SBI e-mudra loan: स्टेट बँकेत अकाऊंट आहे? लगेच करा अर्ज घर-बसल्या मिळेल दोन लाख कर्ज..

0

SBI e-mudra loan: केंद्र सरकारने छोट्या व्यवसायिकांना पन्नास हजारापासून दहा लाखांपर्यंत कर्ज पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना (pradhanmantri mudra loan Yojana) असं या योजनेचे नाव असून, या योजनेच्या माध्यमातून तुम्ही कोणत्याही बँकेतून दहा लाख रुपयांपर्यंत कर्ज घेऊ शकता. एसबीआय मुद्रा लोनसाठी (SBI e mudra loan) आता SBI ने ऑनलाइन सुविधा देखील द्यायला सुरुवात केली आहे. जर तुम्ही एसबीआयचे ग्राहक असाल, तर तुम्हाला घरबसल्या लोन मिळू शकतं. जाणून घेऊया याविषयी सविस्तर.

छोटा मोठा व्यवसाय करून आपले स्वप्न पूर्ण करण्याची प्रत्येकाची इच्छा असते. मात्र भांडवल नसल्याने व्यवसाय करता येत नाही. मात्र अशा लोकांचे स्वप्न आता सत्यात उतरणार आहे. केंद्र सरकार मुद्रा लोन देत आहे. मुद्रा लोन योजनेत केंद्र सरकारने तीन भाग केले आहे. यामध्ये शिशु कर्ज, किशोर कर्ज आणि तरुण कर्ज, असं या योजनेचे वर्गीकरण केले आहे.

तीन श्रेणींमध्ये कर्ज योजना

शिशु कर्जाच्या माध्यमातून तुम्हाला पन्नास हजार रुपयांपर्यंत व्यवसाय करण्यासाठी बँका लोन देतात. तर किशोर कर्जाच्या माध्यमातून तुम्ही पाच हजारापासून पाच लाखांपर्यंत तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी कर्ज घेऊ शकता. तरुण कर्जामध्ये तुम्ही पाच लाखांपासून दहा लाखांपर्यंत तुमच्या व्यवसाय वाढवण्यासाठी कर्ज घेऊ शकता.

कोणाला मिळते कर्ज

केंद्र सरकारच्या मुद्रा लोन योजनेच्या माध्यमातून लहान उद्योजक, सेवा क्षेत्रातील कंपन्या, त्याचबरोबर दुकानदार, पुरवठादार इत्यादी व्यावसायिकांना या योजनेचा लाभ घेता येतो. लघुउद्योग वाढवण्यासाठी त्याच बरोबर या व्यवसायासाठी लागणारी यंत्रसामुग्री उपलब्ध व्हावी, यासाठी केंद्र सरकारने ही योजना सुरू केली आहे.

कोणकोणत्या बँका देतात कर्ज

केंद्र सरकारने 2015 साली पंतप्रधान मुद्रा योजना सुरू केली. या योजनेच्या माध्यमातून दहा लाख रुपयांपर्यंत कर्ज पुरवठा केला जातो. हे कर्ज तुम्ही कोणत्याही सरकारी बँकेतून, बिगरसरकारी वित्तीय संस्थेमधून, त्याचबरोबर ग्रामीण बँका, सोबतच लहान बँकेत देखील या कर्जासाठी अर्ज करू शकता. आज आपण एसबीआयच्या माध्यमातून घरबसल्या लोन कसे मिळवायचे, हे सविस्तर जाणून घेणार आहोत. (SBI e-mudra loan eligibility and process)

जर तुमचं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये अकाउंट नसेल तरीदेखील तुम्हाला कर्ज मिळू शकते. मात्र त्यासाठी तुम्हाला ऑफलाइन प्रोसेस पूर्ण करावी लागेल. मात्र जर तुमचं स्टेट बँकेत अकाउंट असेल, तर तुम्हाला घरबसल्या ऑनलाईन एसबीआय ई मुद्रा लोनसाठी अर्ज करता येणार आहे.

