India vs Australia: बुमराहच्या यॉर्करवर स्वतःची दांडी गुल होऊनही अरॉन फिंचने उभा राहून वाजवल्या टाळ्या; पाहा व्हिडिओ..

0

India vs Australia: भारत आणि ऑस्ट्रेलिया (INDvsAUS) यांच्यामधील सुरू असलेल्या तीन एक टी-ट्वेंटी सामन्याच्या मालिकेतील दुसरा सामना (Ind vs aus 2nd T20 nagpur) नागपूरच्या मैदानावर खेळवण्यात आला. पहिल्या सामन्यात पराभव पत्करावा लागल्याने मालिका वाचण्यासाठी हा सामना जिंकणे फार महत्वाचे होते. पाऊसामुळे खेळपट्टी ओली असल्याने सात वाजता सुरू होणारा सामना तब्बल अडीच तासाने सुरू झाला. आठ षटकाचा या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दिलेले 91 धावांचे आव्हान रोहित शर्माच्या (Rohit Sharma) वादळी खेळीमुळे भारताने चार चेंडू शिल्लक राखून विजय मिळवला. (India beat australia by 6 wickets)

ऑस्ट्रेलियाने (australia) दिलेल्या 91 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात दमदार झाली. पहिल्याच षटकात रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि के एल राहुलने (KL Rahul) तब्बल तीन उत्तुंग षटकार लगावत 20 धावा कुठल्या. 2.5 षटकात संघाची धावसंख्या 39 झाली असताना राहुल बाद झाला. दमदार सुरुवात झाल्यानंतर भारत हा सामना सहज जिंकेल असं वाटत होतं, मात्र मधल्या फळीकडून पुन्हा एकदा सातत्याचा अभाव पाहायला मिळाला. राहुल (Rahul) विराट कोहली (Virat Kohli) सूर्यकुमार यादव (suryakumar Yadav) आणि हार्दिक पांड्या (Hardik Pandya) एकापाठोपाठ एक बाद झाल्यानंतर, भारत अडचणीत सापडला. परंतु दुसरीकडे कर्णधार रोहित शर्मा मात्र खेळपट्टीवर आपला जलवा दाखवत होता.

कर्णधार रोहित शर्माने 20 चेंडू तब्बल नाबाद 46 धावांची बहारदार खेळी केली. शेवटच्या षटकात नऊ धावांची आवश्यकता असताना फिनिशरचा रोल देण्यात आलेल्या दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) पहिल्याच चेंडूवर षटकार आणि नंतर चौकार खेचत भारताला विजय मिळवून दिला. ट्वेंटी-ट्वेंटी सामन्याच्या मालिकेत दोन्ही संघानी एक एक सामना जिंकला असून, आता तिसरा टी-ट्वेंटी सामना 25 तारखेला हैद्राबादमध्ये होणार आहे. भारताने या मालिकेत बरोबरी साधली असली, तरी दुसरीकडे दुखापतीनंतर पुनरागमन करणाऱ्या बुमराची जोरदार चर्चा होत आहे.

गेल्या काही सामन्यांमध्ये भारतीय गोलंदाजांची शेवटच्या ओव्हरमध्ये अनेक आंतरराष्ट्रीय फलंदाजांनी हवा काढण्याचे पाहायला मिळालं. साहजिकच या सगळ्यांमध्ये अनेकांनी जसप्रीत बुमराला (Jasprit Bumrah) मिस केलं. भारतीय संघात बुमराचे पुनरागमन झाल्यानंतर, साधारण वाटणारी भारताची गोलंदाजी मजबूत वाटेल असं अनेकांचं म्हणणं होतं. आणि आजच्या सामन्यात ते पाहायला देखील मिळालं. जसप्रीत बुमराने जोरदार पुनरागमन करताना भन्नाट गोलंदाजी केली. जबरदस्त यॉर्करचा मारा करत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना शांत ठेवण्यात यश मिळवले.

दुखापतीनंतर अनेक महिन्यांनी पुनरागमन करून देखील क्रिकेट चाहत्यांना तीच जुनी लय पाहायला मिळाली. एका अफलातून यॉर्करवर जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार फिंचचा बोल्ड काढला. आश्चर्य म्हणजे, बुमराहने टाकलेल्या अफलातून यॉर्करचे कौतुक आऊट झालेल्या फिंचने (Aaron finch) केले. बुमराहच्या यॉर्करवर बाद झाल्यानंतर, फिंचने टाळ्या वाजवून त्याचे कौतुक केले. क्रिकेटच्या मैदानावर अनेक प्रतिस्पर्धी खेळाडू एकमेकांविरुद्ध भांडताना आपण अनेकदा पाहतो. मात्र समोरच्या गोलंदाजाने टाकलेल्या उत्कृष्ट चेंडूवर आपण स्वतः बाद झाल्यानंतर समोलच्या गोलंदाजाचे कौतुक करणं हे फार क्वचित पाहायला मिळते.

हे देखील वाचाBollywood News: दोन लग्नं, स्वत:च्याच मुलीसोबतच असे संबंध! दिग्दर्शक महेश भट्ट यांचा थक्क करणारा प्रवास वाचून जाल चक्रावून..

Menstrual cycle: मासिक पाळी येणं नेमकं केव्हा थांबतं? मासिक पाळीत होणारे बदल जाणून बसेल धक्का..

Sexual ability: या चार पदार्थांचा आहारात करा समावेश; शुक्राणूंची संख्या वाढून लैंगिक क्षमता होईल द्विगुणित..

Aadhar card update: आता आधार कार्डवरचा फोटो बदलणे झाले अधिक सोपे; जाणून घ्या सविस्तर प्रक्रिया सोप्या भाषेत..

Second hand two wheeler: ४० हजार किमी पळालेली FZ केवळ 25 हजारांत; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

PM PRANAM Yojana:पीएम प्रणाम योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार हे जबरदस्त फायदे; जाणून घ्या या योजने विषयी सविस्तर..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.