LGBTQ: होय तृतीयपंथीयांचा आशिर्वाद असतो शुभ; जाणून घ्या तृतीयपंथी आणि देवाचे कनेक्शन..
LGBTQ: तृतीयपंथीयांना (LGBTQ) आपल्या समाजात विशेष मान दिला जात नाही. आपला समाज कायम त्यांच्याकडे वेगळ्या भावनेने बघतो. त्यांना सर्वसामान्य स्त्री-पुरुषासारखी वागणूक न देता कायम अपमानजनक वागणूक दिली जाते. साहजिकच यामुळे क्षमता असून सुद्धा ते रोजगारापासून दुरावतात. अशावेळी त्यांना भिक्षा मागून उदरनिर्वाह करण्याशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे बर्याचदा आपण बाजारात तृतीयपंथीयांना दुकानांमध्ये पैसे मागताना बघतो. परंतू एवढं असून, देखील तृतीयपंथीयांचा आशिर्वाद खूप महत्वाचा मानला जातो. अनेकजण तृतीयपंथीयांचा आशीर्वाद घेण्याचा प्रयत्न देखील करतात. समाजात अपमानास्पद वागणूक मिळत असून, देखील तृतीयपंथीयांचा आशीर्वाद मग का घेतला जातो असा प्रश्न साहजिकच तुम्हाला देखील पडला असेल? तर आज आपण याचविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.
तृतीयपंथी रेल्वेत किंवा बाजारातील दुकानांमध्ये पैसे मागताना आपण नेहमी पाहतो. अनेकजण त्यांचा अपमान देखील करतात. मात्र यात काहीजण पैसे देऊन आशिर्वाद घेण्याचा देखील प्रयत्न करतात. त्यांच्यासोबत सन्मानाने बोलले, काही पैसे दिले की तृतीयपंथी देखील डोक्यावर हात ठेवून आशिर्वाद देतात. हे आपल्याला चांगल्या प्रकारे माहीत आहे. तृतीयपंथीयांचा आशिर्वादाला विशेष महत्व आहे. हे जरी खरं असलं तरी नेमकं कशामुळे त्यांच्या आशीर्वादाला एवढे महत्व प्राप्त झालं आहे. हे तुम्हाला नक्कीच माहीत नसेल. आज आपण तृतीयपंतांचे आशीर्वाद घेतल्यानंतर, नक्की काय फायदे होतात? आणि याला विशेष महत्त्व का प्राप्त झालं आहे, याविषयी सविस्तर जाणून घेऊ या.
या कारणामुळे घेतात तृतीयपंथींचा आशीर्वाद
तृतीयपंथी यांचा आशीर्वाद घेतल्यामुळे माणसाच्या आयुष्यात काय बदल होतात कोणत्या संकटांपासून माणसाची सुटका होते हे तुम्हाला कदाचित माहिती देखील असेल मात्र तृतीयपंथी यांचा आशीर्वाद घेतल्याने त्याच्यावर देवाची कृपा का राहते हे मात्र तुम्हाला नक्कीच माहिती नसेल. तृतीयपंथींचा आशीर्वाद घेतल्याने माणसाच्या आयुष्यात काय बदल होतात हे आपण सविस्तर जाणून घेणार आहोत मात्र तत्पूर्वी आपण तृतीयपंथी यांच्या आशीर्वादाला विशेष महत्त्व का आहे हे पाहू.
तृतीयपंथीयांचा थेट संबंध देवाशी जोडलेला असतो अनेकांकडून सांगण्यात येतं. तृतीयपंथी यांच्यावर देवाचे विशेष प्रेम आणि कृपा राहते. आपल्यावर कोणत्याही प्रकारचा संकट येऊ नये यासाठी माणूस नेहमी देवाचे प्रार्थना करत असतो. देवाचं तृतीयपंथींवर विशेष प्रेम आणि कृपा असल्याने आपली प्रार्थना जर तृतीयपंथींनी देवापर्यंत पोहोचवली तर आपल्यावर देखील देव प्रसन्न होतात असं म्हटलं जातं. देव आणि आपल्या मधील तृतीयपंथी हे दुवा असतात तृतीयपंथींची कृपा आपल्यावर राहिल्यावर आपल्यावर देव देखील प्रसन्न होतात. आणि म्हणून तृतीयपंथीचा आशीर्वाद घेतला जातो.
तृतीयपंथींचा आशीर्वाद घेतल्यास आयुष्यात होतात हे बदल
ज्योतिष शास्त्रामध्ये (astrology) सुद्धा तृतीयपंथीयांच्या आशिर्वादाचा उल्लेख केलेला आहे. तृतीयपंथी यांच्या आशिर्वादाने स्वत:च्या आयुष्यात बदल घडवण्याचे काही उपाय सुद्धा सांगण्यात आलेले आहेत. त्यामुळे हे उपाय केल्यास, एखाद्याचे नशीब देखील बदलू शकते. तृतीपंथी यांच्याकडून काही कामे तुम्ही करुन घेतल्यास, तुमच्या संपत्तीत सुद्धा भर पडू शकते. अचानक मिळालेल्या लाभामुळे तुम्ही श्रीमंत सुद्धा होऊ शकता. त्यामुळे जर तुमचा वेळ सध्या खराब सुरु असेल, विविध समस्या तुमच्या मागे हात धरुन लागलेल्या असतील, तर तुम्ही हे उपाय करुन बघायलाच हवेत. तर चला जाणूण घेऊया काय आहेत ते उपाय.
तृतीयपंथींना या गोष्टींचे दान करा
तुमच्या क्षेत्रात तुम्ही प्रचंड मेहनत घेत असाल, मात्र तरीही यशाच्या लांबच आहात किंवा मेहनत घेऊन सुद्धा पाहिजे, ते समाधान मिळत नाही. अशावेळी तुम्ही तृतीपंथीयांना काही विशीष्ट गोष्टींचे दान करणे जरुरी आहे. आर्थिक दान केल्याने तुमच्या संपत्तीत भरभराट होण्याची शक्यता असते. तसेच बुधवारच्या दिवशी एखाद्या तृतीयपंथीयास हिरवे कपडे आणि अंगठी दान करा. त्यांचे आदरातिथ्य करा आणि त्यांचे आशिर्वाद मागून घ्या. यामुळे काही दिवसांतच तुम्हाला, तुमच्या जिवनात मोठे बदल बघायला मिळेल. तुमच्या रस्त्यात येणारे अडथळे नाहीसे होतील. आणि ज्या गोष्टींसाठी तुम्ही धावपळ करत आहात, ती गोष्ट तुम्हाला अगदी सहजरीत्या मिळेल.
तृतीयपंथीयांकडून करुन घ्या या गोष्टी
आपण बर्याचदा बघतो की, घरात काही शुभकार्य असल्यास तृतीयपंथी घरी येतात. आणि आशिर्वाद देतात. घरात बाळ जन्मले किंवा लग्नासारखे शुभकार्य असल्यास आपल्याला हे बघायला मिळते. अशावेळी तुम्ही तृतीयपंथीयाकडून काही गोष्टी करुन घ्यायला हव्यात. याव्यतिरिक्त जर तुमच्या परिचयात कोणी तृतीयपंथी असेल, तर त्यांना घरी बोलावून सुद्धा तुम्ही हे करु शकता. बुधवारी किंवा बुध ग्रहाच्या कोणत्याही नक्षत्रात घरातल्या लहाण बाळाला किंवा मुलाला तृतीयपंथीयाच्या मांडीवर बसवा आणि त्याच्यासाठी आशिर्वाद मागून घ्या. त्यांनी आशिर्वाद देताच मुलाबरोबर तुमचे नशिब बदलण्यास सुद्धा वेळ लागणार नाही.
आशिर्वादात तृतीयपंथींना हे मागावे
तृतीयपंथींचा कायमच मान-सन्मान ठेवला पाहिजे. कारण ज्याप्रमाणे, त्यांच्या आशिर्वादात शक्ती असते त्याचप्रमाणे त्यांचा श्राप सुद्धा नुकसानदायी ठरू शकतो. त्यामुळे तृतीयपंथी कधीच आपल्या हातून नाराज होणार नाही, याची विशेष काळजी तुम्ही घेतली पाहिजे. तृतीयपंथीयांना कायम दान करत राहिले पाहिजे. तृतीयपंथीयांना आर्थिक स्वरुपाचे दान करा आणि शक्य असल्यास त्यांच्या आशिर्वादात त्यांना १ रुपयाचे किंवा ५ रुपयाचे दान मागून घ्या.
तृतीयपंथीयांनी दिलेलं ते नाणं तुम्ही जिथे कुठे पैसे ठेवता त्याठिकाणी ठेवा. पाकिटामध्ये, पर्समध्ये किंवा पैसे ज्या कपाटात ठेवता तेथे ठेवा. यामुळे तुमच्या संपत्तीत भर होईल. तुमच्या आर्थिक परिस्थितीत वेगाने बदल होत असल्याचे तुम्हाला बघायला मिळेल. त्यामुळे तृतीयपंथींना आशिर्वादात ही गोष्ट नक्कीच मागून घ्या.
हे देखील वाचा Agricultural exports: तुमचा शेतमाल निर्यात करायचाय? आता सरकार उचलणार निर्यातीचा खर्च; जाणून घ्या प्रक्रिया..
Electric Scooter: अमेझॉनवर मिळतेय जबरदस्त इलेक्ट्रिक स्कूटर फक्त इतक्या हजारात..
SBI Recruitment 2022: या पदवीधरांसाठी SBI मध्ये निघाली मेगाभरती; जाणून घ्या कसा करायचा अर्ज..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम