Flipkart Big Diwali Sale: फ्लिपकार्ट सेलमध्ये दहा हजारांपेक्षा कमी किंमतीत विकले जात आहेत samsung सह हे 5 स्मार्टफोन..

0

Flipkart Big Diwali Sale: कोरोना नंतर मोठ्या उत्साहात दिवाळी (Diwali 2022) साजरी होत आहे. साहजिकच यामुळे अनेक जण दिवाळीचे औचित्य साधून नवनवीन वस्तू खरेदी करत आहेत. अनेक ई-कॉमर्स वेबसाईट (e-commerce website) देखील ग्राहकांसाठी दिवाळीची बंपर ऑफर घेऊन आल्या आहेत. खास करून फ्लिपकार्टवर (Flipkart) दिवाळीनिमित्त अनेक इलेक्ट्रॉनिक (electronic) वस्तूंवर तब्बल 60 ते 70 टक्के डिस्काउंट (discount) देण्यात आला आहे. यामध्ये Samsung सह अनेक दर्जेदार कंपनीच्या स्मार्टफोनचा (smartphone) देखील समावेश आहे. आज आम्ही तुम्हाला फ्लिपकार्टवर (Flipkart) विक्री होत असणाऱ्या पाच स्मार्टफोन विषयी माहिती देणार आहोत, जे तुम्हाला दहा हजार पेक्षा कमी किमतीत खरेदी करता येणार आहेत.

दिवाळी हा प्रत्येकाचा आवडता सण असतो. या सणाला अनेक जण खूप मोठ्या प्रमाणात खरेदी करताना पाहायला मिळतात. खाद्यपदार्थांपासून अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तू नवनवीन चार चाकी, दोन चाकी गाड्या देखील खरेदी करण्याचा उत्तम योग असल्याचं म्हंटले जाते. साहजिकच यामुळे दिवाळी प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने साजरी करत असतो. दिवाळीच्या या महत्त्वाच्या सणांमध्ये प्रत्येकाला महागड्या वस्तू खरेदी करता येणं शक्य नसतं. हे जरी खर असलं तरी अनेक जण आपल्या पद्धतीने आपल्या ऐपतीप्रमाणे नवनवीन वस्तू खरेदी करतोच करतो. जर तुमचे देखील बजेट कमी असेल, आणि तुम्हाला स्मार्टफोन खरेदी करायचा असेल, तर तुमच्यासाठी खूप मोठी संधी आहे.

Flipkart ने Flipkart Big Diwali Sale या सेलचे आयोजन केले आहे. या सेलमध्ये अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तू ग्राहकांना निम्म्या किंमतीत खरेदी करता येणार आहेत. मात्र या सगळ्यात फ्लिपकार्टने स्मार्टफोन खरेदीचा ऑफरकडे अनेकांचे लक्ष वेधून घेतलं आहे. फ्लिपकार्टने आयोजित केलेला हा सेल १९ ऑक्टोबर पासून 23 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे या पाच दिवसांमध्ये तुम्हाला शॉपिंग (shopping) करण्याची गडबड करावी लागणार आहे. आता आपण फ्लिपकार्टवर कोणत्या पाच स्मार्टफोनवर तगडा डिस्काउंट देण्यात आला आहे, याविषयी जाणून घेऊया सविस्तर.

SAMSUNG Galaxy F13

सॅमसंग स्मार्टफोन कंपनीने ग्राहकांच्या मनामध्ये कमालीची विश्वासार्हता निर्माण केली आहे. वाजवी किंमत आणि अनेक दर्जेदार फीचर्स त्याचबरोबर मजबूत स्मार्टफोन बनवण्याला सॅमसंग प्राधान्य देते. साहजिकच यामुळे या कंपनीचे स्मार्टफोन खरेदी करणाऱ्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. जर तुम्हाला देखील सॅमसंगचा स्मार्टफोन खरेदी करायचा असेल, तर फ्लिपकार्टवर सॅमसंग गॅलेक्सी F13 (SAMSUNG Galaxy F13) हा स्मार्टफोन खूप कमी किंमतीत मिळत आहे.

4 GB RAM तसेच 64 GB स्टोरेज असणारा हा smartphone ग्राहकांना केवळ नऊ हजार पाचशे रुपयांत खरेदी करता येत आहे. या स्मार्टफोनची मूळ किंमत पंधरा हजार आहे. मात्र फ्लिपकार्टच्या दिवाळी सेलमध्ये तुम्हाला हा स्मार्टफोन 5000 रुपयांनी स्वस्त मिळत आहे. या स्मार्टफोनचा डिस्प्ले हा 6.6-इंचाचा आहे. महत्त्वाचं म्हणजे, या स्मार्टफोनचा कॅमेरा हा तब्बल 50 मेगापिक्सलचा असणार आहे. सोबतच 6000mAh बॅटरी देखील देण्यात आली आहे.

POCO C31

POCO C31 हा स्मार्टफोन देखील अलीकडच्या काळात ग्राहकांच्या कमालीचा पसंतीस उतरला आहे. या स्मार्टफोनचा कॅमेरा देखील भन्नाट आहे. कॅमेरा बरोबरच या स्मार्टफोनची खासियत म्हणजे, हा स्मार्टफोन एकदा चार्ज केल्यानंतर तब्बल दोन दिवस चालतो. हा स्मार्टफोन देखील ग्राहकांना केवळ साडेसात हजार रुपयांत खरेदी करता येणार आहे. या स्मार्टफोनची मूळ किंमत बारा हजार रुपये आहे. मात्र फ्लिपकार्टच्या दिवाळी सेलमध्ये हा स्मार्टफोन तुम्हाला साडेचार हजार रुपयांच्या discount मध्ये खरेदी करता येत आहे. 4GB RAM तसेच 64GB स्टोरेजसह तुम्हाला हा स्मार्टफोन मिळतो.

REDMI 10

फ्लिपकार्ट दिवाळी सेलमध्ये रेडमी 10 मोबाईल देखील ग्राहकांना तब्बल सहा हजार रुपयांच्या डिस्काउंटमध्ये खरेदी करता येत आहे. या स्मार्टफोनची मूळ किंमत ही पंधरा हजार रुपये आहे. मात्र फ्लिपकार्टच्या दिवाळी सेलमध्ये तुम्हाला हा स्मार्टफोन केवळ नऊ हजार रुपयांत खरेदी करता येत आहे. या स्मार्टफोनचा डिस्प्ले 6.7 इंचाचा आहे. त्याचबरोबर हा स्मार्टफोन तुम्हाला 4 जीबी रॅम तसेच 64 जीबी स्टोरेज सह येतो. या स्मार्टफोनचा कॅमेरा देखील तब्बल पन्नास मेगापिक्सलचा देण्यात आला आहे. सोबतच या स्मार्टफोनची बॅटरी देखील06000 mAh असणार आहे.

Redmi 9A

फ्लिपकार्टच्या दिवाळी सेलमध्ये रेडमीचा आणखी एक स्मार्टफोन तुम्हाला साडेसात हजार रुपयांत मिळत आहे. विशेष म्हणजे, एसबीआय क्रेडीट कार्डने जर तुम्ही या स्मार्टफोनचं पेमेंट केलं, तर तुम्हाला अतिरिक्त दहा टक्के डिस्काउंट देखील देण्यात येणार आहे. Redmi 9A असं या स्मार्टफोनचं नाव आहे. हा स्मार्टफोन तुम्हाला 3 जीबी रॅम तसेच 32 जीबी स्टोरेजसह येतो. या स्मार्टफोनच्या डिस्प्लेचा विचार करायचा झाल्यास, या स्मार्टफोनचा डिस्प्ले हा 6.53 इंचाचा आहे. एवढेच नाही, तर या स्मार्टफोनची बॅटरी देखील तब्बल 5000mAh असणार आहे. या स्मार्टफोनचा फ्रंट कॅमेरा हा 5 मेगापिक्सलचा तर मुख्य कॅमेरा हा 13 मेगापिक्सलचा असणार आहे.

 हे देखील वाचा Second Hand Bike: 20 हजारात hero spender Plus, 16 हजारात Bajaj Pulsar! कुठे सुरू आहे हा भन्नाट सेल? जाणून घ्या सर्व डिटेल्स..

WhatsApp new update: आता सिलेक्टेड लोकांनाच दाखवता येणार तुमचा whatsapp DP; जाणून घ्या या संदर्भातली सेटिंग सविस्तर..

OTT Platform: आता hotstar वर टी-ट्वेंटी वर्ल्ड कप पाहता येणार मोफत; पाहा मोफत hotstar वापरण्याची ही ट्रिक..

infosys recruitment 2022: Infosys, Wipro,TCS मध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी; दिलेल्या लिंकवर क्लिक करून असा करा अर्ज..

Electric Scooter: फक्त 32 हजारामध्ये मिळतेय ही दमदार इलेक्ट्रिक स्कूटर; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

Second Hand Car: जबरदस्त कंडिशन असणारी Maruti Suzuki Alto मिळतेय केवळ 65 हजारांत; जाणून घ्या ऑफर विषयी सविस्तर..

Sport shoes: दीड हजार किंमतीचे स्पोर्ट शूज या वेबसाईटवर मिळतायत केवळ 250 रुपयांत; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.