं बंधनकारक असणार आहे. त्यामुळे जर तुम्ही ई-केवायसी केली नसेल तर, खालील पद्धत वापरून तुम्ही ई-केवायसी करू शकता.
या सोप्या पद्धतीने करा ई-केवायसी(e-kyc)
केवायसी करण्यासाठी सर्व प्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलवर क्रोमवर जाऊन https://pmkisan.gov.in/ असं सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर, तुमच्यासमोर *पीएम किसान’ योजनेची अधिकृत वेबसाईट ओपन झालेली दिसेल. त्यानंतर तुम्हाला ‘फार्मर्स कॉर्नर’ अंतर्गत ई-केवायसी या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
इथपर्यंत व्यवस्थित प्रोसेस झाल्यानंतर तुमच्यासमोर, एक नवीन पेज ओपन झालेलं दिसेल. त्या पेजवर तुम्हाला आधार क्रमांकाची संपूर्ण माहिती लिहावी लागणार आहे. माहिती भरल्यानंतर, तुम्हाला ‘सर्च’ या पर्यायावर क्लिक करायचं आहे. यानंतर आधारही लिंक असणाऱ्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी (OTP) येईल.
यानंतर समोर दिसणाऱ्या रकान्यात आलेला ओटीपी टाकून सबमिट या पर्यायावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर e-kyc सक्सेसफुल असा मेसेज आलेला दिसेल, याचा अर्थ तुमची ई-केवायसी प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे, असा होतो.
हे देखील वाचा Post office Scheme: आता पोस्ट ऑफिस खातेधारकांना मिळणार १३००० महिना; तुम्हीही घेऊ शकता लाभ जाणून घ्या सविस्तर..
Aadhaar Updation: आधार कार्डवर जन्मतारीख चुकीची असल्यास घेता येणार नाही या योजनांचा लाभ; ya सोप्या पद्धतीने बदला जन्मतारीख..
Google Search: गुगलवर या तीन गोष्टी सर्च केल्यास, पोलीस ठोकतील बेड्या..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम