Serial Kisser Gang Video: ..म्हणून एकटी महिला दिसली की जबरदस्तीने किस करून जायचा पळून; पाहा तो व्हिडिओ..

0

Serial Kisser Gang Video: बिहारमध्ये सिरीयल कीसर टोळीची (Serial Kisser Gang) चांगलीच दहशत गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. हा सिरीयल किसर रस्त्यात एकट्या दिसणाऱ्या महिलांना जबरदस्तीने किस करून त्या ठिकाणाहून पळून जायचा. हा त्याचा एक प्रकारे गेल्या अनेक दिवसांपासूनचा उद्योग सुरू होता. तो का असं करत होता, याविषयी कोणालाही माहिती नव्हतं. महिला देखील एकट्या शहरातून बाहेर फिरताना दहा वेळा विचार करायच्या. अखेर या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. मात्र हा सिरीयल कीसर असं का करायचा? (Bihar Serial Kisser Viral Video)

सोशल मीडियावर (social media) कधी काय वायरल होईल, आणि कोणाची दहशत निर्माण होईल, हे काही सांगता येत नाही. चर्चेत राहण्यासाठी अनेक जण वेगवेगळे पर्याय शोधतात. मात्र काही माथेफिरू चर्चेत राहण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. याचे जिवंत उदाहरण बिहारमध्ये घडलं आहे. बिहारच्या जमुईमधील हा सिरियल किसर असून, याचे नाव मो. अकर आहे. (Mo akar) हा माथेफिरू महिसौढी मुहल्ला या ठिकाणचा रहिवाशी असल्याचे समोर आले आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाल्याने, सिरीयल किसरची चर्चा देशभर झाली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता, हॉस्पिटल समोर एक महिला फोनवर संभाषण करत होती. अचानक एक तरुण या ठिकाणी आला. तिला काही कळायच्या आत तरुण जबरदस्तीने कीस करून पळून गेला. सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान वायरल झाल्यानंतर या तरुणाचा शोध सुरू झाला.

या तरुणाचा शोध सुरू झाल्यानंतर, अनेक धक्कादायक घटना समोर आल्या. तो एकटा नसून सिरीयल कीसर करणारी टोळी असल्याचं पोलिसांच्या अहवालात समोर आलं. ही टोळी दिवसा हा घाणेरडा प्रकार करून, रात्री चोरी करत असल्याची देखील प्राथमिक माहिती आहे. शहरांमध्ये दहशत पसरवण्यासाठी हा घाणेरडा प्रकार सुरू असल्याचं समोर आले आहे. पोलीस अधिक चौकशी करत असून, या टोळीला आता अटक करण्यात आली आहे. टोळीच्या मोरक्या बरोबर त्याच्या चार साथीदारांना पोलिसांनी अटक केली आहे.

रस्त्यात एकटी महिला दिसली की किस करून पळून जायचं, हा या टोळीचा गेल्या अनेक दिवसांपासून घाणेरडा प्रकार सुरू होता. महिलांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण होण्यासाठी हे प्रकार सुरू होते. दिवसा महिलांना घाबरून रात्री ही टोळी शहरात चोरी करत फिरत होती. अशी माहिती समोर आली आहे. महिलांनी आपल्या अंगावरचे दागिने स्वतःहून भीतीने काढून द्यावे असा देखील यामागचा उद्देश होता. असं बोललं जात आहे. या संदर्भात पोलीस अधिक तपास करत असून, याविषयी अधिक स्पष्टता समोर येईल.

हे देखील वाचा Viral video: तृतीयपंथी सांगून पैसे मागणाऱ्या तरुणाला बाजारातच केलं नग्न; व्हायरल व्हिडिओमुळे एकच खळबळ..

IND vs AUS: नाचता येईना अंगण वाकडे! संताप व्यक्त करत रोहित शर्माने या दोन खेळाडूंना पराभवासाठी धरले जबाबदार..

Marriage Tips: लग्नापूर्वी मुलीला हे पाच प्रश्न विचारल्याशिवाय चुकूनही करू नका लग्न; नाहीतर आयुष्यभर..

Virat Kohli diet plan: विराट कोहलीच्या रोजच्या आहारात असतो या पदार्थांचा समावेश; किंमत जाणून धराल डोकं..

Gudi Padwa 2023: गुढीपाडव्यापासून या सहा राशींच्या लोकांचे चमकणार भाग्य..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.