Rohit Sharma Crying: पराभवानंतर रोहित शर्मा ‘या’ कारणामुळे रडला ढसाढसा; राहुल द्रविड गेला समजवायला पण..;पाहा व्हिडिओ..
Rohit Sharma Crying: भारत आणि इंग्लंड (INDIA vs England) यांच्यामध्ये खेळण्यात आलेल्या दुसऱ्या सेमी फायनल (T20 World Cup Semifinal) सामन्यात भारताचा इंग्लंड संघाने 10 विकेट राखून दणदणीत पराभव केला. या विजया बरोबरच इंग्लंडने फायनलमध्ये प्रवेश केला. (England enter the final) या पराभवा बरोबरच भारताचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. फलंदाजीसाठी अनुकूल असणाऱ्या खेळपट्टीवर (batting pitch) भारतीय संघाचे सलामीवीर (Indian openers) पुन्हा एकदा अपयशी ठरले. अखेरच्या पाच षटकांत हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) केलेल्या तुफान फटकेबाजीच्या जोरावर भारताने षटकात 169 धावांचे आव्हान इंग्लंड संघासमोर ठेवले. हे आव्हान इंग्लंड संघाने एकही विकेट न गमावता केवळ 16 षटकात पूर्ण केले.
फलंदाजीसाठी पुरेपूर अनुकूल असणाऱ्या खेळपट्टीवर भारताच्या सलामीवीरांना साजेशी खेळी करता आली नाही. या संपूर्ण विश्वचषकात के एल राहुल (KL Rahul) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) या दोन्हीं सलामीवीराचा सुमार खेळ महत्त्वाच्या सामन्यांत देखील कायम राहिला. नेहमी प्रमाणे महत्वाच्या सामन्यांत के एल राहुल केवळ पाच चेंडूत पाच धावा काढून बाद झाला. रोहित शर्मा देखील खेळपट्टीवर चाचपडत असल्याचं पाहायला मिळाले. अखेर रोहित शर्माने 28 चेंडू 27 धावांची खेळी करत त्याने देखील आपल्या संघाला अडचणीत टाकले. या विश्वचषकात कमालीचा आत्मविश्वास आणि पॉझिटिव्ह अप्रोच घेऊन मैदानात उतरणाऱ्या सूर्यकुमार यादवला आज मात्र मोठी खेळी करता आली नाही.
सूर्यकुमार यादव (suryakumar Yadav) बाद झाल्यानंतर, मैदानात आलेल्या हार्दिक पांडेने विराट कोहली (Virat Kohli) सोबत डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 61 धावांची भागीदारी केली. विराट कोहलीने या विश्वचषकातला आपला फॉर्म कायम ठेवत, या सामन्यांत देखील 40 चेंडूत 50 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. एकेकाळी 15 षटकांत फलकावर 100 धावा लगल्या होत्या. मात्र नंतरच्या पाच षटकात हार्दिक पांद्याने तुफानी फलंदाजी करत भारताला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. मात्र फलंदाजीसाठी अनुकूल असणाऱ्या या खेळपट्टीवर या धावा पुरेशा नव्हत्या.
विराट कोहलीच्या नेतृत्वात भारताने एकही आयसीसी ट्रॉफी जिंकली नसल्याने, विराट कोहलीची टी-20 आणि एकदिवसीय क्रिकेट संघाच्या कर्णधार पदावरून हाकलपट्टी करण्यात आली. आयपीएलच्या पाच ट्रॉफी जिंकणाऱ्या रोहित शर्माकडे टी-ट्वेंटी आणि एकदिवसीय क्रिकेटचे कर्णधार पद देण्यात आले. मात्र पुन्हा एकदा खराब टीम सिलेक्शन आणि पॉझिटिव्ह अप्रोचने खेळ न केल्यामुळे भारताची या t20 विश्वचषकात (T20 World Cup) सुमार कामगिरी राहिली. संपूर्ण विश्वचषकामध्ये सलामीवीरांनी एकाही सामन्यांत पॉझिटिव्ह अप्रोच दाखवला नसल्याने, भारताला चांगली सुरुवात मिळू शकली नाही. सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, आणि विराट कोहली या तीन फलंदाजाच्या जोरावर भारताने सेमी फायनलमध्ये प्रवेश केला.
169 धावांचे आव्हान मैदानात घेऊन उतरणाऱ्या इंग्लंड संघाच्या सलामीवीरांनी पहिल्या चेंडूपासून भारतीय गोलंदाजाची हवा काढली. गोलंदाजासाठी अनुकूल नसणाऱ्या या खेळपट्टीवर या दोन्हीं सलामीवीरांनी आक्रमक खेळ करत अवघ्या सोळा षटकांत 169 धावांचं टार्गेट एकही विकेट न जमवता सहज पूर्ण केले. दारुण पराभव झाल्यानंतर, भारताचा कर्णधार रोहित शर्मा (Indian captain rohit sharma) पवेलियनमध्ये जाऊन रडल्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर आता तुफान वायरल झाला आहे. एकीकडे आपल्या नावाला साजेसा खेळ झाला नाही, तर दुसरीकडे एक-दोन फलंदाज वगळता इतर फलंदाजाने म्हणावी तशी फलंदाजी केली नाही. संपूर्ण विश्वचषकात आपण उत्कृष्ट खेळ केला नसल्याची जाणीव रोहित शर्माला देखील झाल्याचे या व्हिडिओतून पाहिला मिळत आहे.
रोहित शर्माला इंग्लंड कडून झालेला दारून पराभव सहन न झाल्याने, पवेलियनमध्ये जाऊन बसला. पवेलियनमध्ये आत जाणाऱ्या पायऱ्यांवर बसल्यानंतर, रोहित शर्मा रडल्याचं (Rohit Sharma Crying) सोशल मीडियावर (social media) व्हायरल झालेल्या व्हिडिओत (Viral video) पाहायला मिळत आहे. रोहित शर्मा सोबत ऋषभ पंत (Rishabh pant) देखील बसल्याचे दिसत आहे. रोहित शर्मा रडतो आहे, हे पाहून भारतीय संघाचा कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी देखील रोहित शर्मा जवळ जाऊन त्याला समजावण्याचा प्रयत्न केला.
Kamiya dhundhte haii mujhme log, jese inme khuda basta ho ☺️
Chin up champ @ImRo45 the good time will come ❤️#Rohit#worldcup2023 #RohitSharma #India pic.twitter.com/UKxW3ioctg— K U N A L ⚓ (@kuna1___) November 10, 2022
रोहित शर्माचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या विश्वचषकामध्ये आपल्या नावाला साजेशी फलंदाजी करता आली नसल्याने, रोहित शर्मा स्वतःवरच नाराज असल्याचं बोललं जात आहे. या विश्वचषकात फलंदाज म्हणून, आपलं काहीही योगदान नसल्यामुळे आपण या स्पर्धेबाहेर फेकले गेलो. याची जाणीव झाल्यामुळे रोहित शर्मा रडला, असं देखील बोललं जात आहे.
Common KL Everyone Know Your Ability Just Unleash It And Show Them To Who Forgets It Everytime You Fail 👍🏻 Wishing You All The Very Best #BelieveInBlue #BelieveKLR #believeinKLR #KLRahul𓃵 #klr #RahulDravid #ViratKohli𓃵 #india #T20WC2022 #Cricket #WorldCup2022 #rahul pic.twitter.com/XtkOFmDksF
— Swejan Reddy🇮🇳 (@Swejanreddyk) November 1, 2022
हे देखील वाचा Sania Mirza Shoaib Malik divorce: ..म्हणून शोएब मलिकने सानियाला दिला डच्चू; घटस्फोटानंतर मुलगा कोणाकडे राहणार? वाचा सविस्तर..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम