Maharashtra Government Job: पोलिस, तलाठ्यासह विविध विभागात एकूण 75 हजार रिक्त पदांची होणार भरती; जाणून घ्या विभागनिहाय जागा आणि तारीख..

0

Maharashtra Government Job: महाराष्ट्र राज्यात (Maharashtra government) एकूण २९ शासकीय विभाग त्याचबरोबर जिल्हा परिषद विभागामध्ये एकूण 75 हजार रिक्त पदे असल्याचं समोर आले आहे. गेल्या काही वर्षापासून शासकीय विभागाची (Govt Department) नोकर भरती (Nokar Bharti) रखडली आहे. अनेक शासकीय विभागांमध्ये नोकर भरती केली जाणार होती, मात्र मध्येच कोरोनामुळे ही भरती पुढे ढकलण्यात आली. मात्र आता एकूण दोन लाख 75 हजार रिक्त पदांपैकी 75 हजार पदांची रिक्त भरती करण्यासाठी शासनाने हिरवा कंदील दिला असून, विविध शासकीय विभागांमध्ये आता नोव्हेंबर 2022 पासून जानेवारी 2023 पर्यंत ही नोकर भरती करण्यात येणार आहे. (Maharashtra government Nokar Bharti)

महागाई (inflation) बरोबरच बेरोजगारीचा (unemployment) दर देखील दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक विभागांमध्ये छोट्या छोट्या नोकरी भरती होत असल्या तरी देखील उमेदवारांची संख्या खूप मोठी असल्याने अनेकांना बेरोजगार म्हणूनच राहावं लागत असल्याचे चित्र आहे. मात्र आता राज्यामधील एकूण 29 शासकीय विभाग त्याचबरोबर जिल्हा परिषद विभागांमध्ये तब्बल दोन लाख 75 हजार रिक्त पदे असून त्यापैकी आता 75 हजार रिक्त पदे जानेवारी २०२३ पर्यंत भरण्यात येणार आहेत. यामुळे राज्यातील पात्र असणाऱ्या उमेदवारांसाठी खूप मोठी संधी असणार आहे. कोणकोणत्या विभागात किती जागा आहेत, याविषयी जाणून घेऊया सविस्तर.

महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 29 शासकीय विभाग आहेत. 29 शासकीय विभाग आणि जिल्हा परिषद विभाग यामध्ये एकूण मंजूर पदांची संख्या ही तब्बल दहा लाख 70 हजार 840 इतकी आहे. यामध्ये शासकीय नोकरदारांची संख्या तब्बल दोन लाख 25 हजार तर जिल्हा परिषद मधील एकूण 65 हजार रिक्त पदे आहेत. त्यामुळे शासनाच्या अनेक योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त भार पडतो. आणि यामुळे योजना जनतेपर्यंत पोहोचत नसल्याने आता शासनाने रिक्त पदांची भरती करण्याचा कार्यक्रम मंजूर केला आहे.

पावणेतीन लाख रिक्त असणाऱ्या पदांपैकी आता 75 हजार रिक्त पदांची भरती जानेवारी 2023 पर्यंत करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. 75 हजार रिक्त पदांमध्ये पोलीस भरती त्याचबरोबर तलाठी भरती, आरोग्य विभाग, जलसंपदा विभाग, कृषी विभाग त्याचबरोबर जिल्हा परिषदांमधील रिक्त पदांची भरती या सगळ्यांचा समावेश आहे. गेल्या साडेसहा वर्षापासून कोणतीही शासकीय पदभरती झालेली नाही.

महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर, शासकीय पद भरती करण्याचा विचार सुरू होता, मात्र कोरोनामुळे राज्याच्या वित्त विभागाने या भरतीवर निर्बंध घातले. आणि ही शासकीय भरती रखडली. आता राज्याच्या वित्त विभागाने या संदर्भातले निर्बंध उठवले असून, जानेवारी 2023 पर्यंत ही भरती प्रक्रिया पूर्ण देखील केली जाणार असल्याची माहिती आहे. जाणून घेऊया कोणकोणत्या विभागात किती रिक्त पदांची भरती केली जाणार आहे.

आरक्षणामुळे लांबीवर पडलेल्या महानगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समितीच्या निवडणूक आचारसंहिता लागण्यापूर्वी ही भरती प्रक्रिया केली जाणार आहे. यासाठी युद्धपातळीवर जोरदार काम देखील सुरू असल्याची माहिती आहे. विविध विभागामध्ये एकूण २,९२,८२० रिक्त पदांपैकी 75 रिक्त पदे भरली जाणार आहेत. यामध्ये आरोग्य विभागामध्ये एकूण 62 हजार 358 रिक्त पदामधून 26 हजार 712 रिक्त पदे भरली जाणार आहेत.

त्याचबरोबर जलसंपदा विभागामध्ये 45 हजार 217 रिक्त पदे भरली जाणार आहेत. वैद्यकीय शिक्षण विभागामध्ये 45 हजार 217 रिक्त पदांपैकी 23 हजार 489 रिक्त पदे भरली जाणार आहेत. तसेच वैद्यकीय शिक्षण विभागामध्ये एकूण 36 हजार 956 रिक्त पदांपैकी 14,423 रिक्त पदे भरली जाणार आहेत. तर महसूल आणि वन विभागामध्ये एकूण 69 हजार 584 रिक्त पदांपैकी 1357 रिक्त पदे भरली जाणार आहेत.

तसेच उच्च व तंत्र विभागामध्ये एकूण 12, 407 रीक्त पदांपैकी 4 हजार 395 वैद्यकीय शिक्षण विभागांमध्ये एकूण 36 हजार 956 रिक्त पदांपैकी 13423 रिक्त पदे भरली जाणार आहेत त्याचबरोबर आदिवासी विकास विभागांमध्ये 21 हजार 154 रिक्त पदांपैकी 6813 रिक्त पदे भरली जाणार आहेत. आणि सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये 21 हजार 689 रिक्त पदांपैकी नऊ हजार 751 रिक्त पदे भरली जाणार आहेत.

हे देखील वाचा कांदा बाजारभाव: कांदा चार हजार पार! या तारखेपर्यंत कांदा करणार शंभरी पार..

Relationship Tips: शारिरीक संबंध ठेवण्याची इच्छा झाल्यास महिला पुरुषांना देतात हे सहा संकेत; जाणून तुम्हालाही बसेल धक्का..

PM Kisan Yojana: अजूनही PM Kisan योजनेचा बारावा हप्ता जमा झाला नसेल तर फक्त करा हे काम, झटक्यात होईल जमा..

Dry skin Solution: या कारणामुळे हिवाळ्यात त्वचा कोरडी, हात पाय पांढरे पडतात; जाणून घ्या यावरचा उपाय..

Gujrat Bridge Collapse: गुजरातमध्ये अचानक असा कोसळला पुल; शेकडो जणांचे बळी, व्हिडिओ पाहून चुकतोय काळजाचा ठोका..

Virat Kohli Hotel Room: चाहत्याने विराटच्या हॉटेल रूमचा व्हिडिओ केला लीक, बाथरूमध्ये सापडल्या या धक्कादायक गोष्टी..

Second Hand Bike: 20 हजारात hero spender Plus, 16 हजारात Bajaj Pulsar! कुठे सुरू आहे हा भन्नाट सेल? जाणून घ्या सर्व डिटेल्स..

Hero Lectro: टू व्हीलरच्या वेगाने धावणाऱ्या Hero च्या या दोन इलेक्ट्रिक सायकल्सनी घातलाय धुमाकूळ; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्य..

Electric Scooter: फक्त 32 हजारामध्ये मिळतेय ही दमदार इलेक्ट्रिक स्कूटर; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.