Rohit Sharma Injured : सेमीफायनल पूर्वी भारताला मोठा धक्का; सराव करताना चेंडू लागून रोहित जखमी, पहा व्हिडिओ..

0

Rohit Sharma Injured: नेटमध्ये सराव करत असताना भारताचा कर्णधार रोहित शर्माला (indian captain rohit sharma) चेंडू लागून दुखापत झाल्याने, भारतीय क्रिकेट टीममध्ये (Indian cricket team) एकच खळबळ उडाली आहे. दहा नोव्हेंबरला भारत इंग्लंड यांच्यामध्ये टी-ट्वेंटी वर्ल्ड (T20 World Cup) कपचा दुसरा सेमी फायनल (2nd semifinal) सामना खेळण्यात येणार आहे. (India vs England semifinal) मात्र त्यापूर्वी भारतीय संघाला रोहित शर्माच्या (Rohit Sharma) रूपात खूप मोठा धक्का बसला आहे. या विश्वचषकात रोहित शर्माची फलंदाज म्हणून कामगिरी सुमार राहिली असली तरी, रोहित हा बड्या मॅचचा प्लेयर असल्याने महत्त्वाच्या सामन्यात रोहित शर्माची दुखापत (Rohit Sharma Injured) आता भारतीय क्रिकेट टीमच्या गोटात चिंतेचं वातावरण निर्माण करणारी आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा थ्रो मॅन रघु नेटमध्ये रोहित शर्माला थ्रो करत होते. रोहित शर्मा नेटमध्ये आपल्या फलंदाजीचा सराव करत होता. (Sharma practice session in net) रोहित शर्मा नेटमध्ये जेमतेम पाच ते सहा चेंडू खेळल्यानंतर, अचानक त्याच्या उजव्या हाताला चेंडू जोरदार आदळल्याने रोहित शर्मा जखमी झाला. थ्रो मॅन रघुने टाकलेला चेंडू रोहित शर्माच्या हाताला लागल्यानंतर, रोहित शर्मा वेदनेने विव्हळत साईटला जाऊन हात पकडून बसल्याचं सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत पाहायला मिळत आहे.

थ्रो मॅन रघुचा चेंडू जोरदार रोहितच्या हाताला लागल्यानंतर, रघू देखील त्याच्या दिशेने धावत गेला. भारतीय क्रिकेटच्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी रोहित शर्माला झालेल्या दुखपतीची विचारपूस करून उपचार देखील केले असल्याची माहिती आहे. रघुचा चेंडू रोहित शर्माच्या हाताला लागल्यानंतर, रोहित शर्मा तब्बल एक तास आपला हात पकडून बसल्याचे पाहायला मिळाले. एका तासानंतर रोहितने पुन्हा सराव करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला दुखापतीमुळे सराव करणे शक्य झालं नसल्याची देखील माहिती आहे. दोन दिवसानंतर भारताचा इंग्लंड बरोबर दुसरा सेमी फायनल सामना अॅडलेडच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहे.

सराव करत असताना रोहित शर्माला झालेल्या दुखापतीमुळे भारतीय क्रिकेटचे चाहते देखील प्रचंड अस्वस्थ असून, रोहित शर्माच्या दुखापत किती गंभीर आहे, याची वाट पाहत असल्याचं पाहायला मिळत आहे. रोहित शर्माला सराव करताना झालेल्या दुखापतीमुळे सोशल मीडियावर रोहित शर्मा आता सेमी फायनल सामना खेळू शकणार नसल्यासच्या चर्चा देखील रंगल्या आहेत. जर असं झालं, तर त्यासाठी ही खूप वाईट बातमी असेल. महत्त्वाच्या सामन्यात रोहित शर्माला झालेल्या दुखापतीमुळे भारतीय संघाचे कॉम्बिनेशन बिघडणार असल्याने हा मोठा धक्का आहे.

हे देखील वाचा Sania Mirza Shoaib Malik divorce: ..म्हणून शोएब मलिकने सानियाला दिला डच्चू; घटस्फोटानंतर मुलगा कोणाकडे राहणार? वाचा सविस्तर..

India post office recruitment 2022: या उमेदवारांसाठी इंडिया पोस्ट विभागात 98 हजार 83 रिक्त जागांसाठी मेगा भरती; असा करा ऑनलाईन अर्ज..

Physical relationship tips: वैवाहिक संबंधाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी हे चार पोझिशन आहेत सर्वात बेस्ट..

Benefits Of Foreplay: फोरप्लेमुळे दीर्घ काळ सेक्स आणि महिलांना मिळतो भरपूर आनंद; जाणून घ्या लैंगिक संबंधात याचे महत्व..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.