Gujrat Bridge Collapse: गुजरातमध्ये अचानक असा कोसळला पुल; शेकडो जणांचे बळी, व्हिडिओ पाहून चुकतोय काळजाचा ठोका..

0

Gujrat Bridge Collapse: माणसाचे आयुष्य किती क्षणभंगुर आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. माणसाच्या आयुष्यात कधी काय होईल, हे कोणीही सांगू शकत नाही. हस्तखेळतं आयुष अचानक उध्वस्त होऊ शकतं. याचा प्रत्यय गुजरातमध्ये मोरबी जवळील मच्छू नदीवर आला आहे. शंभर वर्ष जुना असलेला हा पूल क्षणात कोसळून आत्तापर्यंत १९० हून अधिक जणांचे बळी गेल्याचे प्राथमिक माहिती आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर, सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे. ही दुर्दैवी घटना रविवारी संध्याकाळी पाच वाजता घडली असल्याची माहिती आहे.

गुजरात विधानसभा निवडणूक (gujrat assembly election) तोंडावर आली असताना घडलेल्या या दुर्दैवी घटनेचं राजकारण देखील होत असताना पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे, अशा दुर्दैवी घटनेचे राजकारण विरोधक नाही, तर स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनीच यापूर्वी केल्यामुळे या घटनेची जोरदार चर्चा रंगली असून, आता नरेंद्र मोदी जोरदार ट्रोल देखील होत आहेत. यापूर्वी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक (West Bengal assembly election) जाहीर झाल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये देखील पूल दुर्घटना (Bridge Collapse) झाली होती. या दुर्घटनेवर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धक्कादायक विधान केले होते.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर प्रचार सभेत नरेंद्र मोदी यांनी हा पूल निवडणुकीत पडला हा देवाने दिलेला संकेत आहे. ममता बॅनर्जी यांचं पुन्हा सरकार आलं, तर या पूलाप्रमानेच पश्चिम बंगालचे देखील तुकडे होतील, असे विधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. पिडीतांच्या दुःखात सहभागी होण्याऐवजी नरेंद्र मोदी यांनी या दुर्दैवी घटनेचा राजकारण केलं असल्याचा आरोप त्यावेळी देखील झाला होता. प्रचार सभेत नरेंद्र मोदी यांनी केलेले हे विधान आता सोशल मीडियावर ट्रेडिंगला देखील आहे.

मुलांच्या मस्तीमुळे पडला पूल?

गुजरातमध्ये (gujrat) घडलेल्या दुर्दैवी घटनेचा व्हिडिओ (video) सध्या सोशल मीडियावर (social media) चांगलाच व्हायरल (Viral) झाला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत फुलावर उभा राहून काही तरुण आपल्या मोबाईलच्या माध्यमातून फोटो काढत आहेत. तर काही तरुण या पुलावर उड्या देखील मारताना दिसत आहे. शंभर वर्ष जुना हा पूल असल्यामुळे तो कमकुवत झाला होता. मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. ही गोष्ट दुर्लक्षित करता येणार नाही. साहजिकच 100 वर्ष जुना असणाऱ्या पुलाची तपासणी होणे आवश्यक होते. मात्र प्रशासनाने याची तपासणी केली नाही. हे देखील पूल कोसळण्याचे महत्वाचे असल्याचे बोलले जात आहे.

गुजरात मधील पूल दुर्घटनेचा सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ हा 30 सेकंदाचा असून, या व्हिडिओमध्ये पुलावर प्रचंड गर्दी झाल्याचं दिसत आहे. अनेकजण पुलावर उभा राहून मोबाईलच्या माध्यमातून फोटो काढत आहेत, तर काहीजण पुलावर उड्या देखील मारताना दिसत आहेत. मुलांच्या मस्तीमुळे पूल जोरदार हलताना देखील दिसत आहे. सोशल मीडियावर या दुर्घटनेचा व्हिडिओ पाहताना अंगावर अक्षरशः काटे उभा राहतात. या पुलावर असणरी अनेक मुलं उड्या मारून फुल हलवण्याचा प्रयत्न देखील करत असल्याचं दिसत आहे. काही कळायच्या आत अचानक हा फुल कोसळतो आणि पुलावर असणारी सर्व मंडळी नदीत कोसळतात.

पूल कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केले

पर्यटनासाठी गेलेल्या काही उपस्थितांनी आणि या दुर्घटनेत थोडक्यात बचावलेल्या रहिवाशांनी पुलावरून जाताना पुलावर उड्या मारणाऱ्या आणि फुल हलवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणांची तक्रार पूल कर्मचाऱ्याकडे केली होती. मात्र पूल कर्मचाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे देखील विजय गोस्वामी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. आम्ही देखील पुलावरून जाणार होतो, मात्र पुलावर उभा असणाऱ्या मुलांची मस्ती पाहून आम्ही पाठीमागे फिरलो, आम्ही पाठीमागे फिरलो त्याच क्षणी पूल कोसळला. आणि आम्ही थोडक्यात बचावलो असल्याची आप बिती या रहिवाशाने सांगितली.

हे देखील वाचाVirat Kohli Hotel Room: चाहत्याने विराटच्या हॉटेल रूमचा व्हिडिओ केला लीक, बाथरूमध्ये सापडल्या या धक्कादायक गोष्टी..

Relationship Tips: शारिरीक संबंध ठेवण्याची इच्छा झाल्यास महिला पुरुषांना देतात हे सहा संकेत; जाणून तुम्हालाही बसेल धक्का..

Hero Lectro: टू व्हीलरच्या वेगाने धावणाऱ्या Hero च्या या दोन इलेक्ट्रिक सायकल्सनी घातलाय धुमाकूळ; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्य..

Onion Price: या कारणामुळे कांदा करणार विक्रम; जाणून घ्या डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान काय असणार कांद्याची स्थिती..

Samsung Smartphone: Samsung ची भन्नाट ऑफर! 76 हजार किंमतीचा हा स्मार्टफोन मिळतोय १५,७०० रुपयांत..

Electric Scooter: फक्त 32 हजारामध्ये मिळतेय ही दमदार इलेक्ट्रिक स्कूटर; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

Second Hand Bike: 20 हजारात hero spender Plus, 16 हजारात Bajaj Pulsar! कुठे सुरू आहे हा भन्नाट सेल? जाणून घ्या सर्व डिटेल्स..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.