Income Tax Bharti 2023: पदवीधर आणि दहावी पास उमेदवारांसाठी आयकर विभागात मोठी भरती; लगेच असा करा अर्ज..
Income Tax Bharti 2023: महागाई (inflation) बरोबर बेरोजगारी (unemployment) देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे साहजिकच यामुळे कुठेतरी चार पैशाची नोकरी मिळवणं खूप आवश्यक आहे. असं असलं तरी देखील, रोजगाराच्या संधी उपलब्ध नसल्याने अनेकांना नोकरी मिळवण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते. उच्च शिक्षण घेऊन देखील नोकरीची कोणतीही शाश्वती नसल्याने, अनेक जण दहावी बारावीनंतर कुठेतरी चार पैशाची नोकरी करताना पाहायला मिळतात. जर तुमची दहावी पूर्ण असेल, आणि तुम्ही नोकरीच्या शोधात असाल, तर आयकर विभागामध्ये तुम्हाला नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. (Income Tax Recruitment 2023)
आयकर विभागामध्ये (income tax department) विविध पदांसाठी भरती निघाली असून, या संदर्भातली अधिसूचना देखील जारी करण्यात आले आहे. आयकर विभागात अर्ज करू इच्छित असणाऱ्या उमेदवारांना 14 एप्रिल पर्यंत अर्ज करता येणार आहेत. आयकर विभागात भरण्यात येणाऱ्या एकूण 41 रिक्त जागांसाठी उमेदवारांची पात्रता काय निश्चित करण्यात आली आहे? सोबतच उमेदवारांना दरमहा किती पगार मिळणार? वयोमर्यादा? अर्ज कसा करायचा? जाणून घेऊया या संदर्भात सविस्तर.
आयकर विभागामध्ये एकूण 41 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. यामध्ये “आयकर निरीक्षक” या पदासाठी चार जागा भरण्यात येणार आहेत. “कर सहाय्यक” या पदासाठी एकूण 18 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. “मल्टी टास्किंग स्टाफ” या पदासाठी एकूण 19 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. आता आपण पदानुसार उमेदवारांची पात्रता काय निश्चित करण्यात आली आहे? हे देखील जाणून घेऊ.
शैक्षणिक पात्रता
उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही पदानुसार निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये “आयकर निरीक्षक” या पदासाठी उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे. “कर सहाय्यक” या पदासाठी उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर त्याचबरोबर समकक्ष असणे आवश्यक आहे. “मल्टी टास्किंग स्टाफ” या पदासाठी उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त शिक्षण मंडळातून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
पदानुसार उमेदवारांची वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. एप्रिल 2023 रोजी उमेदवारांचे वय 18 ते 30 या दरम्यान असणे आवश्यक आहे. “इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर” या पदासाठी उमेदवारांचे वय 18 ते 30 ठेवण्यात आले आहे. “टॅक्स असिस्टंट” या पदासाठी 18 ते 27 वर्ष निश्चित करण्यात आले आहे. तर “मल्टी टास्किंग स्टाफ” या पदासाठी 18 ते 25 वर्ष ही वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. जर तुम्ही OBC कॅटेगिरीतून अर्ज केला असेल, तर तुम्हाला तीन वर्षाची अतिरिक्त सूट मिळणार आहे. जर तुम्ही एससी/एसटी या प्रवर्गातील उमेदवार असाल, तर तुम्हाला पाच वर्ष अतिरिक्त सूट मिळणार आहे.
पगार
“इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर” या पदासाठी एकूण 9 हजार 300 ते 34 हजार 800 रुपये दरमहा पगार मिळणार आहे. “टॅक्स असिस्टंट” या पदासाठी 5 हजार 200 ते 20 हजार 200 दरमहा वेतन असणार असणार आहे. “मल्टी टास्किंग स्टाफ” या पदासाठी 5 हजार 200 ते 20 हजार 200 रुपये दरमहा पगार असणार आहे.
असा करा अर्ज
इन्कम टॅक्स इन्कम टॅक्स विभागात अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 14 एप्रिल 2023 पर्यंत संधी असणार आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी आपल्या मोबाईल मधील क्रोमवर जाऊन www.incometaxindia.gov.in असं सर्च करायचं आहे. अधिकृत संकेतस्थळावर गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी नोंदणी करायची आहे. ठिकाणी भरती प्रक्रिया संदर्भातला फॉर्म डाऊनलोड करून तुम्ही व्यवस्थित भरून खालील पत्त्यावर पाठवायचा आहे. या पत्त्यावर पाठवा अर्ज; अतिरिक्त आयकर आयुक्त कार्यालय, दुसरा मजला, आयाकर भवन, 16/69, सिव्हिल लाइन्स, कानपूर -20800
हे देखील वाचा IND vs AUS: नाचता येईना अंगण वाकडे! संताप व्यक्त करत रोहित शर्माने या दोन खेळाडूंना पराभवासाठी धरले जबाबदार..
PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेच्या 14 व्या हप्त्याविषयी मोठी अपडेट; जाणून घ्या त्वरित..
Gudi Padwa 2023: गुढीपाडव्यापासून या सहा राशींच्या लोकांचे चमकणार भाग्य..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम