Virat Kohli diet plan: विराट कोहलीच्या रोजच्या आहारात असतो ‘या’ पदार्थांचा समावेश; किंमत जाणून धराल डोकं..

0

Virat Kohli diet plan: भारताचा स्टार खेळाडू आणि माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) अनेकांचा रोल मॉडेल आहे. विराट कोहली भारतीय संघात आल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचा चेहरा मोहरा बदलला. विराट कोहलीने फिटनेस स्टॅंडर्ड सेट केला, आणि भारतीय संघातल्या अनेक खेळाडूंनी व्यायामाबरोबरच डायटचे तंतोतंत पालन करायला सुरुवात केली. फिटनेस बरोबर विराट कोहलीची स्टाईलची देखील नेहमी चर्चा होत असते. अनेकांना विराट कोहली काय खातो, कसा व्यायाम करतो याविषयी जाणून घ्यायची उत्सुकता असते. जाणून घेऊया विराट कोहलीच्या डायट प्लॅन विषयी सविस्तर.

एका ‘रिॲलिटी शो’मध्ये (reality show) विराट कोहलीचा डायट प्लॅन समोर आला आहे. विराट कोहलीचा डायट प्लॅन जाणून तुम्हाला देखील धक्का बसू शकतो. गेल्या काही वर्षापासून विराट कोहलीने मांसाहार पूर्णपणे बंद केला आहे. कदाचित याविषयी तुम्हाला माहिती देखील असेल, मात्र मांसाहाराबरोबर विराट कोहली दूध आणि दूधजन्य पदार्थ देखील खात नाही. एवढेच नाही, तर विराट कोहली गव्हाच्या पिठाची चपाती देखील खात नाही.

विराट कोहली आपल्या आहारात ग्लुटेन आणि कार्बोहायड्रेट्चा समावेश करत नाही. यामुळे विराट कोहलीला फॅट फ्री राहण्यास मदत होते. असं असलं तरी, विराट इतर पदार्थांच्या पिठाची भाकरी खातो. एका कार्यक्रमात या संदर्भात खुलासा करण्यात आला. आपल्या आहारामध्ये विराट कोहली भाताचा देखील समावेश करतो. मात्र तांदळाचा भात न खाता, विराट कोहली फ्लॉवरचा भात खातो. फूड प्रोसेसिंग युनिटच्या माध्यमातून हा तांदूळ तयार करण्यात येतो.

विराट कोहली खात असलेल्या भाताची किंमत तब्बल साडेचारशे ते पाचशे रुपये किलो आहे. सामान्य तांदळापेक्षा या भाताची चव देखील वेगळी असते. या भातामध्ये कार्बोहायड्रेट्चं प्रमाण खूप कमी प्रमाणात असते. साहजिकच यामुळे शरीर फॅट फ्री ठेवण्यास हा भात मदत करतो. आणि म्हणून विराट कोहली हा तांदूळ खाणे पसंत करतो. आठवड्यातून तीन वेळा विराट कोहली हा भात खात खातो.

विराट कोहली आपल्या आहारामध्ये ग्लुटेन टाळण्यासाठी गव्हाच्या पिठापासून बनवलेल्या चपात्या किंवा ब्रेड देखील खात नाही. याशिवाय दुधापासून बनवलेले पदार्थ देखील विराट कोहली दोन हात लांब राहतो. याशिवाय नियमित व्यायामाला देखील विराट कोहली प्राधान्य देतो. विकी कौशल आणि कॅटरिना कैफने विराट कोहली अनुष्का शर्माला डिनरसाठी इन्व्हाईट केलं होतं. मात्र सहानंतर विराट कोहली काहीही खात नसल्याने, या डिनरमध्ये कॅटरिनाला बदल करावा लागला होता.

हे देखील वाचा Gudi Padwa 2023: गुढीपाडव्यापासून या सहा राशींच्या लोकांचे चमकणार भाग्य..

Couple Viral Video: तरुण-तरुणीने भररस्त्यातच सुरू केला कार्यक्रम; व्हिडिओ व्हायरल झाल्याने उडाली खळबळ..

Marriage Tips: लग्नापूर्वी मुलीला हे पाच प्रश्न विचारल्याशिवाय चुकूनही करू नका लग्न; नाहीतर आयुष्यभर..

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेच्या 14 व्या हप्त्याविषयी मोठी अपडेट; जाणून घ्या त्वरित..

Central Bank of India Recruitment 2023: सेंट्रल बँकेत पाच हजार पदांची मेगा भरती; या उमेदवारांना करता येणार अर्ज..

IND vs AUS: या तीन कारणांमुळे आजही भारताचा दारून पराभव होण्याची शक्यता..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.