ITBP Recruitment 2022: दहावी, बारावी उमेदवारांसाठी सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी! या विभागात निघाली मेगा भरती; असा करा ऑनलाईन अर्ज..

0

ITBP Recruitment 2022: बेरोजगारी (unemployment) बरोबरच महागाई (inflation) देखील दिवसेंदिवस वाढत चालली आहे. साहजिकच अशा परिस्थितीत कुठेतरी चार पैशाची नोकरी (job) करणे खूप गरजेचे आहे. मात्र बेरोजगारीच्या या जमान्यात प्रत्येकाला नोकरी मिळणे खूप कठीण झालं आहे. अनेक क्षेत्रात संधी उपलब्ध होत आहेत, मात्र तितक्याच मोठ्या प्रमाणात विद्यार्थी देतील अप्लाय करत असल्याने, अनेकांना नोकरी मिळवण्यासाठी धडपड करावी लागत आहे. जर तुम्ही देखील नोकरीच्या शोधात असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. (ITBP Recruitment 2022)

महागाई आणि बेरोजगारीने (inflation and unemployment) उच्चांक गाठला असल्याने आता उच्च शिक्षण घेऊन देखील नोकरी मिळेल याची काहीही शाश्वती नाही. साहजिकच यामुळे आता अनेकजण दहावी, बारावी झाल्यानंतरच कुठेतरी चार पैशाची नोकरी मिळावी याच्या शोधात असल्याचे दिसून येते. एवढेच नाही, तर अनेकांची उच्च शिक्षण घेण्याची परिस्थिती नसते. अशावेळी अनेक जण दहावी, बारावीनंतर नोकरी करण्याचा निर्णय घेतात. जर तुम्ही देखील दहावी आणि बारावीनंतर नोकरीच्या शोधात असाल, तर तुमचा शोध पूर्ण होऊ शकतो. (Indo-Tibetan Border Police Recruitment 2022)

इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलमध्ये (Indo-Tibetan Border Police) काही पदांची भरती निघाली असून, इच्छुक उमेदवारांना 30 नोव्हेंबर पर्यंत अर्ज करता येणार आहेत. इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलमध्ये (Indo-Tibetan Border Police) एकूण 293 रिक्त पदांची भरती निघाली आहे. इच्छूक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांना itbpolice.nic.in या अधीकृत वेबसाईटवर जाऊन, अर्ज करता येणार आहे. इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दला अंतर्गत कोण-कोणत्या पदासाठी भरती होणार आहे? त्याबरोबरच उमेदवारांची शैक्षणिक पात्रता? सोबतच ऑनलाईन अर्ज कसा करायचा? या विषयी जाणून घेऊया सविस्तर. सर्वप्रथम आपण कोण कोणत्या पदासाठी भरती केली जाणार, हे जाणून घेऊ.

इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलाअंतर्गत केल्या जाणाऱ्या या भरतीसाठी एकूण 293 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यामध्ये ‘हेड कॉन्स्टेबल’ या पदासाठी एकूण 126 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. ‘कॉन्स्टेबल टेलिकम्युनिकेशन’ या पदासाठी एकूण 167 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. आता आपण ‘हेड कॉन्स्टेबल’ आणि ‘कॉन्स्टेबल टेलीकम्युनिकेशन’ या पदासाठी भरण्यात येणाऱ्या या जागांसाठी उमेदवारांची पात्रता काय ठेवण्यात आले आहे? हे देखील सविस्तर जाणून घेऊ.

उमेदवारांची शैक्षणिक पात्रता. 

हेड कॉन्स्टेबल टेलिकम्युनिकेशन या पदासाठी भरण्यात येणाऱ्या 126 जागांसाठी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता जाणून घ्यायची झाल्यास, उमेदवार 45 टक्के गुंनासह बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अर्जदार बारावी उत्तीर्ण नसेल, तर 45% गुणासह दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सोबतच दहावी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवाराने आयटीआय इलेक्ट्रिकल कम्प्युटर त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन,कम्प्युटर सायन्स, इंजिनिअरिंग डिप्लोमा अशा प्रकारचे शिक्षण घेणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

‘कॉन्स्टेबल टेलिकम्युनिकेशन’ या पदासाठी भरण्यात येणाऱ्या 167 जागांसाठी उमेदवाराच्या शैक्षणिक पात्रतेचा विचार करायचा झाल्यास, उमेदवार हा दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर उमेदवारांचे वय हे 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत 18 पासून 25 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे. हे वय ओपन विद्यार्थ्यांसाठी असणार आहे एससी/ एसटी या उमेदवारांसाठी या वयामध्ये पाच वर्षांची सूट असणार आहे. तर ओबीसी या उमेदवारांसाठी तीन वर्षाची सूट मिळणार आहे. म्हणजेच एससी/ एसटी उमेदवारांसाठी 30 वर्षापर्यंत वयाची अट असणार आहे. तर ओबीसी या विद्यार्थ्यांसाठी 28 वर्षापर्यंत सूट असणार आहे.

परीक्षा फी/पगार/नोकरीचे ठिकाण

आता आपण इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलाअंतर्गत केल्या जाणाऱ्या भरतीसाठी उमेदवारांना पगार किती असणार याविषयी जाणून घेऊ. तर निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 25 हजार 500 ते 81 हजार शंभर रुपये पर्यंत सातव्या वेतननुसार पगार असणार आहे. “कॉन्स्टेबल टेलिकम्युनिकेशन” या पदासाठी 21 हजार 700 ते 69 हजार 100 रुपये याप्रमाणे दरमहा पगार असणार आहे. उमेदवारांना या भरती प्रक्रियेस सहभाग घेण्यासाठी आणि ओबीसी कॅटेगिरीच्या विद्यार्थ्यांसाठी शंभर रुपये फी आकारण्यात येणार आहे. तर एससी/ एसटी या उमेदवारांसाठी, सोबतच महिलांना देखील या भरती प्रक्रियेसाठी कोणत्याही प्रकारची फी आकारण्यात येणार नाही. या परीक्षेचे ठिकाणी संपूर्ण भारतभर असणार आहे.

निवड प्रक्रिया

आपण या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांची निवड कशी केली जाणार? याविषयी देखील सविस्तर जाणून घेऊ. तर या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांची निवड ही शारीरिक कार्यक्षमतेच्या चाचणीनुसार त्याचबरोबर शारीरिक मानक चाचणीनुसार आणि लेखी चाचणीनुसार निवड केली जाणार आहे. सोबतच दस्तऐवज पडताळणी देखील केली जाणार आहे. वैद्यकीय परीक्षा आणि पुनरावलोकन वैद्यकीय परीक्षा देखील घेतली जाणार आहे. आपण या भरती प्रक्रियासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा हे देखील जाणून घेऊ.

असा करा ऑनलाईन अर्ज

इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलाअंतर्गत केल्या जाणाऱ्या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांना एक नोव्हेंबर 2022 ते 30 नोव्हेंबर 2022 या कालावधीमध्ये अर्ज करता येणार आहे. उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम आपल्या मोबाईल मधील क्रोमवर जाऊन https://recruitment.itbpolice.nic.in/ असं सर्च करणे आवश्यक आहे. हे सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर अधिकृत वेबसाईट ओपन होईल. सध्या ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली नाही. मात्र तुम्हाला एक तारखे नंतर या वेबसाईटवर जाऊन अर्ज करता येणार आहे.

हे देखील वाचा Flipkart Big Diwali Sale: फ्लिपकार्ट सेलमध्ये दहा हजारांपेक्षा कमी किंमतीत विकले जात आहेत samsung सह हे 5 स्मार्टफोन..

Second Hand Bike: 20 हजारात hero spender Plus, 16 हजारात Bajaj Pulsar! कुठे सुरू आहे हा भन्नाट सेल? जाणून घ्या सर्व डिटेल्स..

WhatsApp new update: आता सिलेक्टेड लोकांनाच दाखवता येणार तुमचा whatsapp DP; जाणून घ्या या संदर्भातली सेटिंग सविस्तर..

OTT Platform: आता hotstar वर टी-ट्वेंटी वर्ल्ड कप पाहता येणार मोफत; पाहा मोफत hotstar वापरण्याची ही ट्रिक..

Electric Scooter: फक्त 32 हजारामध्ये मिळतेय ही दमदार इलेक्ट्रिक स्कूटर; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

Sport shoes: दीड हजार किंमतीचे स्पोर्ट शूज या वेबसाईटवर मिळतायत केवळ 250 रुपयांत; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

infosys recruitment 2022: Infosys, Wipro,TCS मध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी; दिलेल्या लिंकवर क्लिक करून असा करा अर्ज..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.