Maharashtra Police Bharti: पोलिस भरती नियमात पुन्हा मोठा बदल; उद्या पासून पोलिस भरती अर्ज प्रक्रिया होणार सुरू पण..

0

Maharashtra Police Bharti: गेल्या काही वर्षापासून रखडलेल्या पोलीस भरतीला (police bharti) अखेर मुहूर्त सापडला असून, उद्यापासून पोलीस भरतीची तयारी करत असणाऱ्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहेत. महाराष्ट्र पोलीस (Maharashtra police) आपल्या अधिकृत वेबसाईटवरून उद्या या भरती प्रक्रिया संदर्भात अधिसूचना जारी करणार असल्याची माहिती समोर आली आहे. या पोलीस भरती अंतर्गत एकूण सोळा हजार रिक्त पदांची भरती केल्या जाणाऱ्या असल्याची माहिती देखील सूत्रांकडून मिळाली आहे. मात्र अधिकृत माहिती उद्याच्या अधिसूचनेत उमेदवारांनी जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेली पोलीस भरती अखेर मार्गी लागली असून, कोण-कोणकोणत्या विभागात किती जागा भरण्यात येणार आहेत, याची देखील माहिती आता समोर आली आहे. महाराष्ट्र पोलीसच्या अधिकृत वेबसाईटवरून उद्या ९ नोव्हेंबर 2022 रोजी कॉन्स्टेबल त्याचबरोबर कॉन्स्टेबल ड्रायव्हरच्या भरती संदर्भात अधिसूचना जारी करण्यात येणार असून, उमेदवारांना उद्यापासून e.policerecruitment2022.mahit.org या वेसाइटवरून अर्ज करता येणार आहे.

दोन महिन्यापूर्वी उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांनी महाराष्ट्र पोलीस भरती संदर्भात मोठं विधान केलं होतं. राज्यात लवकरच दोन टप्प्यात 16 हजार रिक्त पदे भरली जाणार असल्याची माहिती दिली होती. पहिल्या टप्प्यात किती जागा भरण्यात येणार आहेत, याविषयी आता अधिकृतरित्या उद्या जारी करण्यात येणाऱ्या अधिसूचनेत समजणार आहे. पहिल्या टप्प्यात आठ हजार रिक्त पदांची भरती केली जाणार असल्याची माहिती आहे. मात्र या जागेची खात्री करण्यासाठी उद्यापर्यंत उमेदवारांना वाट पाहावी लागणार आहे. नऊ नोव्हेंबर पासून ३० नोव्हेंबर पर्यंत उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करता येणार असल्याची देखील माहिती आहे.

खुल्या प्रवर्गासाठी इतक्या जागा

दुसरीकडे राज्यात एकूण 14 हजार 956 रिक्त पदांची पोलीस भरती केली जाणार असल्याची माहिती आहे. मात्र खात्री करण्यासाठी उमेदवारांना उद्यापर्यंत वाट पाहावी लागणार आहे. विशेष म्हणजे, खुल्या प्रवर्गासाठी एकूण पाच हजार 468 जागांची तरतूद करण्यात आली आहे. नऊ नोव्हेंबरला पोरांना अधिकृतरित्या जिल्हा निहाय जागांची अधिकृत पाहणी करता येणार आहे. जिल्हा निहाय जागांची जाहिरात प्रसारित करण्यात आली असली तरी देखील, यात बदल केल्याची माहिती मिळते आहे. साहजिकच यामुळे अधिकृत माहिती मिळवण्यासाठी उमेदवारांना उद्याच्या दिवसापर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

उमेदवाराने एकच ठिकाणी अर्ज करणे आवश्यक

महाराष्ट्र पोलीस भरती प्रक्रियेत सहभाग घेण्यासाठी एका उमेदवारांना एकाच प्रवर्गातून एकच ठिकाणी भरतीसाठी अर्ज करता येणार असल्याची माहिती आहे. एका उमेदवाराने इतर प्रवर्गातून आणि अनेक ठिकाणी अर्ज केला तर उमेदवाराचा अर्ज बाद करण्यात येणार असल्याची देखील माहिती आहे. मात्र अधिकृत माहिती पाहण्यासाठी उमेदवारांना उद्या प्रसारित होणाऱ्या भरती प्रक्रिया संदर्भातली अधिसूचनत वाचूनच अधिकृत स्पष्ट होणार आहे.

कुठे कुठे किती जागांची भरती?

मुंबईमध्ये एकूण 6740 रिक्त जागा भरण्यात येणार असल्याची माहिती आहे. ठाणे शहरसाठी 521जागा आहेत. पुणे शहरसाठी एकूण 720 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये एकूण 216 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. मिरा भाईंदरमध्ये 986 रिक्त जागांची भरती केली जाणार आहे. नागपूर शहरसाठी 308 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. नवी मुंबईसाठी एकूण 204 जागा जाहिराती नुसार देण्यात आल्या आहेत. अमरावती शहरसाठी 20 जागा देण्यात आल्या आहेत. सोलापूर शहरसाठी 98 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. लोहमार्ग मुंबईसाठी 620 तसेच ठाणे ग्रामीणसाठी 68 रिक्त जागा भरण्यात येणार आहे.

रायगडसाठी -272 जागा, पालघरसाठी 211 रिक्त जागा, सिंधूदुर्गसाठी 99 रिक्त जागा, रत्नागिरीसाठी 131 रिक्त जागा. नाशिक ग्रामीणसाठी 454 रिक्त जागा, अहमदनगरसाठी 129 रिक्त जागा, धुळ्यासाठी 42 रिक्त जागा, कोल्हापूरसाठी 24 रिक्त जागा, पुणे ग्रामीणसाठी 579 रिक्त जागा, साताऱ्यासाठी 145 रिक्त जागा, सोलापूर ग्रामीणसाठी 26 रिक्त जागा, औरंगाबाद ग्रामीणसाठी 39 रिक्त जागा, नांदेडसाठी 155 रिक्त जागा, परभणीसाठी 75 रिक्त जागा.

हिंगोलीसाठी 21रिक्त जागा, नागपूर ग्रामीणसाठी 132 रिक्त जागा, भंडारासाठी 61 रिक्त जागा, चंद्रपूरसाठी 194 रिक्त जागा, वर्धासाठी 90 रिक्त जागा, गडचिरोली 348 रिक्त जागा, गोंदियासाठी 172 रिक्त जागा, अमरावती ग्रामीणसाठी 156 रिक्त जागा, अकोल्यासाठी 327 रिक्त जागा, बुलढाण्यासाठी 51 रिक्त जागा, यवतमाळसाठी 244 रिक्त जागा, लोहमार्ग पुणेसाठी 124 रिक्त जागा, लोहमार्ग औरंगाबादसाठी 154 रिक्त जागा. अशा एकूण 14956 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. मात्र जागांसाठीची अधिकृत जाहिरात तुम्हाला उद्या संकेतस्थळावर पाहायला मिळेल.

परीक्षेत मोठा बदल

महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी यापूर्वी 100 मार्कांची शारीरिक चाचणी घेण्यात येत होती, मात्र आता या परीक्षेमध्ये बदल करण्यात आला आहे. उमेदवारांची सर्वप्रथम ५० मार्काची शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे. त्यानंतर शंभर मार्काची लेखी परीक्षा उमेदवारांना द्यावी लागणार आहे. यापूर्वी उमेदवारांची सर्वप्रथम लेखी चाचणी घेण्यात येत होती, साहजिकच त्यामुळे ग्रामीण भागातील उमेदवारांना पुरेशी संधी मिळत नसल्याचा आरोप देखील करण्यात आला होता. यामुळे आता हा बदल करण्यात आला आहे.

महाराष्ट्र पोलीस भरती प्रक्रियेत मोठा बदल करण्यात आला असून, शारीरिक चाचणीच्या मार्कचा लेखी परीक्षेत समावेश केला जाणार नसल्याची देखील माहिती समोर आली आहे. मात्र अधिकृत नोटिफिकेशन पाहण्यासाठी उमेदवारांना उद्यापर्यंत वाट पहावी लागणार आहे. शारीरिक चाचणीमध्ये ज्या उमेदवारांना 40 टक्के गुण आहेत, अशा उमेदवारांना एका जागेसाठी दहा जणांची निवड, अशा पद्धतीने ही प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. आणि लेखी परीक्षेमध्ये सर्वाधिक गुण असणाऱ्या उमेदवारांनाच पोलीस भरतीसाठी निवड करण्यात येणार आहे.

परीक्षेचे स्वरूप

शारीरिक चाचणीसाठी 50 गुण ठेवण्यात आलेले आहेत त्यामध्ये 50 गुणांचे वर्गीकरण करायचे झाल्यास, पुरुषांसाठी सोळाशे मीटर धावणे वीस गुण तर महिलांसाठी 800 मीटर धावणे वीस गुण असणार आहेत. त्याचबरोबर शंभर मीटर धावणे आणि गोळा फेक साठी 15, 15 गुण ठेवण्यात आले आहेत. एकी चाचणीसाठी शंभर गुण ठेवण्यात आले आहेत. यामध्ये 100 गुणांचे वर्गीकरण एकूण चार विषयांमध्ये केले आहे. यामध्ये अंकगणित, चालू घडामोडी, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण या चार विषयांवर परीक्षा घेतली जाणार आहे. या अधिकृत वेबसाईट वरून अर्ज आणि अधिसूचना पाहता येणार आहे. e.policerecruitment2022.mahit.org

हे देखील वाचा Talathi Bharti 2022: चार हजार तलाठी पद भरती प्रक्रियेला सुरुवात; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

Rohit Sharma Injured : सेमीफायनल पूर्वी भारताला मोठा धक्का; सराव करताना चेंडू लागून रोहित जखमी, पहा व्हिडिओ..

India post office recruitment 2022: या उमेदवारांसाठी इंडिया पोस्ट विभागात 98 हजार 83 रिक्त जागांसाठी मेगा भरती; असा करा ऑनलाईन अर्ज..

Physical relationship tips: वैवाहिक संबंधाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी हे चार पोझिशन आहेत सर्वात बेस्ट..

Benefits Of Foreplay: फोरप्लेमुळे दीर्घ काळ सेक्स आणि महिलांना मिळतो भरपूर आनंद; जाणून घ्या लैंगिक संबंधात याचे महत्व..

Second Hand Bike: 20 हजारात hero spender Plus, 16 हजारात Bajaj Pulsar! कुठे सुरू आहे हा भन्नाट सेल? जाणून घ्या सर्व डिटेल्स..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.