balance between wife and mother: पत्नी आणि आईचे भांडण होत असेल तर करा हे काम; आयुष्यात पुन्हा कधीच होणार नाही भांडण..
balance between wife and mother: सासू (mother in law) आणि सूनेचं (daughter in law) पटतं असं फार कमी बघायला मिळतं. काही ना काही कारणांवरुन दोघींचे खटके ऊडत असतात. बर्याचदा साध्या साध्या गोष्टींवरुन झालेला वाद गंभीर स्वरुप धारण करतो. ही आपल्याकडल्या प्रत्येक घरा-घरातली कहानी आहे. सासु पुष्कळ दिवसांपासून त्या घरात राहत आलेली असते. त्यामुळे घरातल्या प्रत्येकावर ती हक्क सांगण्याचा प्रयत्न करते. तसेच घरातलं सर्व काही माझ्याच मनाने चालावे, अशी सासुची ईच्छा असते. मात्र याऊलट सुन घरात नवीन येऊन सुद्धा सासुचे वर्चस्व तिला कधीच मान्य नसते. नवर्यावर सासुने हक्क सांगितलेला तर तिला मुळीच आवडत नाही. असं देखील बोललं जात. याशिवाय मुलाच्या लग्नानंतर घर चालवण्यात महत्वाचा वाटा मुलाचा असल्यामुळे, आता मीच घराची मालकीन आहे, आणि माझ्या म्हणण्याप्रमाणे सगळे चालायला हवं. असं देखील सुनेला वाटत असते. यामुळे देखील भांडणे होतात. साहजिकच अशा अनेक समस्यांमुळे सासू आणि सूनेत वारंवार खटके ऊडत राहतात.
मुलाला लहाण्याचं मोठं करण्यात महत्वाचा वाटा आईचा असतो. त्यामुळे मुलाच्या प्रत्येक गोष्टीवर आई तिचा अधिकार सांगत असते. त्याच्या आवडी-निवडीची तिला जाण असते. परिणामी तीच मुलाची योग्य काळजी घेऊ शकते. असे तिला वाटते, आणि त्यामुळे मुलाच्या वैयक्तिक जिवनाचे निर्णय घेण्यात सुद्धा तिचा वाटा मोठा असतो. एवढंच काय तर, त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधण्यात सुद्धा आईचीच भूमिका महत्वाची असते. मग असे असून, देखील लग्न होताच आईचे आणि मुलाच्या पत्नीची भांडणं होतात. दोघींमध्ये भांडणे होण्याची अनेक कारणे आहेत याविषयी सांगण्याची गरज नाही हे तुम्हाला चांगल्या प्रकारे माहित आहेत मात्र भांडण झाल्यानंतर मुलांनी काय करण्यापेक्षा जास्त हे अनेकांना माहिती नसतं. आणि म्हणून आज आपण याच विषय सविस्तर जाणून घेणार आहोत.
आईचे (mother) आणि पत्नीचे (wife) भांडणं झाल्यास तुमची अवस्था काय होत असेल? याची पुरेसी कल्पना आम्हाला आहे. आईचे आणि पत्नीचे भांडणं झाल्यास काय करावे? हे अनेकांना सुचत नाही. मुलगा म्हणून काही कर्तव्ये पूर्ण करायची असतात, पण त्याचवेळी दुसरीकडे नवरा म्हणून सुद्धा काही गोष्टींना प्राधान्य द्यावं लागतं. अशावेळी काय करावे? कुणाची बाजु घ्यावी? यात पुरता गोंधळ ऊडुन जातो. अगोदरच कामाचा ताण असतो, आणि त्यात जर घरी सुद्धा शांतता नाही म्हटल्यावर आयुष्य खूप कठीण होऊन जाते. त्यामुळे आई आणि पत्नीचे वारंवार वाद होत असल्यास तुम्ही काय करायला हवे? जाणून घेऊया सविस्तर.
मध्य मार्ग निवडावा
आई आणि पत्नीचा वाद झाल्यास काय करावे, काही सुचत नाही. अशावेळी तुम्ही मधला मार्ग निवडणे सोयीस्कर ठरु शकते. या भांडनामध्ये कुणा एकाची चुक आपल्याला लक्षात आल्यावर सुद्धा एकाची बाजु घेणे तुमच्यासाठी अधिक धोक्याचे आहे. त्यामुळे तुम्ही मध्य मार्ग स्विकारला पाहिजे. जितकं शक्य होईल तितकं आईच्या आणि पत्नीच्या भांडनामध्ये पडण्याचेच टाळले आवश्यक आहे. मात्र तरी सुद्धा वाद विकोपास गेल्यास दोघीनांही शांत होण्याची विनंती करा. दोघीनाही शांत करण्याचे समान प्रयत्न करा. मात्र चुकुनही कुणा एकाची बाजु घेऊन नका. अन्यथा तुमची डोकेदुखी वाढल्याशिवाय राहणार नाही.
शांत बसा, बोलूच नका
बर्याचदा अगदी साध्या साध्या गोष्टींवरुन आईचे आणि पत्नीचे वाद होतात. या वादात पडणे किती महागात पडु शकते, हे माहिती असून देखील आपण या वादात पडावे अशी दोघींचीही ईच्छा असते. मात्र अशावेळी शांत राहणे आणि काहीही न बोलणेच तुम्हाला फायदेशीर ठरु शकते. कारण दोघीही वारंवार तुम्हाला बोलण्यासाठी ऊत्तेजीत करतात. मात्र अशावेळी तुम्ही काहीही बोलु नका. कारण तुम्ही बोलायला जाता एक आणि त्यातुन अर्थ दुसरा निघतो. त्यामुळे दोघींपैकी एकीचा गैरसमज होण्याची शक्यता जास्त असते. आणि त्यामुळे वाद मिटण्याऐवजी अधिक चिघळतो.
पत्नीला अशाप्रकारे समजावे
सुरुवातीस एक गोष्ट लक्षात घ्या, वाद सुरु असतांना कधीच दोघींपैकी एकीला सुद्धा समजावण्याचा प्रयत्न करु नका. अन्यथा तुमच्या अडचणींत वाढ होईल. भांडण थोड्यावेळात शांत होते. शांत झाल्यानंतर पत्नीजवळ जा आणि तिला प्रेमाने समजावुन सांगण्याचा प्रयत्न करा. यादरम्यान एक गोष्ट लक्षात घ्या, आईसमोर कधीच पत्नीची समजुत काढू नका, पत्नीला एकट्यात असताना बोला. आणि तिची समजुत काढा. सगळ्यात महत्वाचे म्हणजे तिचे कौतुक करा, प्रशंसा करा. मात्र हे करत असताना आईबद्दल काहीही वाईट बोलु नका. आईला कळत नाही, आई बावळट आहे, असे शब्द तर चुकीनेही वापरु नका.
बऱ्याच मंडळींना असे बोलण्याची सवय असते. या उलट तुम्ही पत्नीला आईने या घराला घरपण प्राप्त करून देण्यासाठी खूप कष्ट केलं आहे. याची देखील जाणीव करून द्या. आईचं काही चुकत असेल तर तिला समजून घेण्यात अजिबात कमीपणा नाही. लग्नापूर्वी तुझी आई तुला ओरडली तर तू समजून घेत नाहीस का? मला जितकी तू महत्त्वाची आहे, तितकीच आई देखील आहे. दोघींशिवाय माझं जीवन अपूर्ण आहे. अशा काही वाक्यांमुळे तुमच्या पत्नीचा तुमच्याविषयी आणि तुमच्या आई विषयीचा असणारा रिस्पेक्ट वाढू शकतो.
अशाप्रकारे आईला समजावा
वाद शांत झाल्यावर, आईला एकट्यात जाऊन भेटा. आईला मोठेपणा द्या, तुमच्यासाठी सर्वकाही तिच आहे अशी जाणिव तिला करुन द्या. अर्थात असलीच पाहिजे. मोठी असल्यामुळे तुलाच समजुतदारपणा दाखवावा लागेल. मनाचा मोठेपणा दाखवत पत्नीच्या काही गोष्टींकडे दुर्लक्ष केलं तर तुझी उंची आणखीन वाढणार आहे. या घराला स्वर्ग प्राप्त करून देण्यात तुझा खूप मोठा वाटा आहे. किरकोळ गोष्टींवर तू तुला त्रास करून घेऊ नकोस. एवढी वर्ष यशस्वी सांभाळलेले घर तुला असंच पुढे घेऊन जायचं आहे. त्यामुळे काही गोष्टींकडे दुर्लक्ष करणं देखील फार आवश्यक आहे.
तिच्या चुका तुलाच सांभाळून घ्याव्या लागणार आहेत. तिला तिच्या चुकांची जाणीव करून देण्यासाठी अनेक पर्याय आहेत. व्यवस्थित समजावून सांगितल्यास चुका दुरुस्त होऊ शकतात. याची तुमच्या आईला देखील जाणीव करून द्या. मात्र या सर्व गोष्टी करत असताना, तुमचा आवाज अतिशय मृदु ठेवा. घरातील भांडणामुळे तुम्हाला खूप त्रास होतो, याची देखील जाणीव आईला करून द्या. घरातील भांडणामुळे आपल्या मुलाला याचा त्रास होतो, याची जाणीव झाल्यावर आई देखील या गोष्टींकडे गांभीर्याने पाहून आपल्या वागणुकीत बदल करू शकते.
हे देखील वाचा Love addict Side effect: प्रेम रोगाचे दुष्परिणाम जाणून सरकेल पायाखालची जमीन; जाणून घ्या याची लक्षणं आणि उपाय..
Marriage Tips: लग्नानंतर महिलांना या गोष्टीची असते सर्वात जास्त भिती; जाणून तुम्हीही जाल चक्रावून..
Wheat growers farmer: गहू उत्पादक शेतकऱ्यांच्या मुळावर उठले मोदी सरकार; आता गहू कवडीमोल भावाने विकला जाणार हे कारण..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम