Business Idea: कमी भांडवलात महिन्याला लाखों रुपये नफा मिळवून देतील हे चार व्यवसाय..
Business Idea: सध्या बेरोजगारी (inflation) प्रचंड वाढली आहे. रोजच्या दोन वेळच्या जेवणासाठी देखील माणसाला संघर्ष करावा लागतोय. नोकरीची कमतरता त्यातच नोकरीतील तणाव या सर्वांचा विचार करता हल्ली अनेक सुशिक्षित उच्च शिक्षण घेतलेले तरुण तरुणी व्यवसायाकडे वळत आहेत. आतापर्यंत अशी अनेक उदाहरणं आपण पाहिली आहेत, ज्यांनी उच्च शिक्षण घेतले त्यांनी लाखोंचे पॅकेज झुगारून व्यवसाय टाकला. आणि ते त्या व्यवसायात यशस्वी देखील झालेत. व्यवसाय म्हटलं, की भांडवल आणि गुंतवणुक आली. मात्र असे असले तरी कमी गुंतवणुकीतही तुम्ही व्यवसाय सुरू करू शकता. आज आपण याच विषयी सविस्तर जाणून घेणार आहेत.
असे अनेक उद्योग आहेत, जे अल्पशा गुंतवणुकीत सुरू करून त्यातून हजारो लाखोंचा नफा कमवू शकतो. आज आम्ही अशाच काही व्यवसायांची माहिती येथे देत आहोत. हा व्यवसाय विशेषतः शेतक-यांसाठी फार उपयुक्त आहे. शेतीसोबत हा व्यवसाय करून शेतकरी महिन्याला लाखोंचा नफा मिळवू शकतात. शेतक-यांना अनेकदा दुष्काळामुळे शेतीत मोठे नुकसान सहन करावे लागते. त्यामुळे शेतकरी हवालदिल होऊन नैराश्येत जातो. मात्र शेतीला पुरक अशा व्यवसायाची जोड असेल, तर तेवढाच आधार शेतक-यांना मिळू शकतो. शेतीसोबत शेतकऱ्यांनी पशुपालन व्यवसाय करणे केव्हाही फायद्याचे ठरू शकतो.गाय, म्हैस, शेळी, उंट, कोंबडी, मासे, मधमाशी, दूध, चीज, तूप, मध यांचे संगोपन करून त्यांची विक्री करून देखील शेतकरी उत्तम कमाई करू शकतात.
शेळीपालन- शेळीपालन हा व्यवसाय पूर्वी गाव खेड्या पुरताच मर्यादित होता. मात्र आता शहरांमध्येही हा व्यवसाय तरुण करताना दिसतात. शेळीपालन व्यवसायातून मांस, लेंडी खत, आणि दूध विकून चांगले उत्तपन्न मिळते. याची मागणीही बाजारात नेहमी असते. तुमचा बजेट खूप कमी असेल तर तुम्ही पाच सहा शेळी पाळून देखील शेळीपालन उत्तम प्रकारे करू शकता. हळूहळू या पालनाचा व्यवसाय तुम्हीही मोठा देखील करू शकता या शेळीपालनाचे व्यवसायातून महिन्याला तुम्ही लाखो रुपये कमवू शकता.
मत्स्यपालन: मत्स्यपालन हा व्यवसाय देखील केवळ मच्छीमारांपुरता किंवा कोळी बांधवांपुरताच मर्यादित न राहता आता इतर लोक देखील हा व्यवसाय करू लागले आहेत. शेतीसोबतच शेतकरी मासेही पाळू शकतात. बाजारात माशांना मागणीही भरपूर असते. जर तुमच्याकडे शेती असेल, तर तुम्ही शेतात शेततळे बांधून हा व्यवसाय करू शकता. बांधलेल्या शेततळ्यांचा उपयोग तुम्ही शेतीसाठी पाणी देण्याकरिता देखील वापरू शकता. शिवाय याच शेततळ्यामध्ये तुम्ही मत्स्य पालन हा व्यवसाय करून महिन्याला लाखो रुपये कमवू शकता. सध्या बाजारामध्ये शंभर ते दीडशे रुपये किलो प्रमाणे मासे विकले जातात. माशाचे योग्य व्यवस्थापन, संगोपन करून तुम्हाला वर्षाकाठी दहा-बारा लाख रुपये उत्पन्न सहज मिळू शकते.
मधमाशी पालन: मधमाशी पालन व्यवसाय हा देखील अलीकडच्या काळात खूप मोठ्या प्रमाणात उदयास आलेला व्यवसाय आहे. नैसर्गिक शुद्ध मधला प्रचंड मागणी आहे. बाजारात अनेक भेसळयुक्त मधाचे ब्रँड आहेत. अशामध्ये जर तुम्ही शुद्धतेची हमी देणारा आणि नैसर्गिकरित्या तयार करण्यात आलेल्या मधाची विक्री केली, तर तुम्ही महिन्याला दोन अडीच लाख रुपयांपर्यंत उत्पन्न घेऊ शकता. महत्वाचे म्हणजे, हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुमच्याकडे फारसं भांडवल नसलं तरी देखील तुम्हाला हा व्यवसाय करता येणार आहे.
कुक्कुटपालन: शेतकऱ्यांसाठी कुकूटपालन हा व्यवसाय देखील मोठा वरदान ठरत असल्याचे पाहायला मिळतं. शेतीचं काम करत तुम्ही या व्यवसायाची उत्तम प्रकारे जोपासना करू शकता. चिकनला बाजारामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने हा व्यवसाय प्रचंड उत्पन्न मिळवून देणारा व्यवसाय म्हणून उदयास आला आहे. मोठ्या बागाराची नोकरी सोडून देखील अनेक जण या व्यवसायाकडे वळले आहेत. व्यवसायातून तुम्ही शेतीसाठी मेंदी खत देखील वापरू शकता यामुळे तुमच्या शेतीला देखील प्रचंड मोठ्या प्रमाणात फायदा होतो. प्रकारे शेती पूरक व्यवसाय करून तुम्ही महिला लाख रुपये कमावू शकतो.
हे देखील वाचा Relationship Tips: गोष्टी माहीत असायलाच हव्यात; अन्यथा नातं कधीच फार काळ टिकणार नाही..
Marriage Tips: लग्न न करण्याचे गंभीर परिणाम जाणून सरकेल पायाखालची जमीन; समाजाचा दृष्टिकोनही बदलतो..
IDBI Bank Recruitment 2023: IDBI बॅंकेत या उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्ण संधी; जाणून घ्या डिटेल्स..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम