Aadhaar card: आधार कार्ड हरवलंय? काळजी करू नका, ‘या’ सोप्या पद्धतीने ‘चुटकीसरशी’ घरबसल्या डाऊनलोड करा..
Aadhaar card: आधार कार्ड हे आता प्रत्येक माणसाची ओळख बनलं आहे. आधार कार्ड (aadhaar card) शिवाय माणूस जगू शकत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, हे तुम्हाला वेगळे सांगण्याची गरज नाही. कुठलेही दप्तर असो, आधार कार्ड हे तुमच्याकडे असणं बंधनकारकच आहे. सरकारी कार्यालय असो की खासगी कार्यालय आधार कार्ड शिवाय तुमचं कुठलही काम होत नाही. त्यामुळे अलीकडच्या काळात आधार कार्ड तुमच्या जीवनमरणाचा प्रश्न बनलं आहे. सहाजिकच त्यामुळे आधार कार्डला अनेक जण खूप जपतात. तरी देखील काही वेळा तुमचं आधार कार्ड हरवतं.
जर तुमचं आधार कार्ड हरवलं असेल, तर आता तुम्हाला घाबरून जाण्याची काहीही गरज नाही. खेडेगावात अनेकदा असं होतं, आधार कार्डचा नंबर तुम्हाला माहीतही नसतो, आणि आधार कार्ड हरवतं. एवढेच नाही, तर अनेकांनी आधार कार्डची झेरॉक्स कॉपी देखील काढून ठेवलेली नसते. सहाजिकच आधार कार्ड हरवल्यानंतर अनेक जण घाबरून जातात. मात्र आता घाबरण्याचे काहीही कारण नाही. जर तुमचं आधार कार्ड हरवले असेल, तर तुम्ही ‘चुटकीसरशी’ तुमचं आधारकार्ड तुमच्या मोबाईलवरून डाऊनलोड करू शकता. यासंदर्भात आम्ही तुम्हाला सोप्या भाषेत सविस्तर माहिती सांगणार आहोत.
‘असे’ करा चुटकीसरशी आधारकार्ड डाउनलोड
जर तुमचं आधार कार्ड हरवलं आहे, आणि तुम्हाला आधार कार्ड डाउनलोड करायचं आहे, तर सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलवर क्रोमवर जाऊन https://myaadhaar.uidai.gov.in/ असं सर्च करायचं आहे. तुम्ही क्रोमवर जाऊन https://myaadhaar.uidai.gov.in/ असं सर्च केल्यानंतर, तुमच्या समोर ओपन झालेल्या पेजवर Login हा पर्याय दिसेल. Login करण्यासाठी तुमच्यासमोर दोन पर्याय असतील, त्यातला एक पर्याय म्हणजे, बायोमेट्रिकच्या पद्धतीने Login करण्याचा, आणि दुसरा OTP च्या सहाय्याने आधार कार्ड डाउनलोड करायचा. आता तुम्हाला हरवलेलं आधार कार्ड डाऊनलोड करण्यासाठी ‘ओटीपी’ हा पर्याय निवडावा लागेल.
इथपर्यंत व्यवस्थित प्रोसेस झाल्यानंतर, तुम्ही OTP या पर्यायावर क्लिक करायचं आहे. OTP या पर्यायावर क्लिक केल्यानंतर, तुमच्यासमोर ‘Enter Aadhaar’ आणि ‘Enter Above Captcha’ असे दोन पर्याय दिसतील. आता तुम्हाला Enter Aadhaar या पर्यायामध्ये तुमचा ‘आधार कार्ड’ नंबर टाकायचा आहे. त्यानंतर कॅप्चा रकान्यात चौकटीत दिसणारी अक्षरे किंवा नंबर टाकावी लागणार आहेत.
इथपर्यंत प्रोसेस झाल्यानंतर, तुम्हाला Send OTP या पर्यायावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल हा OTP तुम्ही समोर दिसणाऱ्या रकान्यामध्ये टाकल्यानंतर, तुम्ही Login होणार आहे. तुम्ही लॉग इन झाल्यानंतर, तुम्हाला Download Aadhar हा पर्याय दिसेल. या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमची पुष्टी होईल, मात्र यासाठी तुम्हाला पासवर्ड मागितला जाणार आहे. अनेकांना प्रश्न पडला असेल, पासवर्ड काय टाकायच? तर यासंदर्भात देखील आम्ही सविस्तर माहिती देत आहोत.
‘हा’ पासवर्ड टाका
आधार कार्ड डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला पासवर्ड मागितला जाईल, हा पासवर्ड म्हणजे, तुमच्या नावाची पहिली चार अक्षरे आणि जन्मतारखेचे साल टाकावे लागणार आहे. तुमच्या नावाची पहिली चार अक्षरे ही कॅपिटलमध्येच टाकणे आवश्यक आहे. अनेकांना अजूनही समजलं नसेल, तर आपण उदाहरण देऊन समजून घेऊया, समजा तुमचं नाव Virat Kohli आहे आणि तुमची जन्मतारीख १२/०४/१९९५ आहे, तर तुमचा पासवर्ड असेल, ‘VIRA1995’
हे देखील वाचा MSRTC Requirement 2022: एसटी महामंडळात मेगा भरती; असा करा ऑनलाइन अर्ज..
SAUR KRUSHI PUMP YOJANA: सौर कृषी पंपासाठी राज्य सरकारकडून आता ९५ टक्के अनुदान; असा करा अर्ज..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम