Virat Kohli: विजयानंतर हार्दिक पांड्या, विराट कोहली धाय मोकलून का रडले; पांद्याच्या रडण्याचे कारण तर आहे खासच, पाहा व्हिडिओ..
Virat Kohli: मेलबर्न क्रिकेट मैदानावर (Melbourne cricket ground) भारत आणि पाकिस्तान (india vs Pakistan) यांच्यामध्ये खेळण्यात आलेल्या टी ट्वेंटी वर्ल्ड कप (T20 World Cup) मधील सामन्यात भारताने विराट कोहलीच्या (Virat Kohli) जोरावर पाकिस्तानचा पराभव करत विश्वचषकामध्ये विजय सलामी दिली. 31 धावांत महत्त्वाचे चार खेळाडू बाद झाल्यानंतर, हा सामना पाकिस्तान सहज जिंकेल असं वाटत होतं. मात्र चेसमास्टर विराट कोहली मैदानावर होता. अनेक क्रिकेट दिग्गजांचे प्रेडिक्शन फेल ठरवत विराट कोहलीने एकाकी झुंज देत अखेर पाकिस्तान संघाच्या तोंडातून घास हिरावून घेत भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.
नाणेफेक जिंकून कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. भारताच्या गोलंदाजांनी (Indian bowlers) देखील रोहित शर्माने घेतलेला निर्णय सार्थ ठरवत पाकिस्तानची सुरुवातीच्या काही षटकात दयनीय अवस्था केली. डावखुळा गोलंदाज हर्षदीप सिंहने (harshadeep Singh) आपल्या पहिल्याच चेंडूवर कर्णधार बाबर (Babar Azam) आझमला पायचीत करत पाकिस्तानला पहिला धक्का दिला. यानंतर हर्षदीपने पुन्हा एकदा मोहम्मद रिजवानला (Mohammed Rizwan) आपली शिकार बनवली. पंधरा धावांत दोन बाद अशा स्थितीतून पाकिस्ताने डाव सावरला. अखेरच्या चार षटकात 44 धावा करत पाकिस्तानने आव्हानात्मक धावसंख्या उभारली.
160 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरणाऱ्या भारताची सुरुवात फारच निराशाजनक झाली. पाकिस्तानच्या जलदगती गोलंदाजांनी एकावर एक धक्के देत, भारताची 31 धावांत चार बाद अशी अवस्था केली. कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) के एल राहुल (KL Rahul) सूर्यकुमार यादव (suryakumar Yadav) आणि अक्षर पटेल (Akshar Patel) या चार फलंदाजाला तंबूत पाठवल्यानंतर, पाकिस्तान हा सामना सहज असं वाटत होतं. मात्र चेसमास्टर विराट कोहली पाकिस्तानच्या विजयाचा अडथळा ठरला. चार बाद 31 अशा बिकट अवस्थेतून विराट कोहलीने डावाची सगळी सूत्रे आपल्या हाती घेतली.
आठ चेंडूतमध्ये 28 धावांची (8 ball 28 run) आवश्यकता असताना विराट कोहलीने पाकिस्तानचा जलदगती गोलंदाज हरिस रौफला (Haris Rauf) लगातार दोन चेंडूवर अप्रतिम दोन षटकार खेचत भारताच्या विजयाच्या आशा पुन्हा पल्लवीत केल्या. सहा चेंडू 16 धावांची आवश्यकता असताना पुन्हा एकदा सामन्याने कलाटणी घेतली. स्पिन गोलंदाज मोहम्मद नवाजच्या (Mohammad Nawaz) पहिल्या चेंडूवर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) झेलबाद झाल्यानंतर हा सामना पुन्हा एकदा पाकिस्तानच्या बाजूने झुकला. मात्र चार चेंडूत १४ धावांची आवश्यकता असताना विराटने षटकार खेचला. अखेरच्या चेंडूत एका धावेची आवश्यकता असताना आर आश्विनने (Ravichandran Ashwin) चौकार खेचला.
विराट कोहलीने भारताला विजय मिळवून दिल्यानंतर कोहली प्रचंड भावुक झाल्याचे पाहायला मिळालं. विजयानंतर मैदानात भारताच्या अनेक खेळाडूंनी धाव घेतली. कर्णधार रोहित शर्माने देखील मैदानात धाव घेतली आणि विराट कोहलीला आपल्या खांद्यावर उचलून घेत गोल फिरवलं. भारताच्या विजयानंतर अशी अनेक दृश्य कॅमेरात कैद झाली. जे पाहून तमाम क्रिकेट प्रेमींच्या डोळ्यातून अश्रू वाहिले. विजयानंतर विराट कोहलीच्या डोळ्यात पाणी पाहायला मिळाले विराट बरोबरच हार्दिक पांड्या देखील विजयानंतर धाय मोकलून रडल्याचे पाहायला मिळाले. (Hardik Pandya crying)
आतापर्यंत ऑस्ट्रेलियाविरुद्ध मोहालीच्या मैदानावर 52 चेंडूत 83 धावांची खेळी मी सर्वोत्तम समजत होतो. मात्र मी आज खेळलेली माझ्या आयुष्यातील ही सर्वोत्तम खेळी असल्याचे देखील विराट कोहली म्हणाला. विराट कोहलीच्या या खेळीचे विश्लेषण करताना रोहित शर्मा म्हणाला, भारताकडून खेळलेली ही आत्तापर्यंतची सर्वोत्तम खेळी होती. आतापर्यंत कोणत्याही भारतीय खेळाडूने अशी खेळी खेळली नसल्याचे रोहित शर्मा म्हणाला.
https://youtu.be/SNPmPy_aG-A
ऐतिहासिक विजयानंतर हार्दिक पांड्या धाय मोकलून रडला. हार्दिक पांड्या धाय मोकलून रडण्याला कारण देखील विशेष आहे. विजयानंतर इरफान पठाण आणि जतीन या दोघांसोबत बोलताना हार्दिक पांड्याला आपल्या वडिलांची आठवण आली. आम्हां दोघा भावंडांसाठी माझ्या वडिलांनी जे काही केलं आहे, ते मला आजही आठवतं. आम्ही सहा वर्षाचो असताना त्यांनी आमच्यासाठी केलेले सॅक्रिफाइस मी विसरू शकत नाही. त्यांनी आम्ही क्रिकेट खेळावे यासाठी आपली सगळी स्वप्ने बाजूला ठेवली. माझ्या वडिलांनी जर काही केलं नसतं, तर मी आज या ठिकाणी उभा राहिलो नसतो. मी क्रिकेट खेळू शकलो नसतो. अशी भावना व्यक्त करताना हार्दिक पांड्याच्या डोळ्यातून घळा घळा अश्रू वाहिले.
It made me cry . Cricket is not just a game . County Cricket Family ..@hardikpandya7 you are gem 💎 Champion take a Bow ..keep rising#indvspakmatch #HardikPandya #INDvsPAK2022 #ViratKohli pic.twitter.com/ryki6tAeq8
— Dekaysing09 (@dkygims26) October 23, 2022
मी आणि कृणाल क्रिकेट खेळावे, यासाठी माझ्या वडिलांनी जे काही कष्ट घेतले, ते मी कधीही विसरू शकत नाही. आम्ही क्रिकेट खेळावं, यासाठी वडिलांनी घेतलेले कष्ट, केलेल्या संकटाचा सामना मी कधीही विसरू शकत नाही. मी माझ्या मुलावर खूप प्रेम करतो, माझा मुलगा देखील त्याला जे काही करायचं आहे, त्यासाठी मी सर्व काही करीन. अशी भावना देखील हार्दिक पांड्याने व्यक्त केली. हार्दिक पांड्या धाय मोकलून रडलेला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान वायरल होतो आहे.
हे देखील वाचा viral video: 25 फूट किंग कोब्रा पकडाय गेला अन्..; थरकाप उडणारा व्हिडिओ पाहून तुम्ही पुन्हा नागाला पकडायला जाणारही नाही..
Electric Scooter: फक्त 32 हजारामध्ये मिळतेय ही दमदार इलेक्ट्रिक स्कूटर; जाणून घ्या सर्व डिटेल्स..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम