Electric Scooter: फक्त 32 हजारामध्ये मिळतेय ही दमदार इलेक्ट्रिक स्कूटर; जाणून घ्या सर्व डिटेल्स..
Electric Scooter इंधनाचे (inflation) दर गगनाला भिडले असल्याने आता अनेकांना टू-व्हीलर (two wheeler) गाडी वापरणे परवडत नसल्याचे पाहायला मिळते. साहजिकच यामुळे आता अनेकजण इलेक्ट्रिक गाड्या खरेदी करताना पाहायला मिळतात. इलेक्ट्रिक (Electric) गाड्या खरेदी करणाऱ्यांची संख्या अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात वाढली असून, आता अनेक बड्या कंपन्या देखील ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन इलेक्ट्रिक गाड्यांची निर्मिती करताना दिसून येतात. इंधन दरवाढीला कंटाळा आला असेल, आणि तुम्हाला दमदार इलेक्ट्रिक बाइक खरेदी करायची असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे.
ऑटो मार्केटमध्ये अनेक इलेक्ट्रिक बाइकचे जबरदस्त व्हेरिएंट उपलब्ध देखील आहेत. मात्र सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर इलेक्ट्रिक स्कूटरच्या किमती असल्याने अनेकजण खरेदी करताना विचार करतात. मात्र Ujaas eZ ही अशी एक स्कूटर आहे, जी तुम्हाला कमी किंमतीमध्ये मिळत आहे. विशेष म्हणजे, स्कूटरचे फिचर्स दमदार असून, अनेकांच्या पसंतीस देखील उतरलेली आहे. चला तर मग जाणून घेऊया Ujaas eZy या बाईक विषयी सविस्तर. सर्वप्रथम आपण या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत काय आहे? हे जाणून घेऊ.
Ujaas eZy किंमत
कंपनीने आतापर्यंतची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर ऑटो मार्केटमध्ये उतरवली आहे. ग्राहकांच्या भेटीला येणाऱ्या या स्कूटरची किंमत केवळ 31 हजार 880 रुपये एक्स शोरूम ठेवण्यात आली आहे. स्कूटरची ही किंमत दिल्ली मधील आहे. जर तुम्ही ही इलेक्ट्रिक स्कूटर घरी आणण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला ही स्कूटर केवळ 34 हजार रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे. सर्वसामान्यांना परवडेल अशी किंमत आणि दमदार फीचर्स असे या स्कूटरचे वैशिष्ट्ये असल्याने ग्राहक मोठ्या प्रमाणात खरेदी करताना दिसून येतात.
Ujaas eZy बॅटरी आणि मोटर
कंपनीने या स्कूटरच्या बॅटरीची क्षमता ही दमदार दिली आहे. ग्राहकांना 48 व्होल्टेजची बॅटरी आणि 26Ah लीड ॲसिड बॅटरी पॅक मिळणार आहे. याबरोबरच अडीचशे व्होल्टेजची पावर हब मोटार देखील जोडली गेली आहे. विशेष म्हणजे, या गाडीची बॅटरी पूर्ण चार्ज होण्यासाठी केवळ ६ तासाचा कालावधी लागतो. एवढेच नाही, तर बॅटरी एकदा फुल चार्ज केल्यानंतर, ही इलेक्ट्रिक स्कूटर तब्बल 60 किलोमीटर धावते. आता आपण गाडीचा तासी वेग किती आहे, त्याचबरोबर इतरही काही फीचर्स विषयी जाणून घेऊ.
Ujaas eZy रेंज व टॉप स्पीड
Ujaas eZy ही इलेक्ट्रिक स्कूटर पूर्ण सहा तास पूर्ण चार्ज केल्यानंतर एकूण ६० किमी अंतर कापते. ही इलेक्ट्रिक स्कूटर तासी २५ किलोमीटर वेगाने धावते. या स्कूटरच्या ब्रेक सिस्टीम विषयी बोलायचे झाल्यास, या स्कूटरच्या दोन्हीं चाकांमध्ये ड्रम ब्रेक्सची सुविधा देण्यात आली आहे. पाठीमागच्या आणि पुढच्या दोन्हीं चाकांना अलॉय व्हील देण्यात आली आहे. एवढेच नाही, तर ट्यूबलेस टायरची देखील सुविधा देण्यात आली आहे. या स्कूटरला जबरदस्त सस्पेन्शन देण्यात आले आहे. पुढच्या बाजूला टेलिस्कोपिक टेक्नॉलॉजीची सुविधा देण्यात आली आहे. तर पाठीमागे हायड्रोलिक टेक्नॉलॉजीची सुविधा देण्यात आली आहे.
हे देखील वाचा Men’s Bad Habits: आयुष्यात चुकूनही करू नका या पाच गोष्टी, अन्यथा वैवाहिक जीवनाचा होईल सत्यानाश..
Electric Scooter: अमेझॉनवर मिळतेय जबरदस्त इलेक्ट्रिक स्कूटर फक्त इतक्या हजारात..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम