IOCL Recruitmet 2023: इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये या उमेदवारांसाठी मोठी भरती; असा करा ऑनलाईन अर्ज..

0

IOCL Recruitmet 2023: सध्या देशात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आहे. मात्र अनेक विभागात आता काही जागांची भरती देखील होताना पाहायला मिळत आहे. जर तुम्ही देखील नोकरीच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या रिक्त जागांसाठी नुकतीच अधिसूचना जारी करण्यात आली आहे. लवकरच यातील विविध पदे भरली जाणार आहेत. त्यामुळे या पदासाठी पात्र असणाऱ्या तरुणांसाठी मोठी ही संधी आहे. जाणून घेऊया या भरती प्रक्रिया संदर्भात सविस्तर माहिती.

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत केल्या जाणाऱ्या या भरतीसाठी उमेदवारांना 1मार्च पासून अर्ज करता येणार आहेत. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2023 निश्चित करण्यात आली आहे. कोण-कोणत्या पदासाठी किती जागा निश्चित करण्यात आल्या आहेत? सोबतच पदासाठी उमेदवारांची पात्रता काय निश्चित करण्यात आली आहे? ऑनलाइन अर्ज कसा करायचा? उमेदवारांची वयोमर्यादा आणि परीक्षा फी? याविषयी जाणून घेऊया सविस्तर.

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत एकूण 513 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या सर्व जागा ‘अभियंता’ या पदासाठी भरण्यात येणार आहेत. यासाठी उमेदवारांची शैक्षणिक पात्रता जाणून घ्यायची झाल्यास, उमेदवार हा दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सोबतच B.E., B. Tech, B.Sc. इत्यादी शाखेतील पदवी संपादन केलेली असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर अभियांत्रिकीमध्ये डिप्लोमा, एमबीए, सीए, एलएलबी, एमसीए विभागात मान्यताप्राप्त बोर्डामधून पदवी संपादन केलेली असावी.

वयोमर्यादा आणि परीक्षा फी

या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांची वयोमर्यादा 18 ते 26 वर्ष यादरम्यान असणे आवश्यक आहे. सोबतच एससी /एसटी/ओबीसी आणि पीडब्ल्यूडी उमेदवारांना सरकारी नियमानुसार वयोमर्यादेमध्ये सूट दिली जाणार आहे. एसी/एसटी या उमेदवारांसाठी पाच वर्षाची अतिरिक्त सूट, तर ओबीसी उमेदवारांसाठी तीन वर्षाची अतिरिक्त सूट दिली जाणार आहे. ओपन त्याचबरोबर ओबीसी आणि EWS या कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी शंभर रुपये परीक्षा शुल्क आकारली जाईल. तर एससी/एसटी उमेदवारांसाठी मात्र कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही.

पगार आणि निवड प्रक्रिया

या भरतीसाठी निवड करण्यात येणाऱ्या उमेदवारांसाठी दरमहा 25 हजार ते दीड लाखांपर्यंत पगार दिला जाणार आहे. उमेदवारांच्या निवडीविषयी जाणून घ्यायचं झाल्यास, उमेदवारांची लेखी चाचणी, त्याचबरोबर कौशल्य आणि शारीरिक चाचणीच्या आधारे निवड करण्यात येणार आहे.

असा करा ऑनलाईन अर्ज

या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. एक मार्च 2013 पासून अर्ज करण्याला सुरुवात होणार असून, 20 मार्च 2023 पर्यंत अर्जाची मुदत ठेवण्यात आली आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी आपल्या मोबाईल मधील क्रोमवर जाऊन https://iocl.com/ असं सर्च करायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर अधिकृत वेबसाईट ओपन होईल. त्यानंतर खाली स्क्रोल केल्यानंतर, या वेबसाईटवर तुम्ही सविस्तर अर्ज करू शकता. उमेदवारांची लेखी परीक्षा 20 एप्रिल 2023 ला घेण्यात येईल. तर या परीक्षेचा निकाल 15 मे 2023 ला जाहीर करण्यात येईल.

हे देखील वाचा Physical relationship tips: नियमित सेक्स केल्याने आरोग्यावर होतात हे परिणाम; जाणून बसेल धक्का..

IDBI Bank Recruitment 2023: IDBI बॅंकेत या उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्ण संधी; जाणून घ्या डिटेल्स..

IPPB Recruitment 2023: इंडिया पोस्ट पेमेंट बँकमध्ये मोठी भरती; या उमेदवारांना नोकरीची सुवर्ण संधी..

​BOI Recruitment 2023: बँक ऑफ इंडियामध्ये मोठी भरती, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया..

IND vs AUS: याला म्हणतात कॅप्टन; आपला त्याग करत रोहितने पुजाराची विकेट वाचवली, पाहा हृदयस्पर्शी व्हिडिओ..

Sexual Tips: सेक्सपूर्वी या गोष्टी केल्या तरच महिला होतात संतुष्ट; असा मिळावा तिचा प्रतिसाद..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.