Dry skin Solution: या कारणामुळे हिवाळ्यात त्वचा कोरडी, हात पाय पांढरे पडतात; जाणून घ्या यावरचा उपाय..

0

Dry skin Solution: हिवाळा (winter) आला की अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. खास करून आपल्या शरीराची विशेष काळजी घ्यावी लागते. इतर ऋतुंच्या तुलनेत हिवाळ्यामध्ये आपली त्वचा कोरडी (skin Dry) आणि काळी पडण्याची अधिक शक्यता असते. तुमच्या शरीराची जर तुम्ही विशेष काळजी घेतली नाही, तर थंडीच्या दिवसांमध्ये तुमची त्वचा फाटण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनेकदा आपण पाहतो, थंडीच्या दिवसांमध्ये हात पाय नेहमी पांढरे पडतात. हा अनुभव जवळपास प्रत्येकाला येतो. मात्र थंडीच्या दिवसांमध्ये विशेष काळजी घेऊन तुम्ही या समस्येपासून दोन हात लांब देखील राहू शकतात.

थंडी आल्यानंतर अनेकजण आपल्या शरीराची विशेष काळजी घेतात. मात्र तरी देखील आपल्या शरीराची त्वचा कोरडी आणि काळसर पडतेच. इतर ऋतूंच्या तुलनेत हिवाळा हा अतिशय चांगला ऋतू मानला जातो. मात्र आपल्या सौंदर्याचा बिघाड करण्यात हा ऋतू महत्त्वाची भूमिका देखील बजावतो. हिवाळ्यामध्ये आपली त्वचा खराब होते, हे सगळ्यांनाच माहित आहे. मात्र हे नक्की कशामुळे होतं, आपण हे देखील जाणून घेणे आवश्यक आहे. त्वचेतील सर्वात बाहेरील पेशींचा जो थर असतो, तो थंडीमध्ये मृत पावतो. त्वचेचं संरक्षण करण्यासाठी त्वचेवरील पेशी महत्त्वाची भूमिका बजावत असतात. मात्र थंडीमध्ये या मृत पावतात.

साहजिकच यामुळे त्वचेला कोरडेपणा आणि किळसरपणा येत असतो. ज्याला आपण ग्रामीण भाषेत हात पाय पांढरे पडतात असं देखील म्हणतो. वातावरणात झालेल्या बदलामुळे आपल्या त्वचेमध्ये जो ओलसरपणा असतो, तो बाहेर टाकला जातो. आपल्या शरीरामधील असणाऱ्या तेलकट ग्रंथीचे कार्य देखील या काळात मंदावत असते. या सगळ्यांचा परिणाम म्हणून आपली त्वचा कोरडी पडते, फुटते ज्यालाच आपण आपले हातपाय पांढरे पडतात असे देखील म्हणतो. या सगळ्या समस्या पासून आपण आपल्या त्वचेची संरक्षण कसे करू शकतो? हे देखील जाणून घेऊ.

उन्हाळ्यापेक्षा हिवाळ्यामध्ये आपली त्वचा अधिक काळसर दिसते, यावर अनेकांचा विश्वास बसणार नाही. मात्र हे खरं आहे. याचं कारण देखील रंजक आहे. उन्हाळ्यामध्ये आपण त्वचेची अधिक काळजी घेतो. उन्हाळ्यामध्ये त्वचेचे संरक्षण करणाऱ्या पेशींचे कार्य देखील उत्तमरीत्यात सुरू असतं, जे हिवाळ्यामध्ये मंदावते. त्वचा कोरडी पडल्यानंतर, आपल्याला ज्या काही उपाययोजना करायच्या असतात त्याकडे आपण दुर्लक्ष करतो. आणि म्हणून मग आपले हात, पाय, तोंड पांढरे पडतात, फाटतात. आणि त्वचा काळी पडते.

उन्हाळ्याच्या तुलनेत हिवाळ्यामध्ये पाणी पिण्याचे प्रमाण कमी होते. याचा अनुभव तुम्ही देखील घेतला असेल. शरीरात पाणी कमी गेल्यामुळे डीहायड्रेशन वाढून आपली त्वचा काळी दिसू लागते. हे देखील एक महत्त्वाचं कारण आहे. आणि म्हणून हिवाळ्यामध्ये देखील जास्तीत जास्त पाणी पिणे आवश्यक आहे. पाण्याबरोबरच हिवाळ्यामध्ये नियमितपणे सनस्क्रीम लावणे आवश्यक आहे. हिवाळ्यामध्ये त्वचा कोरडी पडल्यामुळे मॉइश्चरायझर लावणे आवश्यक आहे. आपण पाहतो, हिवाळ्यामध्ये अनेकजण उन्हामध्ये उभे राहतात. यामुळे कोरडी त्वचा आणखी कोरडी पडते. म्हणून सनस्क्रीन लावणे फार आवश्यक आहे.

स्किन केअर साबण वापरा

हिवाळ्यामध्ये त्वचा कोरडी पडते साहजिकच यामुळे तुम्ही आंघोळीसाठी वापरणाऱ्या साबणमध्ये (soap) बदल करणे आवश्यक आहे. हिवाळ्यामध्ये साबणाचा वापर करताना तुम्ही स्किन केअर (skin care) साबण वापरणे आवश्यक आहे. याशिवाय तुम्ही मॉइश्चरायझर असणारा साबण देखील वापरू शकता. Dettol कंपनीचा स्किन केअर साबण वापरल्यास त्वचा कोरडी आणि पांढरी पडण्यापासून तुम्ही संरक्षण करू शकता‌. अंघोळ केल्यानंतर तुम्ही नियमितपणे बॉडी लोशनचा वापर केल्यास तुम्हाला ही समस्या उद्भवणार नाही.

हे देखील वाचाGujrat Bridge Collapse: गुजरातमध्ये अचानक असा कोसळला पुल; शेकडो जणांचे बळी, व्हिडिओ पाहून चुकतोय काळजाचा ठोका..

Virat Kohli Hotel Room: चाहत्याने विराटच्या हॉटेल रूमचा व्हिडिओ केला लीक, बाथरूमध्ये सापडल्या या धक्कादायक गोष्टी..

Relationship Tips: शारिरीक संबंध ठेवण्याची इच्छा झाल्यास महिला पुरुषांना देतात हे सहा संकेत; जाणून तुम्हालाही बसेल धक्का..

Electric Scooter: फक्त 32 हजारामध्ये मिळतेय ही दमदार इलेक्ट्रिक स्कूटर; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

Second Hand Bike: 20 हजारात hero spender Plus, 16 हजारात Bajaj Pulsar! कुठे सुरू आहे हा भन्नाट सेल? जाणून घ्या सर्व डिटेल्स..

SSC GD: 10वी पास उमेदवारांसाठी कॉन्स्टेबल पदाच्या 24369 जागांची मेगा भरती; जाणून घ्या डिटेल्स..

Samsung Smartphone: Samsung ची भन्नाट ऑफर! 76 हजार किंमतीचा हा स्मार्टफोन मिळतोय १५,७०० रुपयांत..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.