PM Kisan Yojana: अजूनही PM Kisan योजनेचा बारावा हप्ता जमा झाला नसेल तर फक्त करा ‘हे’ काम, झटक्यात होईल जमा..
PM Kisan Yojana: शेतकऱ्यांना (Farmer) आर्थिक (Financial) मदत (help) व्हावी यासाठी केंद्र सरकारने (central government) पीएम किसान योजना (pm kisan Yojana) राबवण्याचा निर्णय घेतला. या योजनेच्या माध्यमातून देशातील सर्व शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयाची मदत दिली जाते. पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना ही मदत चार महिन्यांच्या अंतराने दोन हजार अशी तीन हप्त्यात दिली जाते. आतापर्यंत केंद्र सरकारने शेतकऱ्यांना एकूण दोन दोन हजारांचे बारा हप्ते दिले आहेत. केंद्र सरकारने 17 ऑक्टोंबर 2022 ला नवी दिल्लीमध्ये किसान सन्मान संमेलनात (Kisan Samman Samelan) पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांच्या हस्ते पीएम किसानच्या बाराव्या हप्त्यांचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केले. मात्र अजूनही काही तांत्रिक अडचणीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा झाली नाही. आज आपण याच संदर्भात सविस्तर जाणून घेणार आहोत. (PM KISAN 12th installment)
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 ऑक्टोबर 2022ला नवी दिल्लीमध्ये किसान सन्मान संमेलनात पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यावर 12 व्या हप्त्याचे पैसे हस्तांतरित केले. या कार्यक्रमात एकूण आठ कोटीहून अधिक लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा केले. यावेळी कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर, मनसुख मांडविया, यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. 17 ऑक्टोबर 2022 रोजी ही रक्कम अदा करण्यात आली असली तरीदेखील, अजूनही २ कोटी ६२ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत. साहजिकच यामुळे लाभार्थी शेतकरी प्रचंड नाराज असल्याचं पाहायला मिळत आहेत.
केंद्र सरकारकडून पिएम किसान योजनेचा बारावा हप्ता 17 ऑक्टोबर 2022 ला सोडून देखील अजूनही २ कोटी ६२ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात काही कारणामुळे जमा झाले नाहीत. त्यामुळे शेतकरी प्रचंड नाराज आहेत. जर तुमच्या देखील खात्यात पी एम किसान योजनेचा बारा वाजता जमा झाला नसेल, तर काळजी करण्याची आवश्यकता नाही. पी एम किसान योजनेचा बारावा आता कोणत्या कारणामुळे तुमच्या खात्यात जमा होऊ शकला नाही? याची तुम्हाला सर्व अपडेट फक्त एका हेल्पलाइन क्रमांकावर कॉल करून देखील मिळू शकते. आज आम्ही तुम्हाला या संदर्भात सविस्तर माहिती देणार आहोत.
या तीन पद्धतीने तपासा तुमच्या खात्याची स्थिती
पी एम किसान योजनेचा भरावा हप्ता अजूनही तुमच्या खात्याचा जमा झाला नसेल, तर तुम्हाला तीन प्रकारे तुमच्या खात्याची स्थिती तपासता येऊ शकते. या तिन्ही पद्धती अतिशय सोप्या असून आम्ही तुम्हाला या तिन्ही पद्धती विषयी सविस्तर माहिती देणार आहोत. सर्वप्रथम आपण पीएम किसन योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुमच्या खात्याची स्थिती कशी तपासायची? हे जाणून घेऊया. बाराव्या हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यावर का जमा झाले नाहीत? हे पाहण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही तुमच्या मोबाईल मधील क्रोमवर जाऊन pmkisan.gov.in असं सर्च करणं आवश्यक आहे.
तुमच्या मोबाईल मधील क्रोमवर जाऊन pmkisan.gov.in असं सर्च केल्यानंतर, तुमच्यासमोर अधिकृत वेबसाईट ओपन होईल. पी एम किसान योजनेचे अधिकृत वेबसाईट ओपन झाल्यानंतर, तुम्हाला ‘फार्मर कॉर्नर’ या पर्यायावर क्लिक करायचं आहे. ‘फार्मर कॉर्नर’ या पर्यायावर क्लिक केल्यानंतर, ‘बेनिफिशियरी स्टेटस’ हा पर्याय तुमच्यासमोर ओपन होईल तुम्हाला बरोबर या पर्यायावर क्लिक करायचं आहे. ‘बेनिफिशियरी स्टेटस’ या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमच्या खात्याची स्थिती तपासू शकता.
जर तुम्हाला ही प्रक्रिया किचकट वाटत असेल, तर तुम्ही पी एम किसान योजनेच्या अधिकृत ईमेल आयडीवरून मेल पाठवून देखील तुमच्या समस्येचे निराकरण करू शकता. जर तुम्ही ई-केवायसी केली नसेल, त्याचबरोबर तुमच्या खात्याचा अर्ज करताना चुकीची माहिती अपडेट केली असेल, तुमच्या खात्याचे व्हेरिफिकेशन झाले नसेल तर तुमच्या खात्यात बारावा हप्ता जमा होणार नाही. त्यासाठी तुम्ही तुमच्या खात्याची स्थिती तपासून या समस्येची पूर्तता करणे आवश्यक आहे.
हे देखील वाचा Dry skin Solution: या कारणामुळे हिवाळ्यात त्वचा कोरडी, हात पाय पांढरे पडतात; जाणून घ्या यावरचा उपाय..
Electric Scooter: फक्त 32 हजारामध्ये मिळतेय ही दमदार इलेक्ट्रिक स्कूटर; जाणून घ्या सर्व डिटेल्स..
Samsung Smartphone: Samsung ची भन्नाट ऑफर! 76 हजार किंमतीचा हा स्मार्टफोन मिळतोय १५,७०० रुपयांत..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम