Virat Kohli Hotel Room: चाहत्याने विराटच्या हॉटेल रूमचा व्हिडिओ केला लीक, बाथरूमध्ये सापडल्या ‘या’ धक्कादायक गोष्टी..

0

Virat Kohli hotel room: भारताचा माजी कर्णधार आणि स्टार खेळाडू विराट कोहलीचे (Virat Kohli) चाहते जगभरात आहेत. हे वेगळे सांगण्याची गरज नाही. गेल्या दीड दोन वर्षात खराब फॉर्मनंतर विराट कोहली आता जबरदस्तलयीत आला असून, आपल्या बॅटमधून ओकतोय. टी-ट्वेंटी विश्वचषकाच्या (T20 World Cup) पाकिस्तान विरुद्ध भारत (INDvsPAK) सामन्यात विराट कोहलीने आतापर्यंत खेळलेली सर्वोत्तम खेळी असल्याचं अनेक क्रिकेट दिग्गजांनी स्पष्ट केलं. विराट कोहलीच्या दमदार खेळीच्या जोरावर भारताने या विश्वचषकात विजयी सलामी दिली. विराट कोहलीने दुसऱ्या सामन्यात देखील लगातार दुसरे अर्धशतक ठोकत हा विश्वचषक आपल्या नावावर राहणार असल्याचे संकेत दिले. मात्र आता विराट कोहली बाबत एक विचित्र घटना घडल्याचं समोर आलं आहे. या घटनेमुळे आता एकच हाहाकार उडाला आहे.

विराट कोहलीची फॅन फॉलोइंग (Virat Kohli fan) किती तगडी आहे, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. विराट कोहलीचे चाहते फक्त भारतातच नाही, तर जगभरात असल्याचे पाहायला मिळते. एवढेच नाही, तर कट्टर प्रतिस्पर्धी समजल्या जाणाऱ्या पाकिस्तानमध्ये देखील विराट कोहलीचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. चाहते कधी काय करतील, हे कोणालाही सांगता येत नाही. अनेकदा मैदानात खेळाडू खेळत असताना चाहचे स्टेडियममधून मैदानात धावत खेळाडूंच्या पाया पडताना आपण एकदा पाहिला असेल. हा प्रकार महेंद्रसिंग धोनी विराट कोहली बाबतीत देखील नेहमी घडला आहे.

आपल्या आवडत्या खेळाडूंसाठी चाहते कोणत्याही थराला जाऊ शकतात. हा नवीन विषय राहिला नाही. मात्र विराट कोहलीच्या बाबतीत घडलेल्या प्रसंगामुळे कोहली आता प्रचंड अस्वस्थ असून, त्याच्या प्रायव्हसीचा भंग झाल्याचं स्वतः विराट कोहलीने म्हटले आहे. विराट कोहली अस्वस्थ असण्याला कारण देखील तसंच आहे. विराट कोहलीच्या हॉटेलमधील रूमवर जाऊन एका चाहत्याने विराट कोहलीच्या संपूर्ण रूमचे दृश्य सोशल मीडियावर (social media) व्हायरल (Viral) केले आहे. फक्त रूमचेच नाही, तर विराट कोहलीच्या बाथरूमचे दृश्य देखील या चाहतेने सोडले नसल्याने विराट कोहली प्रचंड अस्वस्थ आहे.

विराट कोहलीने आपल्या इंस्टाग्रामवरून (Instagram) एक पोस्ट करत याबाबत स्वतः माहिती दिली आहे. टी ट्वेंटी विश्वचषकासाठी भारतीय टीम सध्या ऑस्ट्रेलियामध्ये (australia) असून, ऑस्ट्रेलियामधील एका हॉटेलमध्ये विराट कोहलीच्या रूमचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाल्याने (Viral video) अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. विराट कोहलीने आपल्या इंस्टाग्रामवरून या व्हिडिओ संदर्भात माहिती दिली असून, आपण प्रचंड अस्वस्थ असल्याचं म्हटलं आहे.

आपल्या भावना व्यक्त करताना विराट कोहली म्हणाला, मी समजू शकतो आपल्या आवडत्या खेळाडूंना पाहण्यासाठी आणि फोटो काढण्यासाठी चाहते खूप एक्साईट असतात. चाहत्यांच्या या भावना मी देखील समजून घेऊन त्यांचा मान राखत असतो. मात्र माझ्यासोबत घडलेला हा प्रसंग फार विचीत्रा आहे. चाहत्यांचा हा मूर्खपणा असून, एखाद्याच्या प्रायव्हसीचा भंग करणं हा गु न्हा असल्याचं देखील Virat Kohli म्हणाला आहे. विराट कोहलीने यासंदर्भात इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करताना माहिती दिली असून, यामध्ये हॉटेलचं नाव मात्र मेंशन केलं नाही.

विराट कोहलीच्या हॉटेलमधील रूममध्ये जाऊन शूट केलेला हा व्हिडिओ चाहत्याने केला नसून, हॉटेलमधीलच स्टाफ मॅनने केला असल्याचा अंदाज देखील वर्तवण्यात येत आहे. प्रचंड सिक्युरिटी असताना हॉटेलमध्ये एखादा चाहता विराट कोहलीच्या रूममध्ये कसा काय घुसू शकतो? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. हा सगळा खेळ चाहत्याचा नसून, हॉटेलमधील स्टाफचा असल्याचा अंदाज देखील काहींनी व्यक्त केला आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओत काय-काय?

हॉटेलमधील विराट कोहलीच्या रूममधील व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये विराट कोहलीच्या अनेक प्राइवेट गोष्टी पाहायला मिळत आहेत. सोशल मीडियावर वायरल झालेल्या व्हिडिओत विराट कोहलीच्या फक्त रूमचेच नाही, तर विराट कोहलीच्या बाथरूमचे दृश्य देखील व्हायरल करण्यात आले आहेत. सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आलेल्या व्हिडिओला ‘किंग कोहली रूम’ असं कॅप्शन देण्यात आलं आहे.

ज्यामध्ये काही देवांचे फोटो देखील पाहायला मिळत आहेत. यात कृष्ण देखील आहे. विराट कोहलीच्या किचनमध्ये त्याचे जेवणाचे साहित्य देखील असल्याचे पाहायला मिळत आहे. धक्कादायक बाब म्हणजे विराट कोहलीच्या बॅगमधून कपडे काढून देखील सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत दाखवण्यात आले आहे. ज्यामुळे विराट कोहली प्रचंड दुखी असून, या घटनेची चौकशी देखील होण्याची शक्यता आहे.

हे देखील वाचा Relationship Tips: शारिरीक संबंध ठेवण्याची इच्छा झाल्यास महिला पुरुषांना देतात हे सहा संकेत; जाणून तुम्हालाही बसेल धक्का..

Hero Lectro: टू व्हीलरच्या वेगाने धावणाऱ्या Hero च्या या दोन इलेक्ट्रिक सायकल्सनी घातलाय धुमाकूळ; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्य..

SSC GD: 10वी पास उमेदवारांसाठी कॉन्स्टेबल पदाच्या 24369 जागांची मेगा भरती; जाणून घ्या डिटेल्स..

Samsung Smartphone: Samsung ची भन्नाट ऑफर! 76 हजार किंमतीचा हा स्मार्टफोन मिळतोय १५,७०० रुपयांत..

Second Hand Bike: 20 हजारात hero spender Plus, 16 हजारात Bajaj Pulsar! कुठे सुरू आहे हा भन्नाट सेल? जाणून घ्या सर्व डिटेल्स..

Electric Scooter: फक्त 32 हजारामध्ये मिळतेय ही दमदार इलेक्ट्रिक स्कूटर; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.