PMMVY: या योजनेअंतर्गत गरोदर महिलांना मिळतात पाच हजार रुपये; जाणून घ्या कसा घ्यायचा लाभ..
PMMVY: आपल्या देशात आज सुद्धा आरोग्य हा विषय गांभीर्याने घेतला जात नाही. त्यामुळे आज सुद्धा भारतातील ग्रामीण भागांची अवस्था गंभीर आहे. अपुर्या वैद्यकीय सुविधांमुळे कित्येकांना आपले प्राण गमवावे लागतात. वेळीच निदान न झाल्याने गंभीर आजाराने मृत्यु होणार्यांची संख्या सुद्धा पुष्कळ आहे. योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने कुपोषणाचे प्रमाण दिवसागणिक वाढते आहे. गर्भवती मातांचे मृत्यु थांबवण्यात सरकारला कमालीचे अपयश येते आहे. परंतू सरकारकडून आरोग्य क्षेत्रावर लक्ष केंद्रित करुन परिस्थिती बदलण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. मात्र तरिदेखील पाहिजे त्या प्रमाणात यश अद्यापही सरकारला आलेले नाही. सरकार विविध योजना राबवून यावर मार्ग काढण्याच्या प्रयत्नात आहे. परंतू या योजनासुद्धा अजुन देखील बहुतांश गरजवंतांपर्यंत पोहचलेल्या नाहीत. (Pantpradhan Matru Vandana Yojana)
गर्भवती मातांचे मृत्यु रोखण्यासाठी, त्यांची विशेष काळजी घेण्यासाठी केंद्र सरकारने काही योजना राबवत आहेत. बहुतांश भागात या योजनेस सुरुवात झाली असून, लाभार्थ्यांपर्यंत ही योजना पोहचवली जाते आहे. मात्र आजही बहुतांश ग्रामीण भाग आणि आदिवासी भाग या योजनांच्या लाभांपासून वंचित आहे. त्यामुळे समाजाच्या व्यापक स्तरावर या योजना कार्यान्वयीत करुन समाजातल्या शेवटच्या टप्प्यापर्यंत त्याचा लाभ पोहचवणे जरुरी आहे. त्याकरिता या योजनांबाबत जनाजागृती होणे गरजेचे आहे. म्हणून आम्ही देखील या योजनेविषयी माहिती घेऊन आलो आहोत.
केंद्र सरकारकडून विशेषत: गर्भवती महिलांसाठी एक योजना सुरु करण्यात आली आहे. पंतप्रधान मातृवंदना योजना (PMMVY) असे या योजनेचे नाव आहे. मातामृत्यु आणि बालमृत्यु रोखण्यात ही योजना प्रभावी ठरु शकते. गर्भवती महिलेस या योजनेअंतर्गत पहिल्या अपत्यासाठी ५ हजारापर्यंतचा लाभ मिळतो. या योजनेचा लाभ तीन टप्प्यात मिळतो. शासकीय नोकरदार वगळता इतर सर्व महिलांना या योजनेचा लाभ घेता येतो. याकरिता सरकारी रुग्णालये, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक/सेविका, शासकीय आरोग्य संस्था यांचेशी संपर्क साधावा लागतो.
प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा लाभ कसा घ्यायचा
यामध्ये गर्भवती महिलेस गर्भवती असण्याच्या १०० दिवसांच्या अगोदर गरोदरपणाची नोंद करावी लागते. त्यानंतर संबंधित महिलेस पहिला हप्ता मिळतो. ज्याची किंमत १००० रुपये आहे. गरोदरपणाच्या सहा महिन्यानंतर प्रसुतिपुर्व तपासणी करावी लागते. यानंतर लाभार्थी महिलेस दुसरा हप्ता मिळतो, ज्याची किंमत २००० रुपये आहे. त्यानंतर प्रसुती झाल्यानंतर बाळाच्या निरोगी आयुष्यासाठी काही लसी बाळास द्याव्या लागतात. आजही काही ठिकाणी गैरसमजांमुळे या लस बाळांना दिल्या जात नाही. मात्र त्याकरिताच तिसरा हप्ता मिळवण्यासाठी बाळाला लस टोचणे सरकारने अनिवार्य केले आहे. त्यामुळे बीसीजीची एक मात्रा आणि पेंटाव्हालेट आणि ओपीव्ही लसीच्या तीन मात्रा घेतल्यानंतर, तिसरा हप्ता मिळतो, ज्यामध्ये लाभार्थ्यास २००० रुपये मिळतात. असे एकुण ५००० रुपये प्रत्येक लाभार्थ्यास पहिल्या अपत्याच्यावेळी मिळतात.
योजनेच्या पात्रतेचे निकष व अटी
नैसर्गिक गर्भपात झाल्यास त्याचबरोबर बालक मृत झाल्यास सर्व लाभ तीन हप्त्यांऐवजी एकाच टप्प्यात दिले जातील. दारिद्र्य रेषेखालील तसेच शासकीय नोकरदार वगळून सर्व माता यासाठी पात्र असणार आहेत. जननी सुरक्षा योजनेस पात्र लाभार्थ्यांना त्याच योजनेच्या निकषानुसार लाभ मिळणार आहे. शासकीय आरोग्य संस्थेत गरोदरपणाच्या १५० दिवसांच्या आत नोंद करणे अनिवार्य असणार आहे.
लाभार्थी व तिच्या पतीच्या आधारकार्डाची प्रत, आधारकार्ड बॅंक खात्याशी जोडलेले असणे अनिवार्य असणार आहे. प्राथमिक लसीकरण आणि बाळाचा जन्म नोंदनी दाखला देणे आवश्यक आहे. आपण आवश्यक लागणारे कागदपत्रे काय असणार आहे हे देखील जाणून घेऊ.
आवश्यक कागदपत्रे
या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थीच्या आधारकार्डची झेरॉक्स त्याचबरोबर राष्ट्रीयकृत बँकेच्या खात्याची पासबुकची झेरॉक्स देखील असणे आवश्यक आहे सोबतच माता-बाल संरक्षण कार्ड झेरॉक्स देखील लागणार आहे आणि बाळाच्या जन्म दाखल्याची देखील झेरॉक्स लाभार्थ्यांना योजनेचा लाभ घेण्यासाठी द्यावी लागणार आहेत.
हे देखील वाचा Google pay loan: आता Google pay देणार एक लाखापर्यंतचे लोन; जाणुन घ्या कसा करायचा अर्ज..
Job: नोकरी शोधत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे; जाणुन घ्या कुठे कुठे आहेत नोकरीच्या संधी..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम
Comments are closed.