WhatsApp new update: आता सिलेक्टेड लोकांनाच दाखवता येणार तुमचा whatsapp DP; जाणून घ्या या संदर्भातली सेटिंग सविस्तर..

0

WhatsApp new update: व्हाट्सअप (whatsapp) आपल्या युजरसाठी (users) नवनवीन अपडेट (New update) घेऊन येत आहे. युजर्सच्या सुरक्षेची खबरदारी म्हणून व्हाट्सअपने गेल्या काही महिन्यांपासून अनेक नवीन फीचर व्हाट्सअपमध्ये ऍड केले आहेत. आता पुन्हा एकदा व्हाट्सअपने आणखी एक नवीन फीचर्स आपल्या युजरसाठी अपडेट केले असून, आता युजर्स आपला व्हाट्सअप डीपी (whatsapp dp) सिलेक्टेड लोकांनाच दाखवता येणार आहे. व्हाट्सअप वापरणाऱ्या युजर्सना आपला डीपी ज्यांना दाखवायचा आहे, केवळ त्यांनाच दाखवता येणार आहे. तुम्हाला नको असणाऱ्या लोकांपासून तुम्ही तुमचा डिपी लपवू शकता. व्हाट्सअपच्या या नवीन अपडेट विषयी अजूनही तुम्हाला माहिती नसेल, तर जाऊन घ्या सविस्तर. (know how to hide your whtsapp dp)

गेल्या काही महिन्यांमध्ये व्हाट्सअपने (whatsapp) आपल्या युजर्सच्या सुरक्षेची खबरदारी म्हणून, व्हाट्सअपमध्ये अनेक फिचर्स ॲड केले. (new feature add) व्हाट्सअपचे युजर्स whatsapp users) व्हाट्सअप ग्रुपमध्ये फेक मेसेज (fake massage) पाठवल्याचे मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत होते. यावर आळा घालण्यासाठी व्हाट्सअपने नवीन फिचर्स अपडेट केले. या फीचर्सच्या माध्यमातून व्हाट्सअप ॲडमिन ग्रुप मधील कोणत्याही सदस्याचा मेसेज डिलीट करू शकतो. यापूर्वी ग्रुप मधील कोणत्याही सदस्याने कोणत्याही प्रकारचा मेसेज पाठवले, तर त्यावर अडमिनला नियंत्रण ठेवता येत नव्हते. मात्र व्हाट्सअपच्या नवीन अपडेट नुसार, ग्रुप ॲडमिनला ग्रुप मधील सर्व सदस्यांचे मेसेज डिलीट करता येत आहेत. (WhatsApp user security)

व्हाट्सअपच्या खुप सार्‍या अपडेटमध्ये आता आणखी एक व्हाट्सअप अपडेट ऍड झाले आहे. युजर्सच्या सुरक्षेसाठी व्हाट्सअपने आता तुम्हाला ज्या लोकांना तुमचा डीपी दाखवायचा आहे, त्याच लोकांना तुमचा डीपी दाखवता येणार आहे. यापूर्वी व्हाट्सअप डीपी हा एक तर तुम्हाला सगळ्यांना दाखवता येत होता, किंवा सगळ्यांपासून लपवून ठेवता येत होता. मात्र whatsapp च्या नवीन अपडेट नुसार, आता तुम्हाला ज्या लोकांना तुमचा व्हाट्सअप डीपी दाखवायचा आहे, केवळ त्याच लोकांना तुम्हाला दाखवण्याची सेटिंग whatsapp ने अपडेट केली आहे. आता तुम्हाला जर ही सेटिंग बदलायची असेल, तर तुम्ही खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचणं आवश्यक आहे.

अशी बदला सेटिंग

अनेकांना वाटत असतं आपला डीपी कोणीही पाहू नये, फक्त काही लोकांनीच पाहावा. आता अशा युजर्सची इच्छा whatsapp ने पूर्ण केली आहे. चला तर मग जाणून घेऊया whatsapp ने अपडेट केलेल्या या नवीन फीचर्सचा कसा लाभ घ्यायचा. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला व्हाट्सअप ओपन केल्यानंतर, व्हाट्सअप सेटिंगवर जाणे आवश्यक आहे. सेटिंगवर क्लिक केल्यानंतर, तुम्हाला Privacy या पर्यायावर क्लिक करायचं आहे.

व्हाट्सअपच्या सेटिंग मधील प्रायव्हसी या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला Last Seen, Online, Profile Photo असे तीन पर्याय पाहायला मिळतील. तुम्हाला या तीन पर्यायांपैकी ‘प्रोफाइल फोटो’ या पर्यायावर क्लिक करायचं आहे. तुम्ही ‘प्रोफाइल फोटो’ या पर्यायावर क्लिक केल्यानंतर, तुमच्यासमोर Everyone, My Contact except, My Contact, त्याचबरोबर Nobody असे चार पर्याय पाहायला मिळतील. आता तुम्हाला या चार पर्यायामधून My Contact except हा पर्याय निवडायचा आहे.

“My Contact except” या पर्यायावर क्लिक केल्यानंतर, तुमच्या ‘contact’ मधील तुम्हाला ज्या लोकांना तुमचा व्हाट्सअप डीपी (whatsapp dp) दाखवायचा आहे, त्या लोकांना सिलेक्ट करायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही तुम्हाला पाहिजे त्या लोकांना तुमचा व्हाट्सअप डीपी दाखवू शकता. व्हाट्सअपमध्ये यापूर्वी ही सेटिंग अपडेट केली नव्हती, यापूर्वी फक्त Everyone आणि Nobody असे दोनच पर्याय पाहायला मिळत होते. मात्र आता यात बदल करण्यात आला आहे.

हे देखील वाचा Maruti Suzuki Jimny: महिंद्रा थारचा Maruti Suzuki Jimmy ने उठवला बाजार; जाणून घ्या या कारची वैशिष्ट्य फीचर आणि किंमत..

OTT Platform: आता hotstar वर टी-ट्वेंटी वर्ल्ड कप पाहता येणार मोफत; पाहा मोफत hotstar वापरण्याची ही ट्रिक..

Second Hand Car: जबरदस्त कंडिशन असणारी Maruti Suzuki Alto मिळतेय केवळ 65 हजारांत; जाणून घ्या ऑफर विषयी सविस्तर..

infosys recruitment 2022: Infosys, Wipro,TCS मध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी; दिलेल्या लिंकवर क्लिक करून असा करा अर्ज..

Electric Scooter: फक्त 32 हजारामध्ये मिळतेय ही दमदार इलेक्ट्रिक स्कूटर; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

Sport shoes: दीड हजार किंमतीचे स्पोर्ट शूज या वेबसाईटवर मिळतायत केवळ 250 रुपयांत; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

Electric Bike: केवळ ९९९ रुपयांमध्ये घरी आणा ही इलेक्ट्रिक साईकल; एका चार्जमध्ये १२० किमी जाणाऱ्या या साईकल विषयी जाणून घ्या सविस्तर..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.