SBI e-Mudra कर्जाचे फायदे

इतर बँकेच्या तुलनेत एसबीआय SBI e-Mudra लोनची सुविधा जर तुम्ही घेतली तर तुम्हाला अनेक फायदे मिळतात. यामध्ये तुम्हाला ओव्हरड्राफ्टचा देखील फायदा मिळतो. हे कार्ड मिळाल्यानंतर, तुम्ही डेबिट कार्ड प्रमाणे हे काम करतं. हे लोन मिळवण्यासाठी तुम्हाला कोणतीही प्रोसेसिंग फी द्यावी लागत नाही. शिवाय कर्ज घेण्यासाठी तुम्हाला कोणतेही तारण ठेवावे लागत नाही. बिझनेस लोन पेक्षा कैकपटीने स्वस्त कर्ज तुम्हाला या योजनेच्या माध्यमातून मिळते.

SBI e-Mudra कर्जाची ऑनलाईन पद्धत

प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेच्या माध्यमातून तुम्हाला SBI e-Mudra लोन घरबसल्या मिळू शकते. यासाठी एसबीआय बँकेने ऑनलाईन सुविधा सुरू केली आहे. जर तुम्हाला ऑनलाईन प्रक्रिया किचकट वाटत असेल, तर तुम्ही थेट बँकेत जाऊन देखील योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करू शकता. ऑनलाइन SBI e-Mudra लोन मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईल मधील क्रोमवर जाऊन https://emudra.sbi.co.in:8044/emudra असं सर्च करायचं आहे.

नंतर तुमच्यासमोर अधिकृत वेबसाईट ओपन होईल. वेबसाईट ओपन झाल्यानंतर, “process to e mudra” यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर सूचना आणि अटी संदर्भात एक चार्ट ओपन होईल. हा चार्ट तुम्ही व्यवस्थित वाचून “OK” या पर्यायावर क्लिक करायचं आहे. नंतर तुम्हाला मोबाईल नंबर, कॅपचा कोड, तुमचा अकाउंट नंबर, आणि तुम्हाला पाहिजे असणाऱ्या लोनची रक्कम टाकायची आहे. यापुढे तुम्हाला विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तर देऊन तुम्ही ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया पुर्ण करू शकता.

हे देखील वाचा Simple Energy EV: ताशी 105 किमी प्रवास, एका चार्जमध्ये 236 किमी रेंज, किंमत फक्त इतकी..; जाणून घ्या या दमदार इलेक्ट्रिक स्कूटर विषयी..

IRCTC Tatkal Ticket Booking: रेल्वेचे तत्काळ तिकीट या ठिकाणी करा बूक, अन्यथा होईल मोठी अडचण

PM Kisan Samman Nidhi: १४ व्या हप्त्याची तारीख निश्चित! फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार ४ हजाराचा हप्ता; तुम्हाला मिळणार का? जाणून घ्या या पध्दतीने..

IPL 2023: नाकातून मेकुड काढून अर्जुन तेंडुलकरने टाकला तोंडात; व्हिडिओ झाला कॅमेऱ्यात कैद..

TATA electric bicycle: टाटाची सगळ्यात स्वस्त आणि दमदार सायकल बाजारात दाखल; किंमत आहे केवळ..

MahaDBT Scheme: आता मागेल त्या शेतकऱ्यांना मिळणार शेततळे, ठिबक सिंचन, फळबाग; जाणून घ्या सविस्तर..

Mangoes Buying Tips: या तीन गोष्टी तपासून ओळखता येतो आंबा गोड आहे की आंबट; जाणून घ्या या तीन सोप्या ट्रिक्स..

land area calculator: मोबाइलवरुन 5 मिनिटात मोजता येतेय जमीन; लगेच जाणून घ्या ही सोपी प्रोसेस..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.